डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन आणि माझ्या कुटूंबाला आपण दिलेली कालची सदिच्छा भेट आम्हां सर्वांसाठी एक वैचारिक पर्वणी ठरली आहे..




कालचा पूर्ण दिवस आपल्या सोबत असताना विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, संस्था आणि व्यक्तीच्या स्नेह भेटी- गाठीत त्यांचा आपल्या प्रती असलेला आदरभाव आणि वैचारिक प्रेम हें आपल्या कार्याची सर्वोत्तम पोच-पावती असल्याचा प्रत्यय आणि जाणीव दिसून आली.

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना सामाजिक सुधारणेचे प्रणेते आणि प्रेरणास्थान मानत हमीद दलवांईनीं 1968-70 च्या काळात Indian Secular Society नंतर मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करुन अखिल भारतीय मुस्लिम समाजाला 'संविधानिक' लोकशाही धर्मनिरपेक्ष तत्वावर आधारित आधुनिक मानवी आणि शास्वत जीवन मूल्यांचा पुरस्कार करीत मुस्लिम समाजात प्रबोधनाची सुरुवात करुन त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि सर्वोतोपरी पायाभूत विकासाची मुहूर्तमेढ रोवली..



समकालीन काँग्रेस सेवादल आणि आताच्या एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सह इतर पुरोगामी चळवळीतल्या सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष मित्रांच्या स्नेह-सहकार्याने कार्यान्वित असलेल्या मुस्लिम समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला हमीद दलवांईच्या वैचारिक कार्याला संघर्षरत आणि प्रचंड अभ्यासू कर्तृत्व असलेले प्रा.डॉ.शमशुद्दीन तांबोळी सरांसारखे नेतृत्व लाभले,ज्यांनी ह्या कार्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तुंग उंची आणि एक नवी दिशा आपण दिली आहे.



'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' अशी ओळख असलेल्या माझ्या परभणी जिल्ह्याचे आपण भूमीपुत्र आहात..ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो..आपलं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण परभणीत झालेलं असून, आपणास कर्तृत्व-ज्ञान संपन्न शिक्षकांचे संस्कार आणि कै.शिवाजी दळणार सरांसारखे अनेक नामवंत आणि प्रसिद्ध कवी-लेखक तसेंच राजकारणी मित्र लाभले आहेत..



गंगाखेड तालुक्यातील 'राणी-सावरगाव' ह्या आपल्या गावी स्नेह भेटीत आल्यानंतर आपल्या वैचारिक आणि सामाजिक संस्कारांचा प्रत्यय दरवेळी आपल्या वॉल पोस्ट वरील लेखात अनुभवता येतोचं..

सध्यास्थितीत प्रखर राष्ट्रवाद,पोकळ देशा-भीमान, असहिष्णूतता, धार्मिक-विद्वेष, राजकीय अस्थिरता, कट्टर धर्मांधता, समाज माध्यमांतली द्वेष-विषवल्ली ह्या सर्वामुळे मुस्लिम समाजाला नाहक अनेक ठिकाणी लक्ष्य केलं जातं.. पण ह्या सर्वानां वैचारिक पातळीवर खऱ्या अर्थाने संविधानिक मार्गानी आपली न्यायी बाजू अत्यंत परखडपणे आणि विवेकी दृष्टीकोनातून मांडण्याचं कार्य आपण करीत आहात ह्याचा सार्थ अभिमान आणि प्रचंड आदर वाटतो.

सन 2014 पासून आपलं लेखन आणि लोकसत्ता मधील विविध लेखाच्या संपादनातून आणि विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्या वैचारिक उंचीचा प्रत्यय आम्हांस नेहमीच येतो.

डॉ.कलामांच्या जयंती औचित्त्याच्या आणि वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आम्ही सुरु केलेल्या जन वाचन चळवळीची आपण सन 2018 साली प्रत्यक्ष घेतलेली नोंद आणि प्रत्यक्षात फोनवर केलेले कौतुक हें माझ्यासाठी एक प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शक ठरली आहे.



मी आपल्याच स्नेह-मार्गदर्शनातून पुरोगामी चळवळीत आलो आहे.. वेळोवेळी आपण करीत असलेलं मार्गदर्शन मला नेहमीच प्रोत्साहन देतं.

काल आपण माझ्या विध्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांना प्रश्न विचारण्याची एक विवेकी ASK Method सुंदर पद्धतीने सांगताना त्यांनीं चिकित्सक वृत्ती कशी जोपासावी आणि त्यातून आपला बौद्धिक आणि मानसिक विकास कसा साधावा ह्याची त्रीसूत्री आपण दिली.

आमच्या फाउंडेशन मित्र परिवारातील शिक्षक गण साथी आणि मित्र मंडळीना आपण एक वैचारिक मेजवाणी दिली आहे..

आपण आमचा यथोचित आदरतिथ्य स्वीकारून आम्हांस जी संधी दिली त्याबद्दल अगदी दिल सें धन्यवाद.🙏🏻

आपण करीत असलेल्या कार्याबद्दल आम्हांस प्रचंड आदर आणि अभिमान सर.



कालच्या भेटीत एका फोनवर आलेले आपले माजी विद्यार्थी आणि माझे गुरु-मित्र प्रा. डॉ. रफी शेख (जवळा बाजार, हिंगोली ), आमचे लाडके आणि स्नेहीं युवामित्र शिवश्री अमोल लांडगे, (परभणी युवा मंच ग्रुप ), आमचे बालमित्र बालाजी येडके सह जिवलग मित्र प्रा. तेजस कांबळे (ज्ञानोपासक वरिष्ठ महाविद्यालय, जिंतूर ), पुरोगामी चळवळीतील मार्गदर्शक मित्र शिवश्री नितीन सांवत (मानव मुक्ती मिशन ), डॉ. सुनील जाधव सर ( सामाजिक कार्यकर्ते ),
मा. मुंजा कांबळे सर , महा-अंनिस परभणी शाखेची सर्वं टीम, प्राचार्य विठ्ठल घुले सर सह आलेला प्राध्यापक वर्ग.. ई.. आदी नीं वेळात वेळ काढुन सरांचा जो आदर आणि सन्मान केला त्यांचेहीं अगदी मनापासून हार्दिक आभार.🌹🙏🏻

धन्यवाद.🙏🏻
🙏🏻 आपलाच विनम्र स्नेहाकिंत आणि आभारी :🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹