स्नेही पालक, आदरणीय शिक्षकगण आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

आपल्या प्रेमळ सहकार्याबद्दल आणि विश्वासाबद्दल डॉ. ए. पी. जें. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन हा शैक्षणिक आणि सामाजिक परिवार आपणा सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक आभार मानतो. 

शैक्षणिक वाटचालीत आपण दिलेल्या आधारामुळे आमचे अथक प्रयत्न अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी ठरतात. आपल्या विश्वासाने आणि पाठिंब्याने आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळते, आणि हेच नाते आम्हाला एकत्र बांधून ठेवते.

आपल्या अथक मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे नक्कीच यशाची गंधर्व वाट सुगंधित होणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. दररोज काहीतरी नवं शिकण्याच्या प्रगल्भतेने आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेले प्रत्येक पाऊल, आपल्याला अधिक ऊर्जावान आणि यशस्वी बनवेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

स्व-ओळख, स्व-शिस्त, स्व-नियोजन, वक्तशीरपणा, सकारात्मक विचारसरणी आणि कठीण परिस्थितीला आत्मविश्वासाने तोंड देण्याची वृत्ती , ही आपल्या आयुष्याची खरी शिदोरी आहे. सातत्याने प्रयत्नशील राहणे, अखंड परिश्रमाची तयारी ठेवणे, सत्य आणि जीवनमूल्यांचा पुरस्कार करणे आणि सदैव विद्यार्थी वृत्तीने जीवनाकडे पाहणे ही यशस्वी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे.

विद्यार्थी मित्रांनो, येणारा काळ तुमचाच आहे! या सुवर्णसंधीचे बीजारोपण योग्य वेळी करा आणि जिद्द, आत्मविश्वास आणि कष्टांच्या बळावर तुमच्या स्वप्नांना बहर आणा. आमचे प्रेरणादायी मार्गदर्शन, शिस्तबद्ध संस्कार आणि आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत राहतील.

तुमच्या कर्तृत्वाला गगन ठेंगणे करणारी भरारी मिळो, तुमच्या स्वप्नांना उंच गगनस्पर्शी पंख लाभो, आणि तुमच्या यशाच्या वाटचालीस अखंड उत्साह आणि सकारात्मकतेचे बळ मिळो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा..!

आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार..!🙏

कार्यक्रमाचे फोटो पाहण्यासाठी कृपया खालील लिंकला भेट द्या:



आपला स्नेही आणि आभारी,
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.