मिसाईल मॅन - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🌹

महान शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, थोर विचारवंत आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम..!

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ एक महान शास्त्रज्ञ किंवा राष्ट्रपती नव्हते, तर ते ज्ञान, जिद्द, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि अखंड संघर्षातून यशाची शिखरे गाठण्याचे जिवंत प्रतीक होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या बुद्धिमत्तेच्या, कठोर परिश्रमांच्या आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी भारताच्या वैज्ञानिक प्रगतीला नवी दिशा दिली.

त्यांच्या जीवनाचा प्रवास आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो,  
" माणसाची परिस्थिती त्याच्या स्वप्नांची मर्यादा ठरवत नाही, तर त्याची जिद्द, मेहनत आणि ज्ञानाची भूक त्याच्या भविष्याची दिशा ठरवते..!"

 “स्वप्ने पाहा, ज्ञान मिळवा, प्रश्न विचारा आणि स्वतःच्या कर्तृत्वाने जगात आपली ओळख निर्माण करा..!”

डॉ.कलाम सरांचे विचार म्हणजे केवळ प्रेरणादायी शब्द नव्हेत, तर व्यक्तिमत्त्व घडविण्याचा आणि राष्ट्रनिर्मितीचा मूलमंत्र आहे..

📖 आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने...✍️

आजच्या डिजिटल युगात माहितीचा प्रचंड सागर आपल्या हातात आहे, मात्र माहिती मिळवणे आणि ज्ञान संपादन करणे यांत मोठा फरक आहे. सोशल मीडियावरील क्षणिक मनोरंजनापेक्षा पुस्तकांशी मैत्री, विचारांची चिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकशील वाचन यांना आपण अधिक महत्त्व दिले पाहिजे.

कारण " पुस्तके केवळ परीक्षेत गुण मिळविण्यासाठी नसतात, ती माणसाला विचार करायला, प्रश्न विचारायला, सत्य शोधायला आणि जबाबदार नागरिक म्हणून घडायला शिकवतात."

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत..पण त्या स्वप्नांना परिश्रमांची जोड द्यावी. यश मिळवावे..पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही विनम्र राहावे. विज्ञान शिकावे; पण त्यासोबत मानवी मूल्येही जपावीत. स्वतःची प्रगती साधावी..पण आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा.

कारण खऱ्या अर्थाने विकसित भारत घडवायचा असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक, मनात जिज्ञासा, विचारांत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कृतीत सामाजिक बांधिलकी असली पाहिजे!

अशा महान राष्ट्रपुरुषाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!🙏

चला, डॉ.कलाम सरांच्या विचारांना केवळ अभिवादनापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणूया. वाचनाची संस्कृती रुजवूया, ज्ञानाचा प्रकाश घराघरांत पोहोचवूया आणि स्वप्न पाहणारीच नव्हे, तर ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी संघर्ष करणारी पिढी घडवूया..!

📚 वाचूया... विचार करूया... विवेकाने जगूया... आणि ज्ञानसमृद्ध, विज्ञाननिष्ठ व संवेदनशील भारत घडवूया!

🌹 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन..! 🙏

-एक पुस्तकप्रेमी आणि समीक्षक.. ✍️

🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन

#DrAPJAbdulKalam #अब्दुलकलाम #मिसाईलमॅन #वाचनप्रेरणादिन #१५ऑक्टोबर #ज्ञानाचीप्रेरणा #वाचनसंस्कृती #वैज्ञानिकदृष्टिकोन #विद्यार्थीशक्ती #युवाशक्ती #शिक्षण #प्रेरणा #ज्ञानसमृद्धभारत #विकसितभारत #TheSpiritOfZindagi