प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि स्नेहीं पालकांनो..

कोरोना काळात आपल्या पाल्याचं जे काही शैक्षणिक नुकसान झालं ते यंदा शाळेत आणि क्लासेस मध्ये दिसून येत असून, त्यांच्या सर्वोतोपरी शैक्षणिक विकास आणि प्रगतीसाठी चिंतनशील असणाऱ्या प्रत्येक संवेदनशील व जागृत पालक आणि शिक्षकांच्या निदर्शनास येत आहे.. हे व्यवस्था आणि आपलं सर्वात मोठं अपयश आहे हे खेदानं व्यक्त करतो..


कोरोना महामारी काळात एकूण अभ्यासक्रमात 25-30% कपात, अनियमित शाळा आणि क्लासेस, फसलेला आणि तोंडघशी पडलेलं ऑनलाईन शिक्षण, सलग दोन शैक्षणिक वर्षात परीक्षा नं घेता पास करण्याची अघोरीं आणि तुघलकी निर्णय, मागच्या शैक्षणिक वर्षात शाळेतच बोर्डाची परीक्षेला फुकटचे प्रात्यक्षिक परीक्षेचे फुल्ल गुण.. ई.. आदी न पचणाऱ्या बाबीमुळे वाढलेले भरमसाठ गुण.. आणि फुगलेली गुणवत्ता अर्थात गुणांची सूज ह्या सर्वं गोष्टी वेळ मारून नेणाऱ्या होत्या पण त्याचे संभाव्य दुष्परिणाम गंभीर आहेत हे वास्तव नाकारता येणार नाहीत..

यंदाच्या पूर्ण शैक्षणिक वर्षात हीं आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती आणि विकास खुप महत्वाचा असून त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास होण्यासाठी आपली दक्षता आणि सजगता आवश्यक आहे..

जूनला रीतसरपणे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर वर्ग 8 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा पायाभूत अभ्यासक्रम तपासल्यानंतर काही महत्वपूर्ण गोष्टी पालकांच्या लक्षात आणून देणें गरजेचे आहे असं मला वाटतं..

🎓पालकांसाठी:✍🏻

1) आपल्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यास, घरचं वातावरण, दिवसेंदिवस त्यांच्या कडून होणारा अति मोबाईलचा वापर, त्यांच्या मित्र संगतीतला वावर, त्यांची अभ्यास प्रगती, मागील शैक्षणिक वर्षातली गुण्णाची सूज, शाळेत आणि क्लासेस मधील त्यांची उपस्थिती, नियमित पणे होणाऱ्या घटक चाचणीतील मिळणारे गुण.. ई.. आदी बाबींचा सूक्ष्म विचार केल्यानंतर त्यांच्या कडून गुण्णांची तसेंच गुणवंत्तेची अवास्तव अपेक्षा धरू नये..

2) आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता, त्याची अभ्यास आवड, आपण त्याच्या प्रगतीसाठी देतं असलेलं रचनात्मक बळ, वेळोवेळी शिक्षक आणि मार्गदर्शकाकडून आलेल्या सूचना, आपलं मुलांसोबत असलेली अभ्यास प्रगती संदर्भातली वागणूक, आपण केलेलं फाजील लाड, आपल्या आशा आणि अपेक्षा ह्या सर्वं बाबतीतली आपली संवेदनशील दक्ष भूमिकेचं कस लावणारी आहे.

3) कोणत्याही चुकीबद्दल मुलांना शारीरिक शिक्षा किंवा अपशब्द करू नये, जेणेकरून त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल अशी कोणतीही कृती करू नका..

आपल्या मुलांना शिस्त लावताना खंबीरता , ममता , मनमोकळेपणा आणि वाजवीपणा ह्या चार गोष्टींचा विचार करूनचं त्यांना सौंम्य शिक्षा करावी..


4) आठवड्यातून किमान दोनदा, आपणास जसं शक्य होईल तसं आपल्या मुलांशी Quality Time काढुन Healthy संवाद साधून मनमोकळ्या पद्धतीनं बोलतांना, त्यांचा दिनक्रम, शाळा-क्लास मधील चर्चा, तिथं घेण्यात आलेल्या उपक्रमातील सहभाग, त्यांचे मित्र-मैत्रीणी, त्यांचा स्वभाव-संवाद, आवडते-नावडते शिक्षक, त्यांची शिकवणी, आवडणाऱ्या गोष्टी, मित्र कसे आहेत, कोण कुठं कुठं राहतो आणि त्याचे वडील काय करतात,आवडणारे विषय, नं आवडणाऱ्या विषयातील त्यांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अडचणी, समस्या, आऊटडोर गेम्ससाठी किती वेळ देता, त्यांच्या शारीरिक समस्या व किरकोळ आजार, आपल्या मुलांच्या सामाजिक विकासातील स्व-स्वभाव गुण आणि दोष यांची माहिती, आपण केलेलं मुक्त मार्गदर्शन,त्यांच्याशी खेळणे,कौटुंबिक पार्श्वभूमि,आपल्या परिस्थितीचीहीं जाणीव आपल्या मुलांना आपल्या योग्य आचरणातूनचं करुन देतांना त्यांच्याशी होणारा आपला भावनिक संवाद ई.. आदी बाबींचा होणारा संवाद आज घरोघरी पालकांच्या व्यस्ततेनें हरवत चाललंय..

5) मागील परीक्षेत आणि हाती आलेल्या घटक चाचण्या आणि सराव परीक्षाच्या निकालावरून गुणांच्या तुलनेवरून त्यांची गुणवंत्ता मोजण्याची घाई करू नये.. कारण मुलांची सर्वोतोपरी गुणवंत्ता मोजण्याची कोणतीचं 'फूटपट्टी' अजूनही तयार झालेली नाहीये..

6) ईतर मुलांच्या गुणांच्या बरोबरीत आपल्या मुलांची तुलना नक्कोच.. कारण " पाच बोट्टे सारखी नसतातचं..!"

7) आपल्या मुलांच्या 'हुशारीचं कौतुक' अवश्य करावं पण इतरांशी तुलना करुन आपलं 'हुशारीपण' मिरवू नये, तत्पूर्वी आपली भूतकालीन शालेय स्व:शैक्षणिक गुणहीं तपासावेत..

8)लॉकडाऊन काळात मुलांचा 'पायांभूत अभ्यासक्रम' कच्चा राहिल्यानं आता त्यांच्या शैक्षणिक गुणांक्रमात नक्कीच फरक जाणवेल हें मात्र निश्चित.. पण त्यासाठी फक्त शिक्षकचं जबाबदार आहेत हें कुठंहीं निरर्थक गरळ ओकण्यापेक्षा आपलं हीं कर्तव्य आणि जबाबदारी कमी पडतेय, ह्याचं हीं भान असू द्या..

9) शाळा-क्लासेस मधील शिक्षकांची रीतसर आणि नियमित भेटीतून आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल चर्चा अवश्य करावी पण त्यांच्या वेळेतचं ह्याचं हीं आपण भान ठेवावं..

10) पालक-शिक्षक-विद्यार्थी यांचा उत्तम संवाद , स्नेह-सहकार्यातूनचं विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर मात करुन त्यांची शैक्षणिक प्रगती साधली तरच मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपलं शैक्षणिक-सामाजिक विकास करू शकतात असं मला वाटतं.

🎓विद्यार्थ्यांसाठी....✍🏻

1) शाळेत आणि ट्युशन क्लासेसला आपण नियमित असावे.

2) आपली दिनाचर्या आणि अभ्यास वेळा पत्रक निश्चित असावं.

3) वेळा पत्रकात शाळा, क्लासेस, गृहपाठ,स्वयं-अध्ययन, पायाभूत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असलेला राखीव वेळ, लेखन-सराव,आपला छंद -आवडी, खेळ (Outdoor Games), शाळेत दिलेले प्रोजेक्ट्स, मोबाईल किंवा PC वरील Games, Tv, इंटरनेट वरील पूरक अभ्यासासाठी दिलेला वेळ, घरकाम, मित्रांसोबत बाहेर फिरणे किंवा खेळणे.. ई.. आदी गोष्टीसाठी दिलेल्या वेळेचे संतुलन साधित आपलं पूर्व नियोजन असावं.

4) यंदा अभ्यासक्रम 100% असल्यानं आपलं अभ्यास नियोजन हीं दमदार आणि अंमलबजावणी कटाक्षतेने प्रभावी असली पाहिजे मित्रांनो..

5) आपली शैक्षणिक प्रगती आणि शिस्तबद्धता आपल्या पालकांनी केलेल्या संस्काराच्या दिव्यतेचा कस सिद्ध करणारी असल्यानं आपली भूमिका खूप महत्वाची आहे..

6) प्रत्येक विद्यार्थ्यांची कुवत आणि क्षमता भिन्न भिन्न असल्यानं ती ओळखूनचं आपला अभ्यास कौशल्य विकसित करावं जेणेकरून प्रत्येक शैक्षणिक वर्षात अनुकूलता साधताना त्यातून यश संपादन करता येईल..

7) आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात आपल्या मित्र संगतीची योग्य निवड हीं नेहमीच पूरक ठरते मित्रांनो, म्हणून मित्र हीं चांगले निवडावेत..

8) आपल्या अभ्यास प्रगती संदर्भात, आपल्या पालकांशी-मार्गदर्शकांशी आपला सदैव सुसंवाद असावा जेणेकरून आपणास कोणताही मानसिक त्रास होणार नाही.

9) आपल्या अभ्यासासोबत आपली असलेली कटीबद्दता, प्रामाणिकता, आपल्या परिस्थितीची जाणीव, स्वतःवरचा आत्मविश्वास, योग्य मित्रांची निवड, आपला विनम्र आणि संयमी विनयशील स्वभाव, परिस्थितीची अनुकुलता,पालकांचे उत्तम संस्कार, शिक्षक-मार्गदर्शकाचं योग्य मार्गदर्शन,कोणत्याही व्यसनांना बळी न पडण्याचा दृढ संकल्प, दरदिवशी नवं काहीतरी शिकण्याची जिज्ञासावृती, अवांतर वाचन, अंत-स्वयं प्रेरणा, वेळेचं अनुपालन आणि स्वयं-शिस्त.. ई.. आदी गोष्टीचं संवेदनशील जागृत भानचं आपल्या उज्ज्वल भविष्याचा सुंदर राजमार्ग आहे मित्रांनो..

10) आपली स्व:ओळख, अभ्यास पद्धती, बौद्धिक क्षमता आपलं व्यक्तीमत्व, इच्छा आवड आणि छंद ह्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं विकास शालेय शिक्षणात आणि वातावरणाचं दडला आहे, त्याचा सुमधूर सुगंध घेण्याची पात्रता -क्षमता विकसित करा मित्रांनो..

आजच्या या स्पर्धेच्या युगात श्वास घेण्या इतकी जागा नसतांना मित्रांनो , स्पर्धे ऐवजी सहकार्य ,सह-प्रयोग ,सह - अनुभूती ,सह -निर्मिती ,समस्या पुर्तीतून प्रामाणिकता ठेऊन पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्या जीवापाड प्रयत्नांना यशाचा सुगंध योग्य समन्व्यय सहकार्यातुनचं साधता यावा हा सुंदर प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून करण्याचा एक सुंदर संकल्प आम्ही करतोय मित्रांनो..

" सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं हैं ।
मेरी कोशिस हैं क़ि ये सूरत बदलनी चाहिये !"

चूकभूल असल्यास नक्कीच क्षमस्व..🙏🏻

धन्यवाद…… !🙏

- एक शिक्षण प्रेमी

🎓 आपलाच विनम्र स्नेही आणि आभारी..🙏🏻
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.