भारतीय संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थापित होताना मानवी हक्कांची आणि चिरंतन मूल्यांची ग्वाही देतो, ती संविधानिक मूल्ये समाजातल्या प्रत्येकांमध्ये रुजविण्यासाठी, आपल्या हक्क व अधिकाराबाबत जागरूक व आग्रहीं असण्यासाठी, संविधानाचा हा निश्चय व निर्धारासाठी तसेंच सामाजिक व आर्थिक न्यायासाठी संविधान जन-जागृती रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

संविधान जागृती रॅलीत व सभेत सहभागी होण्याचे आवाहन..
सर्व परभणीकर, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, संविधान प्रेमी यांना संविधान जागृती अभियान परभणी अंतर्गत मुख्य संयोजक अॅड.अमोल गिराम आणि समन्वयक विद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख यांच्या वतीने व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सस्नेह आवाहन करण्यात येते की, येत्या 26 नोव्हेंबर 2022 ला भारतीय संविधान स्वीकृत होऊन 73 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी दिनांक 26 नोव्हेंबर ला संविधान दिनी परभणी शहरात संविधान जन-जागृती रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व हितचिंतकानी आपला या संविधान जन-जागृती रॅली व जाहीर सभेत सहभाग नोंदवून या ऐतिहासिक सामाजिक कार्यक्रमाचे साक्षीदार होऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
संविधान जन-जागृती रॅली व जाहीर सभा कश्यासाठी..?
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यात आपल्या देशाचा राज्य कारभार सुरळीत व सुव्यस्थित सर्वसामान्य नागरिकांचे हित, विविध अधिकार, संरक्षण, समानता, सामाजिक हक्क, शैक्षणिक हक्क, राजकीय हक्क अशा अनेक बाबींचा विचार करून भारतीय संविधान ची निर्मिती करण्यात आली. दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला व त्याची दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण भारतात अंमलबजावणी करण्यात आली.
परंतु भारतीय संविधान विषयी अनेक नागरिकांना पूर्ण पणे माहिती नसल्यामुळे व योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ते आपल्या हक्कांपासून, अधिकारापासून वंचित राहिले आहेत. त्याच बरोबर आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी 'भारतीय संविधान' ची सर्वांनाच माहिती असणे आवश्यक आहे.

1) आपल्या मूलभूत हक्कासाठी.
2) अन्यायाविरुद्ध सशक्त लढा देण्यासाठी.
3)समाजाच्या तसेच आपल्या संरक्षणासाठी.
4)समाजात सन्मानाने प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी.
5)उज्वल भविष्यासाठी.
6) प्रशासनाला जाब विचारण्यासाठी.
7)देशाच्या, समाजाच्या व स्वतःच्या विकासासाठी.
8) विशिष्ट माहिती मिळविण्यासाठी....
अशा अनेक बाबींच्या माहितीसाठी या संविधान जन-जागृती रॅली व जाहीर सभेत सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे.

सहभागी व्हा मित्रांनो..!

आपल्या संविधानिक न्याय व हक्कांच्या जागृतीसाठी...
संविधान जन -जागृती रॅलीत..

आपलं स्वागत...
त्याच बरोबर या संविधान जन-जागृती रॅली व जाहीर सभेत अनेक संविधान अभ्यासक व विचारवंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात सहकार्य करावे....

प्रमुख उपस्थिती :
1) न्या. उज्ज्वला नंदेश्वर
(प्रमुख जिल्हा न्यायाधीश, परभणी)
2) मा. आंचल गोयल
(जिल्हा अधिकारी, परभणी )
3) प्रा. डॉ.मिलिंद आव्हाड
(JNU Delhi, तथा राष्ट्रीय अध्यक्ष मानवी हक्क अभियान )
4) न्या. एस. जी. लांडगे
( सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी)
दिनांक : 26 नोव्हेंबर 2022
वेळ : सायंकाळी 4:00 वाजता
ठिकाण : जिल्हा न्यायालय परभणी.
सभेचे ठिकाण : राजगोपालचारी उद्यान, वसमत रोड परभणी.
🎓
सहभागी संस्था आणि संघटना :🫱🏻‍🫲🏻
1) शिवश्री अमोल लांडगे - 8624845180
( परभणी युवा मंच, परभणी )
2) मा. गोविंद गिरी - 9767700940
( जिल्हा अध्यक्ष - स्वराज इंडिया )
3) प्रा.नितीन लोहट -
(जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी.)
4) इंजिनिअर भीमप्रकाश गायकवाड- 8378096411
('मूकनायक' परभणी.)
5) मा. वहीद पटेल - 9595901919
(मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, महाराष्ट्र )
6) मा. राजू उदावंत - 9970689973
(जिल्हा अध्यक्ष : परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन ऑफ महाराष्ट्र )
7) मा. मोईज अन्सारी -
(सामाजिक कार्यकर्ते आणि संविधान अभ्यासक, परभणी.)

8) सय्यद रफीक पेडगावकर - 9503757000





(मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (MDO)- सामाजिक संघटना, परभणी)
9) मा. मुंजाजी कांबळे- 9403268454
(अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परभणी जिल्हा शाखा )
10) डॉ.चंद्रकांत गांगुर्डे- 9226164468
(अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परभणी जिल्हा शाखा )
11) प्रा.डॉ. प्रवीण कंनकुटे- 8308669443
(सामाजिक कार्यकर्ता, परभणी. )
12) मा. राहुल वहीवाळ- 7448064648
(Parbhani Radio FM 90.
13) प्राचार्य सारंग साळवी-
(समाज कार्य महाविद्यालय, परभणी.)
14) डॉ. सुनील जाधव - 9890486577
(सामाजिक कार्यकर्ते,परभणी.)
15) मा.प्रमोद अंभोरे
(सामाजिक कार्यकर्ते ,समाजहित प्रतिष्ठान ,परभणी)
16) मा.पप्पूराज शेळके
(जिल्हाध्यक्ष , मानवी हक्क अभियान ,परभणी )
17) मा.जाकीर सय्यद
(जमाते-ए-इस्लामी हिंद ,परभणी. )
18) मा. माणिक जव्हार
(संघर्ष करिअर अकॅडमी ,परभणी. )
19) मा.अझीम खान
(स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायजेशन ,परभणी. )
20)मा. विठ्ठल कांगणे
(स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी ,परभणी. )
21) मा.रणजित कारेगांवकर
(संभाजी ब्रिगेड ,परभणी. )
22) कॉ. दत्ता चव्हाण
(संविधान प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते )
23) ऍड. संदीप माटेगांवकर
( सामाजिक कार्यकर्ते, परभणी)