करा स्मार्ट अभ्यास......मिळवा यश हमखास...!✍🏻
बोर्ड परीक्षेच्या पुर्व तयारीसाठी..
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख सर लेखन संपादीत ....✍🏻
दहावीच्या विद्यार्थ्यासाठी विशेष मार्गदर्शिका..
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
यशाचा दीपस्तंभ ‘ करा स्मार्ट अभ्यास आणि मिळवा यश हमखास ’ या दहावीच्या विद्यार्थ्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शिकेत आपले मन:पूर्वक हार्दिक स्वागत..
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांपासून अविरत विद्यार्थ्याच्या सेवेत दिवसागणिक वेगवेगळे शैक्षणिक अभिनव प्रयोग करून विद्यार्थांना शिक्षणाची गोडी लावत, यंदा हि पुस्तिका हमखासपणे आपल्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देईल याची आम्हांला नक्कीच खात्री आहे...!
पुढील महिन्यात होणा-या बोर्ड परीक्षेला आता अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत. इ. 10 वीच्या परीक्षेची पूर्वतयारी करताना अनेक विद्यार्थी आणि पालक गोंधळलेले असतात, परीक्षेपूर्वी आपण स्मार्ट वे पद्धतीने अभ्यास केला तर आपल्या गुणांत नक्कीच 10-25 % वाढ होईल..
इ. 10 वी बोर्डाची परीक्षा आयुष्यातील महत्वपूर्ण परीक्षा असल्यामुळे याचे योग्य नियोजन , अभ्यास - पुर्वतयारी आहार - विहार , परीक्षा पद्धती , उत्तरलेखन प्रेझेन्टेशन तंत्र , पेपरमधील सुट्टीचे योग्य नियोजन , मानसिक ताण , परीक्षेचे स्वरूप , काठीण्य पातळी वेळेचे गणित इ. सर्व बाबीवर अभ्यासपूर्ण काही गोष्टी मांडण्यात आल्या आहेत....या सर्वांचा आपल्या क्षमता आणि कौशल्या प्रमाणे योग्य उपयोग करून इ. 10 वीत घवघवीत यश संपादन करा हीच शुभेच्छा आणि सदिच्छा...!
धन्यवाद..!
आपलाच स्नेही आणि मार्गदर्शक..🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन
0 Comments