"स्वप्नांना पंख देणारे राष्ट्रपती – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम"

जगात काही लोक पदावरून मोठे नसतात, ते मोठे होतात त्यांच्या स्वभावाने, स्वप्नांनी आणि कामगिरीने...

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे असंच एक व्यक्तिमत्व..जे नाव घेताच प्रत्येक भारतीयाच्या मनात एक आदराचा वीजेचा झटका बसतो.

गरिबीतून महानतेकडे... ✍️

रामेश्वरमच्या छोट्याशा घरात जन्म...

वडील मासेमारी करणारे, घरात परिस्थिती अत्यंत साधी.
पण त्या साधेपणातही एक मोठं स्वप्न जन्माला आलं..

"ज्ञानाच्या बळावर स्वतःला आणि देशाला उंच नेण्याचं!"

विज्ञानाची साधना – देशासाठी..!

डॉ.कलाम साहेबांनी कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही.
त्यांचं संपूर्ण आयुष्य – भारतातील विज्ञान, संरक्षण आणि अवकाश संशोधनासाठी वाहिलं.त्यांनी क्षेपणास्त्र प्रकल्प उभारला, उपग्रह तंत्रज्ञान विकसित केलं आणि देशाला दाखवलं की “आपणही करू शकतो!”

राष्ट्रपती पदावरून ‘शिक्षक’

भारताचे राष्ट्रपती झाल्यावरसुद्धा त्यांनी पदाचं वजन मिरवलं नाही.
विद्यार्थ्यांमध्ये ते बसले, गप्पा मारल्या, त्यांना विचारायला शिकवलं, स्वप्नं दाखवली...तेच म्हणायचे..

"स्वप्नं तीच खरी, जी तुम्हाला झोपू देत नाहीत!"

डॉ.कलामांचे धडे

1. स्वतःवर विश्वास ठेवा...
यश हवं असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो.

2. कामात शिस्त ठेवा..
शिस्त नसलेलं ज्ञान म्हणजे फक्त माहिती; शिस्तीतलं ज्ञान म्हणजे शक्ती.

3. स्वप्नं मोठी ठेवा, पाय जमिनीवर ठेवा.

4. देशासाठी काहीतरी करा. फक्त स्वतःसाठी नाही..समाजासाठी जगा.

कलाम साहेबांच्या पुण्यतिथीला आपण फक्त फोटोला हार घालून थांबणार आहोत का? 

की त्यांच्या स्वप्नातील सशक्त, शिक्षित, नैतिक भारत घडवण्यासाठी

काहीतरी खरंच करूया?
प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेतून
एक तरी गोष्ट समाजासाठी करणं –
हेच खरं त्यांना अभिवादन ठरेल.

डॉ. कलाम म्हणजे..." साधेपणातला तेज, ज्ञानातली नम्रता
आणि स्वप्नांतली क्रांती!" 

त्यांच्या स्मृतीला कोटी कोटी विनम्र अभिवादन.. 🙏

चला, त्यांच्या विचारांनी आपली स्वप्नं उंचावूया...

“मोठं स्वप्न पाहा, मोठं विचार करा आणि मोठं काम करा!”

त्या खऱ्या #राष्ट्रपतींना विनम्र अभिवादन 🙏
#डॉ.कलाम_साहेब

-एक अभ्यासक
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख, परभणी..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in