📚 *"ऐरण होशील तेव्हा घाव सोस, आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल.."*
  -डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम 

*प्रत्येक क्षण भरभरून जगावंसं नेहमीच वाटत असतं मनापासून पण नेहमीच पाहीजे तसं शंभर टक्के जगता आलं असं कधी होतंच नाही.*

*आयूष्य हे खरं तर खूप आव्हानात्मक आणि खडतर बाबींनी भरून जातं कधी कधी. तेव्हा माञ कुणीतरी सावरून घेणारं असावं लागतं सोबतीला. म्हणजे माणसाला खंबीरपणे लढण्याची प्रेरणा आणि ताकत मिळते.*

*मला अश्या प्रसंगी चांगली पूस्तकं आणि संघर्षमय जिवन प्रवासात   मिळालेलं कटू-गोड अनुभवाची शिदोरी फार उपयोगी पडते..*

              *जीवनात दिवसेंदिवसअनेक आव्हानांशी भिडता भिडता एक गोष्ट माञ मी शिकलो की कधीच हार मानायची नाही.प्रत्येक प्रसंगाला धिराने,जीवन कौशल्याचा पुरेपूर वापर करून आणि संयमाने सामोरे जायचं.*

*म्हणजे आपलं पाऊल डगमगत नाही आणि तोलही जात नाही , अन मग संकटेच मला संधीसारखी भासु लागतात.खरं म्हटलं तर कठीण परिस्थिती आणि आव्हानांनीच माणूस अधीक कणखर आणि परिपक्व बनत जातो.*

*हे मी अनुभवलं आहे आणि आपण जोपर्यंत स्वताःला सिद्ध करत नाही तो पर्यंत लोकही आपली कदर करत नाहीत..*

            *शालेय शिक्षणापासूनच्या माझ्या जडणघडणाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला माझ्या स्वताःच्या आत झालेल्या वैचारिक क्रांतीची आणि बौद्धिक विकासाची जाणिव होते.अन मग मी अधिक मेहनत घेवू लागतो स्वताःच्या व्यक्तीमत्व विकासासाठी आणि स्वत:तील सूप्त कला कौशल्य खूलविण्यासाठी.*

              *आयूष्यात येणारे चढऊतार हे माणसाला गतिमान आणि कार्यशिल ठेवण्यासाठी आवश्यकच असतात, फक्त गरज असते ते आपला धिर खचू न देता प्रत्येक प्रंसगाला सामोरं जाण्याची व आपलं कार्य-प्रयत्न अथक अविरत श्रमाने एका समर्पित वृत्तीनं करून त्यांतुन मिळणाऱ्या आनंदातुन आयुष्याची पुर्तता करणं..*

*येणारा प्रत्येक क्षण हा आपल्याला आनंदच देणारा असेल असं कधीच होत नसतं..प्रत्येक दिवसाचं वैशिष्टये वेगळं असतं.*
              *राष्ट्ररत्न डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या "अग्निपंख" मधिल एक विचार मला फार आवडतो... ते म्हणतात " येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सारखा सामोरा जा...*

_" ऐरण होशील तेव्हा घाव सोस,आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल.."_

*हा विचार सकारात्मक आणि रचनात्मकपणे समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल की जिंदगी प्रत्येकालाच संधी देत असते.*

*फक्त त्या संधिचं सोनं करण्याचं कसब आपल्या स्वतःत आपल्याला विकसित करता आलं पाहीजे.*

           *केवळ हार जित,यश अपयश म्हणजे आयूष्य नाही... आपल्यात असणाऱ्या सुप्त गुणांचा शोध घेवुन त्यावर मेहनत घेत त्याला हळूवार खूलवत आनंद घेत जगत राहणं....हेच खरं जगणं.. कारण  जित किंवा हार फक्त तात्पुरतं सुख देतात... अंतबार्हय समाधान देतं ती फक्त आपलं स्वतः वरचा विश्वास आणि स्व:कर्तृत्व...*

🎓 माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी.
त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी..
आपण सर्वजण प्रयत्न करुयात...
त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.🌹🙏🏻


© *विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख*✍🏻

🎓 *डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.*

https://www.facebook.com/thespiritofzindagi/

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻