महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावीच्‍या परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे.

त्‍यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहे. त्‍यासाठीची प्रक्रिया शुक्रवार (दि.२९) पासून सुरु होत असून, २४ ऑगस्‍टपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील. शिक्षण मंडळातर्फे सविस्‍तर वेळापत्रक जारी केलेले आहे. शुक्रवार (दि.२९) पासून २४ ऑगस्‍टपर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व निर्धारित शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी मुदत असेल.

विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्‍क जमा केल्‍याबाबतची पावतीच्‍या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्‍या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी १ ते २६ ऑगस्‍ट अशी मुदत असणार आहे.

संपर्क केंद्र शाळा/महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्‍क जमा केल्‍याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी ३० ऑगस्‍टपर्यंत मुदत असेल. खासगी विद्यार्थ्यांनी दहावी, बारावीसाठी नाव नोंदणी ऑफलाईन अर्ज स्‍वीकारला जाणार नाही. किंवा या संकेतस्‍थळाच्‍या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्‍ध असेल.

अर्ज भरताना विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांच्‍या स्‍कॅनकॉपी अपलोड करायच्या आहेत. त्‍यानुसार शाळा सोडल्‍याचा दाखला (मूळ प्रत), नसल्‍यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्‍वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो विद्यार्थ्यांनी स्‍वतःसोबत ठेवायचा आहे. ही कागदपत्रे ऑनलाइन अर्ज भरताना स्‍कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.


या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध असेल..