जगभरातल्या उर्जासंकटाच्या पार्श्वभूमीवर, सूर्याच्या अखंड आणि मोफत ऊर्जेकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.आजचा काळ फक्त नोकरी शोधणाऱ्यांचा नाही, तर हातात कौशल्य आणि डोक्यात भविष्यदृष्टी असणाऱ्यांचा आहे मित्रांनो..
याच पार्श्वभूमीवर MSME तर्फे IDEMI, मुंबई येथे आयोजित होणारा “Government Certificate Course on Solar Rooftop Installation” हा 2 दिवसांचा अभ्यासक्रम तरुणाईसाठी एक सुवर्णसंधी आहे.
सोलर पॅनेल बसवणे, मेंटेनन्स, ऑफ-ग्रिड व ऑन-ग्रिड सिस्टीम्स यांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देणारा हा कोर्स फक्त प्रमाणपत्रच नाही तर भविष्यातील उर्जाक्षेत्रातील अमर्याद संधींचं दार उघडतो.
सोलर एनर्जी, ग्रीन जॉब्स, स्टार्टअप्स आणि उद्योजकता – या सगळ्या क्षेत्रात आज सर्वात मोठी मागणी आहे ती प्रशिक्षित आणि प्रमाणित तंत्रज्ञांची!
हा कोर्स म्हणजे उद्याच्या उज्ज्वल करिअरसाठीची गुंतवणूक.
Government Certificate Course on Solar Rooftop Installation (सोलर रूफटॉप इंस्टॉलेशन) प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी व्हा मित्रांनो..
कुठे आणि कधी?
🎓तारीख: 2 आणि 3 ऑगस्ट 2025
🎓वेळ: सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00
ठिकाण:
IDEMI (MSME Technology Centre, Mumbai)
भकतिधाम मंदिर रोड, एव्हरार्ड नगर बस स्टॉपजवळ,
चुनाभट्टी (पूर्व), सायन, मुंबई – 400022
🎓आयोजक:
MSME Technology Center (IDEMI), Ministry of Micro, Small & Medium Enterprises, Government of India
हे केंद्र सरकारी दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
🎓प्रशिक्षणामध्ये काय शिकवले जाईल? (Contents)
हा कोर्स पूर्णपणे सोलर रूफटॉप इंस्टॉलेशन या विषयावर आहे. यात प्रॅक्टिकल डेमो सुद्धा आहे.
1. Solar Basics – सौर ऊर्जा कशी कार्य करते, बेसिक माहिती.
2. Solar system components – पॅनेल्स, इन्व्हर्टर, बॅटरी, वायरिंग, माउंटिंग स्ट्रक्चर्स इत्यादी घटकांची माहिती.
3. Installation techniques – सिस्टीम बसवण्याच्या पद्धती.
4. Selection of materials – योग्य आणि दर्जेदार साहित्य कसं निवडावं.
5. Case study – रिअल लाइफ उदाहरणांवर आधारित विश्लेषण.
6. Off-grid आणि On-grid systems –
Off-grid म्हणजे बॅटरी बेस्ड स्वतंत्र सिस्टीम...On-grid म्हणजे विजेच्या मुख्य लाईनशी जोडलेली सिस्टीम (Net metering).
🎓विशेष आकर्षण:
5 KW Rooftop Solar System चे लाईव्ह डेमो दाखवले जाईल.
🎓कोर्स फी : ₹4500 + 18% GST (अल्पोपहार व जेवण समाविष्ट आहे).
🎓कोण सहभागी होऊ शकतात?
Engineers (इंजिनिअर्स)
Architects (आर्किटेक्ट्स)
Budding Entrepreneurs (नवउद्योजक)
Students (विद्यार्थी)
इतर कोणालाही ज्यांना सोलर इंस्टॉलेशनची आवड आहे.
🎓नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड झेरॉक्स
2. शैक्षणिक कागदपत्रे
3. 2 पासपोर्ट फोटो
🎓संपर्क क्रमांक :
98332 92670
98194 95547
86690 56225
🎓नोंदणी करण्याची सोय:
QR Code (पोस्टरवर दिलेला) स्कॅन करून
किंवा थेट दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून
🎓ही ट्रेनिंग का महत्वाची आहे?
आजच्या काळात सौर ऊर्जा हा भविष्यातील मुख्य ऊर्जास्रोत आहे.
सरकारी आणि खासगी इमारतींमध्ये Rooftop Solar Systems ची मागणी झपाट्याने वाढते आहे.
ग्रीन एनर्जीमध्ये करिअर आणि बिझनेस दोन्हीसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत.
हा कोर्स हँड्स-ऑन ट्रेनिंग देतो, म्हणजेच प्रत्यक्ष इंस्टॉलेशन शिकायला मिळते.
सरकारी प्रमाणपत्र मिळाल्याने करिअर आणि स्टार्टअपसाठी अधिक विश्वसनीयता मिळते.
जर तुम्हाला सोलर क्षेत्रात करिअर किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा 2 दिवसांचा कोर्स एकदम योग्य आहे. कमी वेळेत प्रॅक्टिकल नॉलेज आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट – डबल फायदा..!
मग् मित्रांनो Career oriented program जॉईन करणार ना?
🎓माहिती संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
DR.KALAM GROUP OF EDUCATION AND RESEARCH FOUNDATION PARBHANI.
0 Comments