फेब्रुवारी–मार्च हे महिने संपूर्ण भारतात परीक्षेचे ऋतू म्हणून ओळखले जातात. वर्षभर आनंदाने शाळेत जाणारी मुले या काळात अचानक गंभीर, चिंताग्रस्त आणि व्यग्र दिसू लागतात. हा बदल केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहत नाही; पालकही नकळत ताणाच्या सावटाखाली वावरू लागतात. “मार्क्स नाही आले तर आयुष्याची ‘रिक्षा’ लागेल” अशा भीतीदायक वाक्यांतून मुलांच्या मनावर दडपण टाकले जाते, आणि परीक्षा हळूहळू उत्सव न राहता भीतीचे रूप धारण करते. प्रत्यक्षात परीक्षा ही क्षमतेचा उत्सव असायला हवा, शिक्षा नव्हे.
परीक्षा हा शब्द उच्चारताच अनेक घरांमध्ये वातावरण बदलते. हसरी मुले गंभीर होतात, संवाद कमी होतो आणि घरात तणावाची सावली पसरते. प्रश्नपत्रिका अजून हातात आलेली नसते, पण भीती आधीच मनावर कब्जा करते. गुण, क्रमांक आणि टक्केवारी यांच्या भोवती फिरणारा हा काळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर पालकांसाठीही मानसिक कसोटी ठरतो. या धावपळीच्या वातावरणात आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो, ती म्हणजे परीक्षा ही केवळ बुद्धीची चाचणी नसून ती मन, शरीर आणि मेंदू यांच्या समन्वयाची कसोटी असते.
आजची परीक्षा व्यवस्था विद्यार्थ्यांकडून फक्त उत्तरपत्रिका भरून घेण्याची अपेक्षा करत नाही; ती दीर्घकाळ टिकणारी एकाग्रता, स्थिर मन, तंदुरुस्त शरीर आणि सजग मेंदूची मागणी करते. म्हणूनच अभ्यास जितका महत्त्वाचा आहे, तितकेच महत्त्व स्मरणशक्ती, आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि भावनिक आधारालाही आहे. परीक्षा यशस्वीपणे पार करायची असेल, तर तयारी फक्त पुस्तकांची नव्हे, तर स्वतःचीही करावी लागते. हाच विचार पुढील मुद्द्यांतून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
1. अभ्यासाची वेळ : रात्र जिंकायची की मेंदू?
आजची मुले रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करणे पसंत करतात. आयुर्वेदानुसार रात्रीचे जागरण शरीरात वातदोष वाढवते, ज्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो.
पहाटेचा अभ्यास हा मेंदूसाठी सुवर्णकाळ मानला जातो. त्या वेळी केलेला अभ्यास अधिक खोलवर आणि दीर्घकाळ लक्षात राहतो.
जर रात्री अभ्यास अपरिहार्य असेल, तर चहा, जंक फूड, अतितिखट पदार्थ टाळावेत...मखाणे, शेंगदाणे, लाह्यांचा चिवडा, चिक्की यांसारखे हलके व पौष्टिक पदार्थ घेणे..
झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, पायांना हलका मसाज, शांत संगीत यांचा आधार घ्यावा...शांत झोप हीच दुसऱ्या दिवशीच्या अभ्यासाची खरी गुरुकिल्ली आहे.
2. आहार : मेंदूला मिळणारे इंधन
मेंदू हा यंत्र नाही, तो सजीव अवयव आहे. त्याला योग्य पोषण मिळाले नाही, तर तो थकतो. दूध, तूप, बदाम, अक्रोड, खजूर, चारोळी यांचा समावेश करा...रोज एक तरी मोसमी फळ द्या.
पालेभाज्या, फळभाज्या आणि प्रथिनयुक्त कडधान्ये आहारात असावीत...रिकाम्या पोटावर मोठी स्वप्ने उभी राहत नाहीत.
3. पाणी : विसरला जाणारा पण अत्यावश्यक घटक
अभ्यासात गुंग असताना मुलं पाणी प्यायला विसरतात. शरीरातील कोरडेपणा वाढला, की मेंदू थकतो..अभ्यासाच्या टेबलावर पाण्याचा जग आणि ग्लास असायलाच हवा..शहाळ्याचे पाणी, फळांचे सरबत, सौम्य हर्बल चहा फायदेशीर ठरतो..पाणी हे मेंदूचे नैसर्गिक टॉनिक आहे.
4. श्वास : मेंदूचा ऑक्सिजन..
मेंदूला सतत प्राणवायूची गरज असते. उथळ श्वास घेतल्याने थकवा वाढतो...रोज किमान १० मिनिटे दीर्घश्वसन, प्राणायाम, सूर्यनमस्कार करावेत...यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढते.
परीक्षेत उत्तर आठवत नसेल, तर घाबरू नका. दोन खोल श्वास घ्या, मेंदू स्वतः मार्ग दाखवतो.
5. डोळे : अभ्यासाचे द्वार
डोळ्यांवर ताण आला, की मन चिडचिडे होते आणि अभ्यासात रस राहत नाही...गुलाबपाणी किंवा गार दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवा..मोबाईल, टीव्ही शक्यतो बंद ठेवा...स्क्रीन टाइम कमी करा..डोळे थकले, की विचारही थकतात.
6. कान : शांततेचे साधन..
सतत हेडफोन वापरल्याने श्रवणशक्ती कमी होऊ शकते आणि मानसिक अस्वस्थता वाढते.
आठवड्यातून 2-3 वेळा कानांची निगा घ्यावी..यामुळे शांत झोप आणि मानसिक स्थैर्य मिळते.
7. पाठ व मान : दुर्लक्षित पण महत्त्वाचे..
तासन्तास बसून अभ्यास केल्याने मान, पाठ दुखणे सामान्य झाले आहे...आठवड्यातून काही वेळा हलका मसाज, हालचाल आवश्यक आहे...आरामदायी शरीरातच एकाग्र मेंदू वसतो.
8. प्रतिकारशक्ती : ऐनवेळी आजार नकोच
सर्दी, खोकला, ताप हे परीक्षा काळात मोठे अडथळे ठरतात. प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या उपायांकडे आधीच लक्ष द्यावे.
9. मुलींचे आरोग्य : समजून घेण्याची गरज..
पाळीच्या काळातील वेदना, अशक्तपणा, चिडचिड याकडे दुर्लक्ष करू नये..वेळेवर डॉक्टरांचा सल्ला, घरगुती उपाय, मानसिक आधार महत्त्वाचा...शरीराची वेदना कमी झाली, की मन आपोआप स्थिर होतं.
10.परीक्षा म्हणजे प्रवास, शिक्षा नाही..
योग्य आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, सकारात्मक वातावरण आणि थोडी आयुर्वेदिक तयारी असेल, तर परीक्षा भीतीदायक राहत नाही..तयारी झाली, तर आत्मविश्वास वाढतो.
आत्मविश्वास वाढला, की परीक्षा परीक्षा वाटते… शिक्षा नाही!
शेवटी, एवढेच लक्षात ठेवायला हवे की परीक्षा ही आयुष्याची दिशा ठरवणारी अंतिम रेषा नसून, स्वतःला ओळखून घेण्याची एक संधी आहे. गुणपत्रिकेवर उमटणारे अंक हे केवळ कागदावरचे ठसे असतात; खरे मूल्य असते ते विद्यार्थ्याच्या प्रयत्नांचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे. मन शांत, शरीर तंदुरुस्त आणि मेंदू सजग असेल, तर कुठलीही परीक्षा ओझं न वाटता एक अनुभव बनते.
म्हणूनच या काळात घाई, भीती आणि दडपण यांना दूर ठेवून विश्वास, संयम आणि सकारात्मकता यांना जवळ करा. योग्य आहार, नियमित दिनचर्या, श्वसन, विश्रांती आणि भावनिक आधार यांच्या साथीने दिलेली तयारी हीच खरी शहाणपणाची तयारी आहे. अशा वेळी परीक्षा फक्त प्रश्नपत्रिका राहत नाही; ती आत्मविश्वासाची पायरी बनते. आणि जेव्हा आत्मविश्वास हातात असतो, तेव्हा परीक्षा परीक्षा वाटते… शिक्षा कधीच वाटत नाही.
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
- विचार संकलन, लेखन आणि संपादन.. ✍️
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#परीक्षा_काळ #विद्यार्थीजीवन #परीक्षा_तयारी #मन_शरीर_मेंदू #मानसिक_आरोग्य #विद्यार्थी_प्रेरणा #पालक_मार्गदर्शन #एकाग्रता #स्मरणशक्ती #आत्मविश्वास #आरोग्यपूर्ण_अभ्यास #शांत_मन #शिक्षण_संस्कार #परीक्षा_भीती #विद्यार्थी_कल्याण #EducationWithValues #StudentWellbeing #ExamStress #MentalHealthAwareness #HolisticEducation #HealthyMindHealthyBody #PositiveParenting #ExamPreparation #विद्यार्थीमित्र #प्रा_रफीक_शेख #वैचारिक_लेखन #प्रेरणादायी_लेख #समाजप्रबोधन #शिक्षण_सेवा_प्रेरणा
0 Comments