🎓 पूर्व तयारी : दहावी बोर्ड परीक्षेचीं...✍️

जिद्द विद्यार्थी घडविण्याची..!!
ज्ञान-संस्कारक्षम बनविण्याची..!!

" विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करताना त्यांच्या विचार भावविश्वात आणि संगतीत खुप साऱ्या नव्या गोष्टीं नव्यानं शिकायला मिळतात." 

सध्याच्या काळात अनेक मुलं 'मोबाईल' च्या आहारी गेल्यानं बऱ्याच विध्यार्थ्यांनीं वर्षभर कोणत्याचं प्रकारचा नियमित अभ्यास केलेला नाहीये असं दिसून येतं आहे मित्रांनो....

मोबाईल आणि इंटरनेट तंत्रज्ञानच्या अतिवापराने सध्याच्या विद्यार्थ्याचा अभ्यासाचा Quality Time हिरावून घेतला आहे, त्यांत पालकांचं प्रत्यक्ष नियंत्रणही कमी झालेलं आढळून येतें..

आमच्या परिसरातील बहूसंख्य विद्यार्थ्यांच्या घरी शैक्षणिक वातावरण उपलब्ध नसते... परीक्षा काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनांसोबतचं समुपदेशनही महत्वाचं असतं.. त्यांच्या अभ्यासात पालकांचं प्रत्यक्ष ( Active Role ) सहभाग हे कमी असल्याने स्टडी सर्कलच्या माध्यमातून दररोज 6-8 तासाच्या अभ्यास नियोजनाने ऐन परीक्षेच्या तोंडावर 'परीक्षाभिमुख ' तयारी आणि अभ्यासाचं सुंदर नियोजन आणि वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमल बजावणीचं त्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करते आहे.


विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास होण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. त्यांना योग्य मूल्यसंस्कार, समाजातील जबाबदाऱ्या, आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता शिकवणे गरजेचे आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच जीवनात आत्मनिर्भर आणि जबाबदार नागरिक होणेही गरजेचे आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन हा शैक्षणिक परिवार.. दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास परीक्षा काळात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक तयारीच करतो असं नव्हे, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आम्ही 'स्टडी सर्कल' च्या माध्यमातून प्रत्यक्ष घटकनिहाय तयारी करण्यासोबतच, प्रत्येक दिवशी नवं काही शिकण्याची प्रेरणा देतो. अभ्यासाची गोडी वाढवण्यासाठी आणि शालेय जीवनातील मूल्यांचा ठसा मनावर उमटवण्यासाठी, या उपक्रमात अनेक गोष्टींचा समावेश करतो आहे.


विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त, वक्तशीरपणा, संवेदनशीलता आणि वेळेचे सुंदर नियोजन शिकवले जाते. परीक्षा काळातील आहार, दिनचर्या, व्यायाम, योगासनं, ध्यानधारणा यांचे महत्व पटवून देऊन त्यांचा समतोल कसा राखायचा हे शिकवले जाते. विद्यार्थ्यांनी विषयांना केवळ वाचनापुरते न ठेवता, त्यात जीवनमूल्ये आणि कौशल्यांची जोड द्यावी, त्यामुळे भावी आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देता येईल, यावर भर दिला जातो.

यासोबतच, परीक्षा काळातील ताण-तणाव व्यवस्थापन, आत्मविश्वास वृद्धी, आणि व्यक्तिमत्त्व विकासाची बीजे शालेय शिक्षणातचं पेरण्यावर आमचा भर असतो. दररोज नवीन प्रेरणादायी उपक्रम, चर्चा सत्रे आणि संवादात्मक कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःला विकसित करण्याची संधी दिली जाते.



हे सर्व संकल्प भावी उद्दिष्टांच्या स्पष्ट नियोजनाशी जोडले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना दीर्घकालीन यशाचा मार्ग सापडेल. शिक्षण केवळ परीक्षांसाठी नव्हे, तर आयुष्य घडवण्यासाठी असते, हा विचार दृढ करण्यासाठी आम्ही या अभ्यास कार्यशाळेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहोत.

"शिक्षण केवळ अभ्यासापुरते मर्यादित नाही..!"

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नाही. त्यांना जीवनमूल्ये, समाजातील जबाबदाऱ्या आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी शिकवणे महत्त्वाचे आहे.


सन 2000 मध्ये एस. के. कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून सुरू झालेला हा ज्ञानयज्ञ, केवळ शिकवण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासाचा मार्गदर्शक ठरला आहे. 2015 पासून, हा संकल्प डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक परिवाराच्या छत्राखाली आणखी व्यापक झाला आणि शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून नव्या उंचीवर पोहोचला आहे मित्रांनो..

आजतागायत, हा उपक्रम केवळ परीक्षेतील यशासाठी नाही, तर विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, विचारशील आणि समाजप्रेमी नागरिक घडवण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे. आधुनिक शिक्षणपद्धती, मूल्यसंस्कार, आणि तंत्रज्ञानाचा समतोल वापर यांचा समावेश करत हा उपक्रम नव्या पिढीच्या जडणं-घडणीसाठी एक प्रेरणास्थान बनला आहे.


विद्यार्थ्यांचा वाढता उत्स्फूर्त सहभाग, पालकांचे विश्‍वासपूर्ण सहकार्य, आणि समाजाचा स्नेहपूर्ण पाठिंबा हाच या उपक्रमाचा खरा आत्मा आहे, जो आम्हाला पुढील वाटचालीसाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देत राहतो! 

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा प्रयत्न अविरत सुरू आहे! 

आपणा सर्वांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षात मिळणारं प्रेमपूर्वक सदिच्छा व शुभेच्छा आणि सहकार्य आम्हांला आमच्या पंखात बळ देणारं आहे मित्रांनो..🙏

धन्यवाद मित्रांनो.. 🙏🏻

🙏🏻 आपलाच विनम्र आणि स्नेहीं मार्गदर्शक: 
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://bit.ly/3G7DCQ6