🎓 हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा – हारूण शेख सलीम..!🌹
(माजी विद्यार्थी – डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी)
आमच्या शैक्षणिक परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आजचा क्षण..!
शैक्षणिक वर्ष 2010–11 च्या दहावीच्या बॅचमधील आमचा स्नेही विद्यार्थी हारूण शेख सलीम यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) या पदावर जिल्हा न्यायालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
यश हे कधीच योगायोगाने मिळत नाहीतर ते सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द, शिस्त आणि स्वतःवरील विश्वास यांच्या भक्कम पायावर उभे राहते. संघर्षमय परिस्थितीतही न डगमगता स्वतःच्या कर्तृत्वाने यश संपादन करणारा हारूण हा आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. नेतृत्वगुण, सकारात्मक दृष्टीकोन आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची वृत्ती ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख आहे.
शालेय जीवनात अभ्यासू, प्रामाणिक आणि ध्येयवादी असलेला हा विद्यार्थी आज न्यायव्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात शासकीय सेवेत कार्यरत होत आहे, ही आमच्या संपूर्ण शैक्षणिक परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. एका विद्यार्थ्याचे यश हे केवळ त्याच्या कुटुंबाचे नसते, तर ते समाजातील हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे प्रेरणास्थान असते.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी गेल्या 26 वर्षांपासून वंचित, उपेक्षित, कष्टकरी आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून, जबाबदार, विवेकनिष्ठ आणि समाजाभिमुख नागरिक घडविण्याची सर्वात प्रभावी शक्ती आहे.
हारूण शेख यांच्या या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवे ध्येय, नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे.
पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन हारूण शेख..!
आपल्या प्रामाणिक कार्याने न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा अधिक उंचावावी आणि आयुष्यात उत्तरोत्तर यश, कीर्ती व समाधान लाभो, हीच सदिच्छा..!
तुझाचं मार्गदर्शक.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
https://tinyurl.com/6mvvabrn
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
0 Comments