"तुमचे ध्येय स्पष्ट असेल तर मेहनत कधीच व्यर्थ जात नाही."
- प्रा. उल्हास पाटील
( श्रीराम क्लासेस, निफाड, नाशिक )
🎓 सदिच्छा ग्रेट भेट आणि मार्गदर्शन :
आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवाराला श्रीराम क्लासेस निफाडचें संचालक प्रा. उल्हास पाटील सरांची सदिच्छा भेटीत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
ह्या सदिच्छा भेटीत प्रा. उल्हास पाटील सरांनीं विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आजच्या परिस्थितीत शालेय शिक्षणातील उज्ज्वल यशासाठी आपलं ध्येय स्पष्ट असेल आणि ती प्रामाणिक असेल तर आपली कोणतीचं मेहनत वाया जात नाहीं हे प्रतीपादीत करतांना आपल्या अभ्यासाचं योग्य नियोजन, वेळेचं महत्व, विषयनिहाय सराव करताना स्मार्ट अभ्यास करण्याचं कौशल्य कसे विकसित करावं.. विज्ञान विषयातील सर्वं संकल्पना समजून घेऊनचं अभ्यास करावा आणि गणित विषयाला जास्तीत जास्त सराव कसा करावा ह्याचं सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं..
उपस्थित दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आपल्या सदिच्छा भेटीतील मार्गदर्शनाचा लाभ आमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नक्कीच होईल सर..
आपलं मन:पूर्वक हार्दिक धन्यवाद 🙏🏻🌹
आपलाच हार्दिक आभारी..🙏🏻
-स्नेहांकीत
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
0 Comments