🎓 पूर्व तयारी : दहावी बोर्ड परीक्षेचीं...

विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करताना त्यांच्या विचार भावविश्वात आणि संगतीत खुप साऱ्या नव्या गोष्टीं नव्यानं शिकायला मिळतात.

कोरणोत्तर काळात अनेक मुलं 'मोबाईल' च्या आहारी गेल्यानं बऱयाच विध्यार्थ्यांनीं वर्षभर कोणत्याचं प्रकारचा नियमित अभ्यास केलेला नाहीये असं दिसून येतं आहे मित्रांनो....

परीक्षा काळात त्यांना समुपदेशनांसोबत त्यांची प्रत्यक्षात सर्वं विषयांची 'स्टडी सर्कल' च्या माध्यमातून दरदिवशी नवं काही शिकण्याच्या प्रेरणेनें घटकनिहाय तयारी करताना, अभ्यासाची गोडी लावण्यासोबतच शालेय जीवनातील संस्कार,शिस्त, वक्तशिरपणा, संवेदनशीलता, वेळेचं सुंदर नियोजन, परीक्षा काळातील आहार, विहार, व्यायाम, योगा, ध्यान-धारणा,एकमेकांशी सौजन्याने वागणे, विषयाचं महत्व केवळ वाचन पुरता नं ठेवता त्याला जीवन विषयक मूल्यांची जोड कशी द्यावी आणि त्यातून जीवन-कौशल्य विकसित करावं , भावी काळात विविध संकटाना आणि आव्हानांना तोंड देताना शालेय शिक्षणातचं आपल्या क्षमता कश्या विकसित करावं, परीक्षा काळातला ताण-तणाव व्यवस्थापन कसं करावं,व्यक्तीमत्व विकासाचीं बीजे ह्याच काळात कशी पेरावी, दररोज एक नवी प्रेरणादायी ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातुन स्वतःला कसं विकसित करावं,.. ई.. आदी भावी उद्देश काल सुसंगत पद्धतीने कशी आखावी आणि त्याची अंमलबजावणी केली तर आयुष्यात दीर्घ कालीन यश कसं मिळवता येऊ शकेल ह्याचा प्रयत्न आम्ही ह्या अभ्यास कार्य शाळेच्या माध्यमातून करतोय मित्रांनो..

सन 2000 ला एसके कोचिंग क्लासेसच्या माध्यमातुन सुरु झालेला हा संकल्प 2015 पासून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात आजतायागत अविरतपणे सुरु आहे.

दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा मिळणारा उदंड प्रतिसाद आणि पालकांचं उत्तम सस्नेह सहकार्य हें आमच्या संकल्प सिद्धीला परीपूर्ती करणारा आहे.

आपणा सर्वांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षात मिळणारं प्रेमपूर्वक सदिच्छा व शुभेच्छा आणि सहकार्य आम्हांला आमच्या पंखात बळ देणारं आहे.

धन्यवाद मित्रांनो.. 🙏🏻

🙏🏻 आपलाच विनम्र: 
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.