एक शैक्षणिक-सामाजिक उपक्रम..

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन शैक्षणिक परिवारातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर , आपली पुस्तकं समाजातील गोर-गरीब आणि गरजु विद्यार्थ्यांना दान करण्याचा एक क्रांतिकारक संकल्प केला आहे..

आठवी ते दहावी वर्गाच्या जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या पूर्व-संमतीनें आपल्या शाळेतील आणि जवळपास असलेल्या काही गोर-गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यासाठी जो पुढाकार घेतला त्या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून कौतुक आणि हार्दिक आभार..🤝🏻🌹

शालेय शिक्षणापासुनचं विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवत, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न या पुस्तकं दान संकल्पनेतून नक्कीच सार्थ होईल अशी आशा बाळगूया मित्रांनो..

 डॉ. ए.पी.जे.अब्दुल्ल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक-सामाजिक कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत आपल्या विविध नवं-शैक्षणिक उपक्रमाच्या प्रयोगातून संविधानात्मक मूल्य जोपसण्यासाठी नेहमीच कार्यक्रम आयोजित केले जातात..

आम्हीं ज्या परिसरात हा विद्यार्थी मित्र परिवार चालवतो तेथील जागरूक पालक, स्नेही-मित्र,समाजसेवक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक मित्र, आजी-माजी विद्यार्थी, शाळेतील काही उपक्रमशील शिक्षक आणि नागरीक ह्या सर्वांचं नेहमीच सहकार्य लाभतं..

शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रातल्या ह्या नव्या संकल्प-प्रयोगाचं नक्कीच आपण स्वागत कराल आणि सहकार्य ही कराल ही अपेक्षा बाळगतो..

धन्यवाद:

🙏🏻 आपलाच विनम्र आभारी
#विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹