🎓 स्नेही पालकांनो आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो… 🙏

दहावी बोर्ड परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा केवळ गुणांचा निकाल नव्हे, तर तुमच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा कस लागणारा सोहळा आहे. यश हे मेहनतीच्या दरवाजातूनच आत येते—म्हणूनच तुम्ही केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करेल.

🌟 “स्वप्न तेच पाहा जे पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यात आहे!” 🌟

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन हा शैक्षणिक परिवार विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. विद्यार्थी आणि पालकांचा समंजस पाठिंबा आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन ह्यामुळेच यशस्वी भविष्यासाठीची वाट सुकर होते.

⏳ परीक्षा हा तुमच्या ज्ञानाचा आणि चिकाटीचा कस पाहणारा एक टप्पा आहे, अंतिम लक्ष्य नव्हे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास ह्या त्रिसूत्रीचा अवलंब केलात, तर यश तुमच्या पावलांशी खेळत राहील...!

🔰 पालकांसाठी कान मंत्र आणि काही महत्त्वाच्या सूचना... ✍️

1️⃣ मुलाच्या अभ्यासाची खरी स्थिती जाणून घ्या—त्याच्यावर अनावश्यक दबाव न टाकता त्याला सकारात्मक उभारी द्या.

2️⃣ अभ्यासाचे वेळापत्रक समजून घ्या आणि त्यानुसार वातावरण तयार करा.

3️⃣ घरात शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा, जेणेकरून मुलाचा अभ्यासावर अधिक भर राहील.

4️⃣ मुलांच्या मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक गरजा समजून घ्या—त्याला समजून घ्या, फक्त सल्ले देऊ नका.

5️⃣ आहार, झोप आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या—कारण निरोगी शरीरातच तल्लख बुद्धी वास करते.

6️⃣ टीव्ही, मोबाइल आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळा, पण त्याचवेळी विश्रांतीची आवश्यकता देखील ओळखा.

7️⃣ पालक म्हणून तुमची भाषा आणि कृती सकारात्मक ठेवा—तुमचा आत्मविश्वासच त्याला प्रेरणा देईल.

8️⃣ प्रत्येक पेपरनंतर मुलांशी संवाद साधा—गुणांवर नव्हे, तर प्रयत्नांवर भर द्या.

9️⃣ शिक्षकांशी संवाद ठेवा, आवश्यक असल्यास मदतीची मागणी करा.

🔟 मुलावर केवळ अपेक्षांचे ओझे टाकू नका—त्याच्या क्षमतांचा योग्य विकास होईल हे पहा.

🔰 विद्यार्थ्यांसाठी सुवर्णमंत्र... ✍️

1️⃣ अभ्यासाचे नियोजन ठरवा आणि त्याची अंमलबजावणी करा—संधीचे सोने करायचे असेल तर वेळेचा सदुपयोग आवश्यक आहे.

2️⃣ “मी करू शकतो” हा आत्मविश्वास बाळगा—कारण आत्मविश्वास म्हणजे यशाचा पहिला टप्पा.

3️⃣ मुलभूत संकल्पना स्पष्ट ठेवा—शिकण्याची आवड ठेवा, पाठांतरावर अवलंबून राहू नका.

4️⃣ तणाव बाजूला ठेवा—मन शांत ठेवल्यास तुम्ही कोणत्याही परीक्षेला समर्थपणे सामोरे जाऊ शकता.

5️⃣ मित्रांची निवड विचारपूर्वक करा—अत्यावश्यकतेशिवाय गरज नसलेल्या चर्चांमध्ये वेळ वाया घालवू नका.

6️⃣ आहार आणि झोपेचे योग्य संतुलन ठेवा—आरोग्य चांगले तर बुद्धीही तल्लख राहील.

7️⃣ गुणवत्तापूर्ण अभ्यास करा—अधिक वाचण्यापेक्षा समजून घेण्यावर भर द्या.

8️⃣ आत्मपरीक्षण करा—स्वतःच्या चुका शोधा आणि त्यातून शिकून पुढे जा.

9️⃣ शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या—त्यांचे अनुभव तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.

🔟 यश आणि अपयश दोन्हीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा—कारण दोन्ही जीवनाचा एक भाग आहेत.

🌟 प्रिय विद्यार्थ्यांनो,

तुमच्या मेहनतीची फळे नक्कीच गोड असतात. त्यामुळे आत्मविश्वासाने, जिद्दीने आणि सातत्याने परीक्षेला सामोरे जा. 

यश हे नियोजन, चिकाटी आणि योग्य दृष्टिकोनावर अवलंबून असते. तुमच्यात अपार क्षमता आहे—तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला आम्ही मनःपूर्वक शुभेच्छा देतो..!

✨ “शिखरावर पोहोचण्याचा निर्धार करा, कारण उंच भरारी घेणाऱ्या पंखांना कोणीही रोखू शकत नाही!” ✨

💐 सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आम्ही आहोतचं आपल्या मदतीला मित्रांनो..🙏

©विद्यार्थीमित्र.. ✍️

-आपलाच शुभेच्छुक आणि मार्गदर्शक :
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..

शैक्षणिक सल्ला आणि समुपदेशनासाठी आपण आम्हाला व्हाट्सअपवर किंवा फोनवर संपर्क करू शकता मित्रांनो..


🎓 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.