slider

" Dr. A.P.J Abdul Kalam Vidhyarthi Foundation is founded by Rafikh Shaikh with their students in Parbhani. It is a non-profit and non-religious organization working for drought affected students , underprivileged children - orphaned, abandoned, destitute, economically backward and other vulnerable groups.Our mission is to change lives of such children - by providing them the educational help and support. This includes basic needs, education and skills necessary to transform them into responsible citizens to develop the nation.."

🎓 कोरोना काळातील शिक्षणाचं मूल्यांकन-एक विचित्र पेच..?

कोरोनाच्या संसर्गामुळे उद्योगधंदे आणि अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहेत मात्र त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अतोनात हाल  झाले आहेत..या महामारीने जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रावर विपरीत दुरागामी परिणाम केले आहे, ह्याची भविष्यकालीन दाहकता न विचार केलेली बरी...!

यंदा पहिलीत असलेले विद्यार्थी तर शाळेत गेलेच नाहीत आणि शिक्षकांना थेट न भेटताच दुसऱ्या इयत्तेत गेले आहेत..!

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले आहे, गणितासारख्या विषयातील संकल्पना ऑनलाइन समजून घेताना त्यांना त्रास झाला आहे व त्यामुळे या विषयात ते भविष्यात मागे पडण्याची भीती शिक्षण प्रेमी  व्यक्त करीत आहेत...

दहावीच्या परीक्षा केंद्रीय बोर्डाने (CBSE) रद्द केल्या आहेत व आता महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ..

परीक्षा होणार अथवा नाही ह्या संदर्भात संदिग्धता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासा विषयी प्रचंड गोंधळाची स्थिती होती..

त्याहीपेक्षा विचित्र अवस्था सरसकट परीक्षा न देता सगळयांना पास धोरणामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवान आणि  गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांनावर होणार आहे..

सगळयांनाच पास करतांना त्यांच्या अंतर्गत मूल्यांकनांचा निकष लावताना शाळेची मनमानी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी ठरेल, शिक्षण मंडळाने त्यांच्या योग्य मूल्यांकनासंदर्भात सर्वांना समान न्याय मिळेल असे धोरण निश्चित करूनच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा मार्ग सुकर करावा..

केंद्रीय परीक्षा मंडळाने 'सातत्य पूर्ण अंतर्गत मूल्यमापनाच्या ' आधारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे,त्यांची व्याप्ती, स्वरूप ,मूल्यांकन पद्धत भिन्न असली तरी, राज्य-परीक्षा मंडळाने सर्वच पर्यायाचा खुला वापर करीत विद्यार्थ्यांच्या माथी 'कोविड बॅच चा' विद्यार्थी असा नकारत्मक शिक्का भविष्यात बसणार  नाही ह्याचा पुनर्विचार करणे गरजेचं आहे..

बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास किती करावा तो कधी पूर्ण करावा व सराव कधी करावा याबद्दलही त्यांच्या मनात संभ्रम अवस्था आहे..

पदवी मिळवूनही कोरोना काळातील परीक्षा ऑनलाइन देऊन पास झालेला उमेदवार म्हणून भविष्यात नोकरी मिळवण्यात अडचणी येण्याची भीती या विद्यार्थ्यांना आहेत..

वर्षभरात झालेले नुकसान प्रचंड मोठे असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसाना बरोबरच त्यांचे मोठे मानसिक नुकसान झाले आहे..

कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका पाहता यंदाचे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष कसे सुरु होईल व ते कसे पुढे सरकेल याबद्दल अद्यापही अनिश्चितता कायम असताना येणाऱ्या काळात सातत्यपूर्ण अंतर्गत मूल्यमापन, स्वयं-अध्ययनाला प्रोत्साहन, शैक्षणिक लवचिकता, स्वायत्तता, मेंटार पद्धत,मुक्त-शिक्षण प्रणालीचा स्वीकार,ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण, Open Schooling,  ई. आदी पर्यायांचा अग्रक्रमाने विचार करणे गरजेचे राहील असं मला वाटतं..

धन्यवाद..
एक शिक्षण प्रेमी..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com/?m=1

Post a Comment

0 Comments