"शिक्षण ही बुद्धीला धार लावणारी प्रक्रिया आहे."
-प्रा. संतोष झोडपे
प्रथम सत्र परीक्षेच्या स्टडी सर्कल समाप्तीच्या निमित्तानें...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवाराच्या वतीने वर्ग दहावीच्या प्रथम सत्र परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी गेल्या 12 ऑक्टोबर 2024 पासून दररोज तीन सत्रात घेण्यात आलेल्या स्टडी सर्कलच्या समाप्ती कार्यक्रमात, परभणी येथील प्रसिद्ध ज्ञानगंगा महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रिय शिक्षक प्रा. संतोष झोडपे सरांचं विद्यार्थी अभ्यास मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
शालेय शिक्षणात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवताना आपली सामाजिक जाणीव आणि विवेकी विचार जागृत करून प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागचं कार्यकारण भाव समजून घेऊनचं आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तीर्ण कराव्यात..
विज्ञान आणि गणित ह्या विषयाची आवड प्रश्न विचारून करावी जेणेकरून स्वता:च्या बुद्धिमत्तेंचा विकास साधावा..
आपल्या मार्गदर्शनात सरांनी विविध वैज्ञानिक बाबी सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेतांना... त्याला आपल्या स्व:अनुभवाची जोड देऊनचं विषयावर आणि आपल्या ध्येयावर प्रेम करायलं शिकलं पाहिजे असं प्रतीपादन केलं..
विद्यार्थ्यांनीं उत्स्फूर्त प्रतिसाद देतं.. सरांच्या मार्गदर्शनाचा उत्तमरित्या आनंद घेतला..
0 Comments