प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि जागरूक पालकांनो... 🙏🏻
सध्या सर्वत्र गल्ली ते दिल्ली पर्यंत 'परीक्षा पें चर्चा ' हा एकसूरी नाद आपल्या अवती भवती 'गदारोळ' सुरु असताना बोर्ड परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कस लागल्याने काही काळ तणावपुर्ण वातावरण असतं.. परीक्षांना सामोरे जाताना योग्य नियोजन, स्वतःवरचा आत्मविश्वास, पालकांची साथ, मित्रांचं सहकार्य, शिक्षकांचं अमूल्य मार्गदर्शन, समुपदेशकाची भूमिका, मोबाईलचा पुरेपूर पूरक वापर, वेळेचं सुंदर नियोजन, अभ्यासाची पुर्ण तयारी, आपलीं कुवत...जाणीव आणि क्षमतांचा पुरेपूर कौशल्यपुर्ण वापर , संवादी आणि हेल्दी वातावरण, नेमकी अभ्यासाची योग्य दिशा,प्रश्न-पत्रिकेतील काठीण्या पातळी, आपला विषय-निहाय सराव, आपल्या आशा आकांक्षा आणि पालकांच्या अपेक्षा... ई... आदीचं नियोजन सुंदर असेल तर परीक्षा ह्या नक्कीच आनंदायी आणि विना ताण- तणाव पार पडू शकते असं मला वाटतं मित्रांनो...
"विद्यार्थ्याच्या ज्ञानात्मक, भावात्मक व क्रियात्मक गुणवत्तेचे आणि विकासाचे मूल्यमापन करणारे एक सर्वांत महत्त्वपूर्ण तंत्र म्हणजे परीक्षा होय मित्रांनो.."
थोडक्यात....!
"परीक्षा म्हणजे स्वतः मध्ये डोकावून पाहण्याचीं एक उत्तम संधी आहे मित्रांनो... "
स्वतःच्या सर्व क्षमता आणि कौशल्यांचा सुंदर वापर आपण केलात तर नक्कीच आपलं अपेक्षित यश आपणास मिळेल ह्यात शंकाचं नाहीं मित्रांनो...
आपल्यासाठी काही खास टिप्स... ✍🏻
1) आपल्या कडे उपलब्ध असलेल्या वेळेचं सुंदर नियोजन करा.
2) वेळेचं पालन करतांना स्वतःचीं स्वयं-शिस्त लावून घ्या.
3) आपल्या अभ्यासाची खरी परिस्थिती काय आहे.. हे पालकांना स्पष्ट सांगतांना त्यांच्याशी मनमोकळ्या पद्धतीने बोला.. त्यांनं आपला अर्धा तान-तणाव मोकळं होईल..
4) आपल्यातील कमकुवत अभ्यासाच्या बाजू, अपूर्ण अभ्यास, कठीण्या पातळी, नेमकं काय राहिलं, मी कुठं कमी पडू शकेल.. अभ्यासाचं मार्गदर्शन.. ई.. आदी गोष्टींबाबत... आपल्या मित्रांशी, शिक्षकांशी, छोट्या- मोठया मित्र-मैत्रणीशी कोणतेही लाज नं (नि:संकोचता ) बाळगता बिनधास्त हक्कांने बोला..
5) आपली खरी स्पर्धा ही आपल्याशीच आहे मित्रांनो, त्याची तुलना इतरांशी करणे म्हणजे शुद्ध आपल्याला कमी लेखण्यासारखं आहे.
6) परीक्षा काळात मोबाईलचा तसेंच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट् चा वापर कमीत कमी करा.
7) सोशल मीडियाचा वापर शक्यतो टाळा.
8) तासनं तास नको त्या गप्पा, मोबाईल गेम्स, नको ते वाद,चिडचिडपणा,भांडण.. ह्यात स्वतःला गुंतवू नका.. त्यानं आपला Quality Time व्याया जाईल मित्रांनो.
9) परीक्षा काळात संतुलित आहार घ्या आणि हलका फुलका थोडंसं व्यायाम अवश्य करा..
10) पुरेपूर झोप घ्या.. त्यानं पुर्ण दिवस फ्रेश वाटेल.
11) स्वयं अध्ययन महत्वपुर्ण असतं.. आप आपल्या क्षमतेचा आवाका लक्षात घेऊनचं आपली अभ्यास पद्धत विषयानुसार ठरवा मित्रांनो.
12) कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मागील प्रश्न-पत्रिकांचा सराव केला तर आपला नेमकं अभ्यास कसा, ह्याची दिशा मिळेल मित्रांनो.
13) एकाग्रतेने अभ्यास करतांना स्वयं सुधारणा टप्या टप्प्यानें करा.
14) आपलं अभ्यास नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्रामाणिक असेल तरंच आपणास आपलं लक्ष्य साध्य असेल मित्रानो.
15) आपली परीक्षा 80% लेखी असल्याने लेखन सरावाला विशेष लक्ष द्या.
16) मोबाईल फोनचा वापर करताना YouTube वरील Quality Content चाच वापर कमीत कमी वेळेत करा.
17) आपल्या अभ्यासाचं नियोजन आणि अंमलबजावणी काटेकोर, एकाग्र आणि प्रामाणिक असेल तरंच आपला आत्मविश्वास वाढतचं जाणारा असेल मित्रांनो.
18) परीक्षा संदर्भात शिक्षक, मार्गदर्शक आणि बोर्ड परीक्षा मंडळानें दिलेल्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करा.
19) प्रत्येक विषय पेपर परीक्षा संपल्यानंतरचा पुढील वेळेचं उत्तम नियोजन करा.
20) एखादा पेपर अवघड गेल्यास त्याच्या चिंतेत पुढील पेपर अवघड करू नका.
21) पेपर संपल्यानंतर तो कसा गेला.. ह्याची चर्चा मित्रांशी आणि पालकांशी दिलखुलास करा पण त्याचा ताण घेऊ नका.
22) परीक्षा काळात नवे काही प्रयोग करू नका.
23) परीक्षा काळात जास्त ताण-तणाव निर्माण होत असल्यास तो दूर करताना गाणे ऐकणे, ध्यान-धारणा करणे,आवडणारा एखादा चित्रपट पाहणे, एखादा खेळ खेळणे, कुटुंबासोबत वेळ खर्च करणे, बाहेर फिरणे, मनपसंद जेवण करणे... ई आदी गोष्टी करतांना वेळेचें ही भाण ठेवा मित्रांनो..
24) अभ्यासाचं नियोजन Smart असेल तर विजयही दमदार असेल मित्रांनो..
25) परीक्षा काळात खचू नका... आम्ही सर्व आपल्या सोबतच आहोत... फक्त आपण हाक द्या आम्ही आपणास मार्गदर्शनाची साथ देऊ मित्रांनो..
बाकी सर्व सूचना आपणास मिळाल्या असतीलचं... आपणास... त्याचं पालन करा आणि परीक्षेत घवघवीत यश संपादन करा मित्रांनो..
आपणा सर्वांना परीक्षेच्या तयारीसाठी लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा..
दर वर्षी येते परीक्षा ..वाटे तिची उगाच धास्ती
सरळ सोप्या आयुष्यातली .....जणू आफत नस्ती.. !
कटू - गोड अनुभव ......हेच जीवनाचे सार....
परीक्षेपुढे मानू नको तू कधीही हार ......
मन तुझे खंबीर ठेव ...प्रयत्नाच्या वारुवर तू हो स्वार
आयुष्याच्या सगळ्याच .....परीक्षेत सदैव यशस्वी हो !
-लेखन आणि संपादन:
आपलाच स्नेही आणि मार्गदर्शक..🙏🏻
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन
0 Comments