आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगार क्षेत्राच्या गरजा लक्षात घेता कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने सन 2026 साठी विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.

🎓 ITI आणि कौशल्य प्रशिक्षण का महत्त्वाचे?

पारंपरिक शिक्षणासोबतच उद्योगक्षेत्राला आवश्यक असणारी व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. ITI आणि कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करतात. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी अधिक सहज उपलब्ध होतात.

ITI अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये

महाराष्ट्रातील 1000 हून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) विविध व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहेत.

🎓 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम..

दहावी उत्तीर्ण किंवा काही अभ्यासक्रमांसाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही संधी

Artificial Intelligence, Computer Training आणि Employability Skills यांचा समावेश

On-Job Training आणि Dual Training System ची सुविधा

🎓 शिष्यवृत्ती, टूलकिट, पुस्तक संच आणि इतर शैक्षणिक सुविधा

काही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बारावीच्या समकक्षतेची संधी

अधिक माहितीसाठी वेबसाईट : https://admission.dvet.gov.in


🔰 1265+ कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील संधी..

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळांतर्गत हजारो संस्थांमध्ये विविध प्रमाणपत्र, पदविका आणि प्रगत पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

🎓 प्रमुख क्षेत्रे : 

Manufacturing, Healthcare, Banking and Finance, Agriculture, Automobile, Power Sector, Information Technology, Beauty and Wellness, Media and Entertainment, Hospitality...


या अभ्यासक्रमांची विशेषता म्हणजे शिक्षणासोबत रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी उद्योग क्षेत्रासाठी तयार होतात.

🎓 प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी..

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) योजनेंतर्गत उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्याची संधी उपलब्ध होते. अनेक विद्यार्थ्यांना याच माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार मिळतो. कौशल्याधारित शिक्षणामुळे स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचे मार्गही खुले होतात.

🎓 विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाचं 

आजच्या काळात यशाचा मार्ग केवळ पदवीतून जात नाही, तर कौशल्यातूनही जातो. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य अभ्यासक्रम निवडणे आवश्यक आहे. रोजगाराच्या बदलत्या गरजा लक्षात घेता कौशल्याधारित शिक्षण हे भविष्य घडविण्याचे प्रभावी साधन ठरू शकते.


"हाताला कौशल्य आणि मनात आत्मविश्वास असेल, तर रोजगाराच्या संधींची दारे आपोआप खुली होतात. शिक्षण तुम्हाला ज्ञान देते, पण कौशल्य तुम्हाला ओळख आणि संधी देते."

आजचा विद्यार्थी उद्याचा कुशल व्यावसायिक, उद्योजक किंवा तंत्रज्ञ असू शकतो. त्यामुळे उपलब्ध संधींचा योग्य लाभ घ्या, स्वतःला कौशल्यांनी सक्षम करा आणि आत्मनिर्भर भविष्यासाठी आजच पहिले पाऊल उचला.

अधिक माहितीसाठी वेबसाईट : https://msbsvet.edu.in

टीप :

अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या आणि सर्व पात्रता, अटी, नियम व सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करा, मित्रांनो.

सदर पोस्ट केवळ माहिती व जनप्रबोधनाच्या उद्देशाने प्रसारित करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया, पात्रता, अभ्यासक्रम, शुल्क किंवा इतर कोणत्याही बाबींसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच अंतिम व ग्राह्य मानावी. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरून सविस्तर माहिती घेण्याची विनंती.

धन्यवाद! 

-माहिती संकलन आणि संपादन.. ✍️

-एक शैक्षणिक मार्गदर्शक आणि समुपदेशक..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार

🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन


#ITIAdmission2026 #ITI #SkillDevelopment #SkillIndia #VocationalEducation #TechnicalEducation #EmploymentSkills #CareerGuidance #JobReady #SkillTraining #MaharashtraGovernment #MSBSVET #DVET #IndustrialTrainingInstitute #Apprenticeship #DualTrainingSystem #OnJobTraining #SelfEmployment #Entrepreneurship #FutureSkills #ArtificialIntelligence #ComputerTraining #EmployabilitySkills #ProfessionalCourses #CertificateCourse #DiplomaCourse #AdvancedDiploma #CareerOpportunities #EducationForEmployment #YouthEmpowerment #StudentAwareness #CareerSuccess #MakeInIndia #AtmanirbharBharat #JobOpportunities #TrainingAndPlacement #WorkforceDevelopment #EducationMatters #SkillBasedEducation #VocationalTraining #स्पर्धापरीक्षा #कौशल्यविकास #कौशल्यआधारितशिक्षण #आयटीआय #रोजगार #स्वयंरोजगार #उद्योजकता #तांत्रिकशिक्षण #करिअरमार्गदर्शन #विद्यार्थीमित्र #शैक्षणिकमाहिती #महाराष्ट्रशासन #रोजगाराभिमुखशिक्षण #कुशलभारत #आत्मनिर्भरभारत #युवाशक्ती #उच्चशिक्षण #विद्यार्थीहित #प्रेरणा #शिक्षण #सेवा #प्रबोधन #सामाजिकता #संशोधन #गुणवंतविद्यार्थी #ग्रामीणविद्यार्थी #भविष्यनिर्माण #कौशल्यहाचयशाचामार्ग #हातालाकौशल्य #रोजगारसंधी #उद्योजकबना #कुशलव्यावसायिक #आजचेसंधीउद्याचेयश #StudentLife #LearningForSuccess #CareerGrowth #TechnicalSkills #IndustryReady #FutureProfessionals #TheRadicalHumanist #DrAPJAbdulKalamStudentFoundation #NurturingPotentialThroughEducation #KnowledgeToSkill #SkillToSuccess #EducationAndEmployment #MaharashtraStudents #YouthDevelopment #SkillsForLife #BuildYourFuture #SuccessStartsToday #LearnEarnGrow #EmpowerThroughEducation #SkillsMatter #FutureReady #CareerBuilding #OpportunityForAll