डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन तर्फ़े दहावीच्या विद्यार्थ्यांना दररोज 8 तास स्टडी सर्कल आयोजित करण्यात येते.. ह्या शैक्षणिक सामाजिक उपक्रमास मिळणाऱ्या उदंड प्रतिसादाबद्दल काल एक व्हिडिओ हसत खेळत विनोदात्मक शैलीत फेसबुकवर शेअर केल्यानंतर , आपणां सर्वांनी जो स्नेह-प्रेम आणि सदिच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो..

आज संध्याकाळी ठीक 6:30 वाजता परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजू शिंदे सरांनी आपल्या ह्या उपक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी फोन केला आणि मी लगेच त्यांना होकार दिला ..अवघ्या 15 मिनिटांत सर प्रत्यक्षात आमच्या शैक्षणिक परिवार सदनात..!

आम्हांस एक सुखद आश्चर्यकारक धक्काचं..!

सामाजिक बांधिलकी जपत कठोर परिश्रम आणि प्रामाणिकतेने केलेल्या कार्याची ही दखल आमच्या उत्साहाला प्रेरणेचे पंख देणारी उल्लेखनीय बाब आहे..ह्याचा आम्हांस सदैव आनंदचं..
आदरणीय श्री. राजू शिंदे सरांनी आमच्या कार्याची घेतलेली दखल आणि आपल्या व्यस्ततेतून आम्हांस दिलेली सदिच्छा भेट ही आम्हांस एक ग्रेट पर्वणीच ठरली..

ह्या भेटीत आपण आमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांना चालू असलेल्या परीक्षेसाठी शुभेच्छा आणि पुढील भावी वाटचालीस दिलेल्या हार्दिक सदिच्छा ह्या आमच्या कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत ह्यात शंकाच नाही..

आपले मनःपूर्वक हार्दिक आभार सर
आपला स्नेह आणि प्रेम असंच आमच्या सोबत असू द्या ही विनंती..
धन्यवाद सर...

आपलाच विनम्र स्नेही आणि आभारी..
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख..
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.