"शालेय शिक्षण म्हणजे मूलभूत ज्ञानाचा पाया, तर स्पर्धा परीक्षा ही त्या पायावर उभारलेली भव्य इमारत आहे."
           - प्रा. ज्ञानेश्वर घुगे सर 



आज दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक आणि समाजिक परिवाराच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते..

आजच्या मार्गदर्शन सत्रात संघर्ष स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे प्रा. ज्ञानेश्वर घुगे सरांनीं स्पर्धा परीक्षा विषयी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं..
शालेय शिक्षणापासूनचं आजच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षाची सर्व माहिती घेऊन, आपल्या इच्छा, क्षमता आणि आवड लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपलं करिअर निवडावं,असं उपस्थित असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रा. ज्ञानेश्वर घुगे सरांनी हसत -खेळत मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळातील स्पर्धा परीक्षेतील संभाव्य करिअर कसं असेल ह्या संदर्भात विस्तृतपणे विवेचन केलं..
आदरणीय सर आपला बहुमल्य वेळ आमच्या ह्या शैक्षणिक परिवाराला मार्गदर्शनाच्या माध्यमातून मिळाला त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणाकींत आहोत..

प्रा. ज्ञानेश्वर घुगे सरांचं जाहीर हार्दिक आभार..

धन्यवाद.. 🙏

-आपलाच विनम्र स्नेही आणि आभारी..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख 
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://tinyurl.com/34xfy483