🎓 प्रिय स्नेहीं विद्यार्थी मित्रांनो…
दहावीचं वर्ष... शालेय जीवनातील सुवर्णक्षण..!
हे केवळ शालेय शिक्षणाचं शेवटचं वर्ष नाही, तर आपल्या आयुष्याच्या वाटचालीतील एक निर्णायक टप्पा आहे.
बोर्ड परीक्षा म्हणजे फक्त गुणांचं गणित नव्हे, ती आहे तुमच्या मेहनतीची, कणखर इच्छाशक्तीची आणि स्वप्नांची कसोटी.
हे वर्ष तुमच्या संघर्षमय जीवनात नवसंजीवनी देणारं आहे,
तुमच्या अस्तित्वाला दिशा आणि ध्येय देणारं आहे.
जितकी प्रामाणिकता, तितकाच परिश्रम, आणि त्याहून अधिक यश हेच सूत्र आहे, मित्रांनो..!
🚀 याच प्रवासात, तुमच्या यशाला साद घालणारा एक विशेष सहप्रवासी...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचा हा शैक्षणिक उपक्रम!
– जो देईल योग्य मार्गदर्शन, प्रगल्भ विचार, आणि विश्वासार्ह साथ.
आता हे यशाचं स्वप्न साकार करण्यासाठी, वेळेचं व्यवस्थापन हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे.
📅 त्यासाठी खालील 'यश मंत्र' लक्षात ठेवा मित्रांनो... ✍️
1️⃣ वर्षभर शाळा, क्लासेस आणि स्वतःचा अभ्यास यांचं काटेकोर नियोजन ठेवा.
2️⃣ वेळेचा अपव्यय टाळा; प्रत्येक क्षण महत्वाचा आहे.
3️⃣ शरीर आणि मनाचं आरोग्य जपा – योग्य आहार, पुरेशी झोप आणि थोडं खेळणंही आवश्यक आहे.
4️⃣ जबाबदारीने आणि शिस्तबद्धपणे वागा; आजची सवय उद्याचं आयुष्य घडवते.
5️⃣ पालकांशी नियमित संवाद ठेवा — त्यांच्या आशीर्वादात यशाचा आशय लपलेला असतो.
6️⃣ मोबाईलचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करा, पण व्यसनातून दूर रहा.
7️⃣ सोशल मीडियाचे भुरळ घालणारे मोह टाळा – तुमचं वेळ, लक्ष आणि ऊर्जा वाचवा.
8️⃣ मैत्रीचा फेरफटका घ्या – प्रेरणादायी, अभ्यासू आणि सकारात्मक मित्र जोडा.
9️⃣ तुमचं संपूर्ण नियोजन पालकांशी शेअर करा – त्यांच्या मार्गदर्शनाने निर्णय योग्य होतील.
🔟 सुट्टीही अभ्यासाची संधी आहे – योग्य नियोजन करूनच ती साजरी करा.
✨ मित्रांनो… प्रत्येक दिवस म्हणजे एक संधी आहे; ती संधी संधीसारखीच जपा…
कारण दहावी ही पायरी नाही, ती तर यशाच्या शिखराकडे नेणारी सुरुवात आहे..!
🌟 चला तर मग… आत्मविश्वास, चिकाटी आणि श्रद्धेच्या बळावर,
तयारी करूया एक स्वप्नवत यशासाठी…!
आपणा सर्वांना पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा मित्रांनो... 🌹
🙏🏻 *धन्यवाद*🙏🏻
*आपलाच स्नेही मार्गदर्शक..*🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
🎓 *डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.*
https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in/?m=1
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
0 Comments