🎓 माजी विद्यार्थी सदिच्छा भेट : नागसेन शामराव पुंडगे.. (दहावी बॅच 2008)

माध्यमिक शालेय शिक्षणापासून सामाजिक चळवळीत सक्रिय राहून आजच्या काळातील युवकांना खऱ्या अर्थानं 'आत्मनिर्भरपासून ते स्वयं-सिद्ध कर्तृत्व नेतृत्वात' परिवर्तन करुन शिक्षण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून अनेक विध्यार्थी संघटनेत आपल्या कार्य-कर्तृत्वाची छाप सोडणारा आमचा नागसेन स्वभावत:च अभ्यासू आणि जिज्ञासा वृत्तीनं प्रत्येक विषयांवर आपल्या उपजत प्रतिभेने नेहमीच आम्हांस मंत्रमुग्ध करणारा,डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन मित्र परिवारातील एक गुणवंत विद्यार्थी नागसेन पुंडगे सध्या वर्धा, सेवाग्राम येथील महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात 'दलित एवं जनजाति अध्ययन' अंतर्गत Ph.D करतोय ह्याचा आम्हांस सार्थ अभिमान मित्रा..!

आज तुझ्या सदिच्छा भेटीनं..!, तुझ्या शालेय शिक्षणातील प्रखर वक्तृत्वाची पुन्हा एकदा स्मरण झालं.. तुझ्या बोलण्यात आजही प्रतिभाशाली उत्तुंग कर्तृत्वाचा गंध आढळून आला..

तुझ्या परिवाराचा संघर्ष, तुझी प्रचंड जिद्द,प्रत्येक विद्यार्थी संघटनेच्या राज्यस्तरीय वैचारिक कार्यक्रमात तुझा असलेला ऍक्टिव्ह सहभाग, दररोज नवं काही शिकण्याची उर्मी, थोरा-मोठ्याबद्दल तुझा असलेला विनयशील विनम्र स्वभाव,आंबेडकरी विचारधारेशी तुझा असलेला वैचारिक स्नेह, आंबेडकरी संघटना आणि पक्षांची तु केलेली समाजभिमुख समीक्षा, येणाऱ्या काळात युवकांना समाज प्रवाहात आणण्यासाठी आजचा तुझा संघर्ष नक्कीच त्यांना प्रेरणादायी अवश्य ठरेल ह्यात शंकाचं नाहीं मित्रा..

तुझ्या पावलावर पाऊल ठेवत तुझी बहीण रोहिणी पुंडगे हीं ( आमच्या परिवाराची गुणवंत विद्यार्थीनी ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठात Ph. D करतंय ह्याचा आम्हांस नक्कीच द्विगणित आनंदचं..!

तुझ्या आई-वडिलांचा तुम्हां भावंडासाठी असलेला अविरत संघर्ष आजच्या काळात कित्येक पालकांसाठी एक प्रेरणादायी आहे..

तुझ्या संकल्प सिद्धीस माझ्या सारखा एक मार्गदर्शक लाभला हें मी माझं भाग्य समजतो मित्रा..!

भीमनगर, पंचशील नगर, इंदिरा गांधी नगर, साखला प्लॉट परिसर, अजिजिया नगर, परसावत नगर भाग, क्रांती नगर, विकास नगर ते जम -जम परिसरातील.., परभणीचा दक्षिण भाग शैक्षणिक-सामाजिक विकासात मागसलेल्या परिसरात गेल्या दोन दशकांपासून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन मित्र परिवारांनें तूझ्या सारख्या शेकडो यशस्वी मुलांना मुख्य प्रवाहात आणून इतरांनाहीं प्रेरणा देण्याचं कार्य अगदी निस्वार्थी वृत्तीनं आजही निरंतरपणे करीत आहे..

तुझ्या सारखे असंख्य विद्यार्थी त्याचं प्रेरणेनें प्रेरित होऊन, सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या प्रबोधन आणि सर्वोतोपरी सर्वांगीण विकासात आपल्या कार्य कर्तृत्वाची मोहोर उमटवीत आहेत, ह्याचा आम्हांस सार्थ अभिमान वाटतो..

तुझ्या भावी वाटचालीस लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा मित्रा..!

🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.