📍🔰 विद्यार्थी मित्र प्रा.रफिक शेख सर संचलित डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन,परभणी, इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ...🔰📍
गेली दोन दशके विद्यार्थ्यांच्या अविरत सेवेत असणारे आमचे मार्गदर्शक, सहकारी, हितचिंतक आणि स्नेही मार्गदर्शक गुरू मित्र, आदरणीय प्रा. शेख रफिक सर यांच्या डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 5 एप्रिल 2022 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम मला या समारंभात निमंत्रित करून सरांनी जो आदरतिथ्य आणि मान-सन्मान दिला त्याबद्दल सरांचे मनःपूर्वक हार्दिक आभार.!
परसावत नगर म्हणजे गेटच्या पलीकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हक्काचं अस विद्येच माहेर घरचं सरांनी निर्माण केलं आहे.
महिन्याची हजारो रुपये फिस घेणाऱ्या क्लासेस मध्ये ज्या सुविधा नाहीत, त्याही पेक्षा अत्यंत सुसज्ज सुविधा संपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे,इन्व्हर्टर, डेस्क,प्रोजेक्टर, ई-लर्निंग साठी असलेली अत्यंत प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वाय-फाय सुविधा , फिल्टर पिण्याचे पाणी, स्टडी सर्कलसाठी स्वतंत्र जागा, ग्रंथालय,नेहमीच हिरवळ असलेली गॅलरीतील परस बाग,..स्वच्छता आणि टापटीपपणा ई.. आदी..सर्वं सोईयुक्त सुसज्ज शैक्षणिक दालन सरांनी अत्यंत अल्पदरात आणि सातत्याने या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
ज्यांना शंका असेल त्यांनी एकदा नक्की जाऊन शहानिशा करावी असे बिनधास्त सांगू शकतो एकवेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष पहा......परभणी शहराच्या दक्षिण भागांतल्या भिमनगर, क्रांति नगर,रमाबाई नगर, वर्मा नगर, इंदिरा गांधी नगर, विकास नगर, पंचशील नगर, अजिजीया नगर, जमजम कॉलनी परिसरातील शैक्षणिक-सामाजिक विकासापासून कोसोदूर असलेल्या अनेक कामगार, रोजगार, कष्टकरी आणि मजुरांच्या मुलामुलींना अत्यंत अल्प फिस मध्ये शिक्षणाच्या मुख्य-प्रवाहात आणून त्यांना सामाजिक भान जपत , सामाजीक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांना आपलंसं करीत आपल्या प्रगल्भ अभ्यासातून उच्च शिक्षण घेण्याच्या प्रेरणेचं बीजारोपण करणारा, सातत्यपूर्ण , समर्पित सेवा भावनेनं आणि नि:स्वार्थपणे सेवा देण्यासाठी तसं हळवं मन आणि माणुसकीचा गहिवर असणारा माणूस म्हणजे विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सर आहेत.
मराठीमध्ये प्रभावी लिखाण,कणखर वक्तृत्व, विद्यार्थी मित्र म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवले तरी जमिनीवरच असणारं व्यक्तिमत्त्व , गोरगरिबांच्या लेकरांची अहोरात्र शैक्षणिक-सेवा करत आहेत त्याबद्दल त्याच श्रेय त्याना नक्कीच मिळणार यात शंका नाही. अनेकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन, जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा आणि संकटाच्या काळात मदतीचा हात देणारा हक्काचा माणूस म्हणुन प्रा.रफिक शेख सर... जबाबदारी पार पाडत असतात मी हे स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवातून सांगतो आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीला सर्वस्व मानणारा शिक्षक आपल्या शहरात आहे ..हे हजारो पालकांचं,विद्यार्थ्यांचं आणि समाजाचं भाग्य आहे. ज्या भागात सरांचे क्लासेस आहेत. तेथील पालक क्लासेसची फिस देतील किंवा नाही अथवा देऊ शकतच नाहीत इतकी परिस्थिती देखील नाही हे माहीत असून सुद्धा अश्या भागात गेली 22 वर्ष क्लासेसच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी त्यांना माणुसकी नावाचा धर्म शक्ती.. देतोय असं मला वाटतंय..
अनेकदा सरांच्या क्लासेसवर मी जात असतो, अतिशय हसत-खेळत विनोदी शैलीत सरांचा संवाद आणि शिकवण्याची पद्धत आहे,नेहमीच विद्यार्थ्यांच्या सहवासात असतात, त्यांच्या प्रश्नांना मार्मिकतेने उत्तरं देतात, सदैव विद्यार्थ्यांच्या सेवेत असलेलं हे स्वयं-सिद्ध कर्तृत्व.. त्यामुळेंचं तर सरांना विद्यार्थी मित्र म्हणतात. त्याचबरोबर वर्षानुवर्ष हितसंबंध असलेला अतिशय प्रेमळ,दयाळू आणि नम्र असा सरांचा शिक्षक वर्ग त्यांचेचं विद्यार्थी - स्टाफ या कार्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे हे देखील सांगावं लागेल. मला अश्या व्यक्तीचा सहवास, सहकार्य,मार्गदर्शन आणि स्नेह लाभत आहे हे माझं भाग्य समजतो. सरांच्या या निस्वार्थ कार्याला माझ्याकडून आणि आमच्या परभणी युवा मंचकडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन.
सरांच्या ह्या शैक्षणिक-सामाजिक सेवेला सलाम आणि लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा.. 💐
-अमोल लांडगे.
परभणी युवा मंच