🎓 बोर्ड परीक्षेला जाता जाता लास्ट मिनिट काही खास टिप्स...✍🏻

शैक्षणिक वर्ष 2023-24 ह्या सत्रातील दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे मित्रांनो....तुमचा अभ्यास तर पूर्ण झाला असेलच. पण परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाबरोबरच आणखी काही गोष्टीही लक्षात ठेवणं जरुरीचं असतं.

 तुमच्या परीक्षेच्या या तयारीत आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोतच..☺️

चांगले मार्क्स मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही लास्ट मिनिट टिप्स..👌🏻

🔰 अभ्यास आणि आहार:

परीक्षेच्या काळात अभ्यासापासून ते खाण्यापिण्यापर्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स..

📚 तुम्हाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांची उजळणी करा.

📚 सगळा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात हा वेळ घालवू नका.

📚 मोठ्या प्रश्नांची उत्तर लक्षात राहावीत म्हणून ती समजून घ्या.

📚 एकावेळी एकाच विषयाची उजळणी करा.

📚 एकाच प्रश्नावर फार वेळ रेंगाळत राहू नका.

📚वाचन किंवा फक्त लिखाण या दोन्ही गोष्टी करण्यावर भर द्या.

📚 रोज अभ्यासाला सुरवात करताना तुमच्या आवडत्या विषयाने करा. त्यामुळे ताण येणार नाही.

📚 एखाद्या विषयाचं टेन्शन आलं की झालेल्या अभ्यासाची उजळणी करा. त्यामुळे ताण हलका होतो.

📚 परीक्षेच्या आधी आणि परीक्षा सुरू झाल्यावरही रोज किमान पंधरा मिनिटं व्यायाम करा.

📚 रोज आठ तास झोप घेणं आवश्यक आहे.

📚 या काळात मित्रमैत्रीणींशी चर्चा करणं टाळा.

📚 फळ किंवा ज्यूस जास्तीत जास्त वेळा घ्या. चहा-कॉफी फार प्रमाणात घेऊ नका.

🔰 परीक्षेच्या वेळी...✍🏻

📋 पेन, पेन्सिल, हॉल तिकीट आणि महत्त्वाचं सगळं सामान आपल्या बॅगेत नीट ठेवा.

📋 डोकं शांत ठेवा. कोणत्याही कारणाने गोंधळ घालून घेऊ नका.

📋 परीक्षेच्या पहिल्या दिवसा अगोदर पुरेशी झोप घ्या.

📋 परीक्षा हॉलमध्ये जाताना मित्रमैत्रीणींना शुभेच्छा द्या. अभ्यासाविषयी चर्चा करू नका.

📋 परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर शेवटच्या मिनिटापर्यंत वाचत राहू नका.

📋 पेपर लिहिताना इतर गोष्टींचा विचार न करता शांत मनाने पेपर लिहा.

📋 संपूर्ण पेपर सोडवून झाल्याशिवाय उत्तरपत्रिका वाचू नका.

📋 एकाच प्रश्नात खूप वेळ अडकू नका.

📋 पेपर सोडवून झाल्यावर येत नाही तो प्रश्न आठवून पाहण्याचा प्रयत्न करा.

📋 बोर्डाचे हेल्पलाइन नंबर जवळ असू द्या.

🔰 परीक्षेच्या काळात सुट्टी असेल तर..✍🏻

✔ या काळात नंतरच्या विषयांमधल्या न झालेल्या धड्यांचा अभ्यास करा.

✔ कंटाळून जाऊ नका. थोडा वेळा गाणी ऐका.

✔ खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा.

✔ जागरणं करणं टाळा.

✔ सलग अभ्यास करू नका.

✔ फोनवर गप्पा मारत राहू नका.

✔ मोबाईल फोनवर गेमिंग, सोशल मीडिया नको ते चॅट्स टाळा.

🔰 पालकांसाठी...✍🏻

😀 टेन्शन घेऊ नका आणि मुलांनाही देऊ नका.

☺ घरातलं वातावरण हलकंफुलकं राहू द्या.

😀 होऊन गेलेल्या पेपरविषयी चर्चा करू नका.

😄 मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करा.

✔ उजळणी करा..🎓

दहावीचं वर्ष म्हटलं की अगदी शेवटची परीक्षा संपता संपताच अभ्यासाला सुरवात होते. मग वर्षभर पाठांतर, ठरवलेला अभ्यास, क्लासेस, आई बाबांचे आणि शिक्षकांचे सल्ले आणि दरदिवशी थोड्या बहुत प्रमाणात येणारं टेन्शन. असं सगळच अंतिम परीक्षा होईपर्यंत सुरू असतं. मग नेमकं काय करायचं असे अनेक प्रश्न ऐनवेळी पडतात. 

📚 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केलेल्या अभ्यासाबाबत आत्मविश्वास ठेवा.

📚 झालेल्या अभ्यासाची उजळणी करा. सगळा पोर्शन करण्यापेक्षा महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्या.

📚 कठीण वाटणाऱ्या प्रश्नांचा सराव करा. त्याचं टेन्शन घेऊ नका.

📚 लिखाण आणि वाचन असं दोन्ही करा.

📚 परीक्षेच्या पहिल्या दिवशी तुमचा सीट नंबर, हॉल तिकीट, बारकोड स्टीकर या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक तपासून घ्या.

📚 परीक्षेच्या वेळी फक्त पेपर लिहिण्याकडे लक्ष द्या. एखादं उत्तर किंवा गणित अडलं तर तिकडे अडकून न राहता पुढचे प्रश्न सोडवायला घ्या.

📚 सगळा पेपर सोडवून झाल्यावर अडलेले प्रश्न सोडवायला घ्या.

📚 इतिहास, भूगोल किंवा शास्त्रीय कारणं लिहिताना सलग उत्तर न लिहिता ती मुद्देसूद लिहा.

📚 शाळेतल्या तसेच महाविद्यालयातील शिक्षकांनी सांगितलेली आणि त्यांनी सूचना केल्याप्रमाणेच उत्तर लिहा.

📚 तुम्ही वर्षभर ज्याप्रमाणे पेपर सोडवण्याचा सराव केलाय त्यात विश्वासाने पेपर सोडवा.

📚 उत्तरपत्रिका स्वच्छ लिहा. प्रत्येक प्रश्न सुटसुटीत लिहा. प्रश्न क्रमांक योग्य लिहा.

📚 उत्तरपत्रिका डेकोरेटीव्ह करण्यात वेळ घालवू नका.

📚 महत्त्वाची परीक्षा म्हणून कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा ताण घेऊ नका.

📚 प्रत्येक पेपरच्या आदल्या दिवशी शिक्षकांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी करा.

📚 इतरांशी स्वत:ची तुलना करू नका. स्वत:च्या अभ्यासावर विश्वास ठेवा.

📋 परीक्षेला जाता जाता...✍🏻

परीक्षेला जाताना काही तांत्रिक गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. त्याबाबतच्या स्पेशल टिप्स....

📋 हॉलतिकीटावरचा सीट नंबर अंकी आणि अक्षरी पाहून उत्तरपत्रिकेवर लिहा.

📋 बारकोडवरचा नंबर तपासून घ्या.

📋 अडचण असल्यास पर्यवेक्षकांचं मार्गदर्शन घ्या.

📋 उत्तरपत्रिकेची पानं नीट तपासून घ्या.

📋स्वत:ची सही करायला विसरू नका.

📋 पुरवण्या घेतल्यास त्यावर सीट नंबर टाकायला विसरू नका.

📋 सगळ्या पुरवण्या क्रमानेच बांधा.

📋 पुरवणी नीट बांधा पण खूप घट्ट बांधू नका.

📋 पेपर लिहून झाला की उत्तरपत्रिका देण्याआधी त्रुटी राहिल्यास सुधारा.

📋 संपूर्ण उत्तरपत्रिका वाचून घ्या.

📋 सगळ्या शब्दांवर शिरोरेषा द्यायला विसरू नका.

📋 ब्युटी, अॅक्युरसी, स्पीड या तीन गोष्टींवर लक्ष द्या.

📋 उपप्रश्न आणि मुख्य प्रश्नांचे क्रमांक कटाक्षाने नीट टाका.

📋 एक प्रश्न हातात घेतला की तो संपूर्ण सोडवा.

📋 अक्षर मोकळंं आणि सुवाच्य काढा.

📋 खाडाखोड करताना गचाळपणा करू नका.

📋 एकाच शाईचं पेन वापरा.

📋 अधोरेखनासाठी फक्त पेन्सिल वापरा.

📋 उत्तरें नेमकी लिहा.

📋 वेळेचं नियोजन करा. शेवटची दहा मिनीट हातात राहतील अशा स्पीडने पेपर सोडवा.

📋 दोन पेन्सिली, चार पेन, स्वच्छ खोडरबर, मोठी आणि छोटी पट्टी, शार्पनर अशा गोष्टी बरोबर ठेवा.

🥵 परीक्षेची भीती कशाला?🤓

अभ्यास झालेला असतांनाही आपल्यापैकी काहीजण आत्मविश्वास गमावून बसतात. काही निराश, नाउमेद होतात, तर काही आजारी पडतात. काही कॉपी करण्यास प्रवृत्त होतात. काही स्वत:ला घरात कोंडून घेतात तर काही पळून जातात. काहीजण स्वत:चा लाखमोलाचा जीवही गमावून बसतात. असं होऊ नये म्हणून...

📚 इतरांशी तुलना न करता स्वत:तील गुण, क्षमता आणि मर्यादा ओळखून स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा. प्रेरणा देणारी चांगली पुस्तके वाचावी.

📚 दिवसभराचे वेळापत्रक बनवावं. शाळा, अभ्यास, खेळ, वाचन आणि मनोरंजन यांची छानशी सांगड घालावी.

📋 वर्षभरातील सर्व परीक्षांची माहिती घेऊन वेळोवेळी त्यांच्या नोंदी ठेवाव्या.

📋 'अभ्यास कसा करावा' याचे तंत्र आत्मसात करावं. अभ्यासातील शंका, अडचणी यांचं निरसन करून घ्यावं.

📋 अभ्यासात सातत्य, एकाग्रता, सराव, जिद्द ठेवावी आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जावं.

🥺 अपेक्षांचं ओझं नको..!

दहावी आणि बारावी परीक्षेतील मुलांचे गुण, हे काही पालक आपल्या प्रतिष्ठेचा विषय बनवतात. मुलांची परीक्षा ही आपलीच परीक्षा असल्याप्रमाणे परीक्षेचं ओझं आपल्या शिरावर घेतात आणि घराचं स्वास्थ्य घालवून टाकतात. काही पालक मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात तर काही दुर्लक्ष करतात.

🔰 आपल्या मुलांची इतरांशी तुलना करू नये किंवा त्यांची अवहेलना करू नये.

🔰 मुलांना त्यांचं वेळापत्रक बनवण्यास मार्गदर्शन करावं. वेळोवेळी सुसंवाद साधून त्यांना मदत करावी.

🔰कौटुंबिक वातावरण सकारात्मक, आनंदी आणि उत्साही राहील असं कटाक्षाने पाहावं.

🔰 मुलांच्या अभ्यासामध्ये अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यांच्या आरोग्याकडे पुरेसं लक्ष द्यावं.

🔰 परीक्षेचा बाऊ करून मुलांना अधिक ताण देऊ नये. तसेच फाजील लाडही करू नये.

🌷 परीक्षेच्या तयारिसाठी मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो.🌹

आपलाच स्नेही आणि मार्गदर्शक..🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻