आज 2 मे… बारावीच्या निकालाचा दिवस...!
त्यानिमित्ताने एक सुसंवाद..
अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा उमटली, तर काहींच्या डोळ्यांत अपेक्षा भंगाची धूसर छाया दाटली. हा क्षण फक्त गुणांचा नाही, तर मनाच्या स्थैर्याची, धैर्याची आणि नव्याने उभं राहण्याच्या तयारीची खरी परीक्षा आहे,मित्रांनो..
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
निकाल हा अंतिम सत्य नसतो; तर तो फक्त एका टप्प्याचं प्रतिबिंब असतो. आयुष्याच्या विस्तीर्ण पटावर या गुणांची मर्यादा आहे, पण तुमच्या कर्तृत्वाची मर्यादा नाही.
" आज जे अपूर्ण वाटतंय, ते उद्याच्या यशाची बीजं असू शकतात. अपयशाच्या छायेतूनच यशाचा प्रकाश जन्म घेतो, हे विसरू नका."
दहावी आणि बारावी यांची तुलना करताना आपण अनेकदा वास्तवाकडे दुर्लक्ष करतो. दहावी हा पाया असतो, तर बारावी हा दिशा-निर्देश देणारा टप्पा असतो. या प्रवासात आलेले मानसिक ताण, अपेक्षांचा भार, आणि स्पर्धेची तीव्रता यामुळे काहीवेळा निकाल अपेक्षेप्रमाणे येत नाही. पण याचा अर्थ आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही; तर तो स्वतःला नव्याने घडवण्याचा संकेत आहे.
पालकांनो, या नाजूक वळणावर आपल्या मुलांना समजून घेणं, त्यांना धीर देणं आणि त्यांच्या भावनांचा आदर करणं हीच खरी साथ आहे. गुणांपेक्षा त्यांचा आत्मविश्वास जपणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण आत्मविश्वास हरवला, तर गुणांची किंमत शून्य ठरते.
विद्यार्थी मित्रांनो, करिअरची निवड ही फक्त मेडिकल किंवा इंजिनिअरिंगपुरती मर्यादित नाही. प्रत्येकामध्ये वेगळं कौशल्य, वेगळी आवड आणि वेगळी वाट असते. आपल्या क्षमतांचा, आवडीचा, परिस्थितीचा आणि भविष्यदृष्टीचा सखोल विचार करून योग्य दिशा निवडणं हेच खऱ्या यशाचं मूळ आहे.
याच भावनेतून, Dr. A. P. J. Abdul Kalam Vidyarthi Foundation च्या वतीने दिनांक 12 मे 2026 पर्यंत दररोज मोफत शैक्षणिक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहेत. या सत्रांमध्ये तज्ज्ञांकडून समुपदेशन, करिअर मार्गदर्शन आणि योग्य दिशा निवडण्यासाठी मदत केली जाईल.
या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. शक्यतो पालकांसह उपस्थित राहा, जेणेकरून निर्णय अधिक सुजाण आणि संतुलित होईल.
शेवटी एवढंच…!
हा निकाल तुमच्या प्रवासाचा शेवट नाही, तर एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, धैर्याने पुढे चला, आणि लक्षात ठेवा, " आयुष्याच्या परीक्षेत गुणपत्रिका नाही, तर जिद्द आणि प्रयत्नच खरा यशाचा मापदंड ठरतो."
नांव नोंदणीसाठी : wa.me/+919822624178
-एक शैक्षणिक समुपदेशक आणि सल्लागार
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
0 Comments