🎓 प्रा. डॉ. मुंजाजी भोसले..

(प्राध्यापक आणि संशोधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ) 

माझ्या  सामाजिक-शैक्षणिक व्यवसायभिमुख कारकिर्दीत शैक्षणिक वर्ष 2006-2007 साल हे माझ्या आयुष्याला विविधांगी रूपानं कलाटणी देणारं ठरलं, औरंगाबाद येथील एका प्रतिष्ठित कनिष्ठ महाविद्यालयातील 'तासिका' तत्वावरील हंगामी नोकरी सोडून परभणीला परत येऊन पुन्हां क्लासेस सेवा क्षेत्रात पूर्णपणे स्वतःला झोकून देण्याचं निश्चित केलं..! 

घरच्यांच्या तीव्र विरोधाला न जुमानता पून्हा अजिजिया नगर स्थित असलेल्या घरीच क्लासेस घेण्याचं ठरलं..!

त्यावेळी माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक आणि माझे मार्गदर्शक श्री. शेवटे सर , श्री. पंजरकर सर , श्री. ए. डी. पवार सर श्री.अंधारे सर (मोठे) , कै.अशोक जाधव सर आणि डोंगरे मॅडम ताई ह्या सर्वांच्या मार्गदर्शन-सहकार्यातुन वसतिगृहात शिकणाऱ्या दहावीच्या 20 विद्यार्थ्यांना अल्प फिस मध्ये शिकवण्याचा आनंददायी अनुभव आला..ग्रामिण भागातल्या खेडोपाडीत विस्थापित असलेल्या अनेक तांड्या , वस्तीत, शेतात घर करून राहणाऱ्या अनेक शेतमजुरांच्या मुलांना शिकवताना स्वतःच्या आयुष्याची दिशा निश्चित झाली..! आपली खरी गरज कुठं आहे ह्याचा थांगपत्ता लागला.. 

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ह्या सर्वं विद्यार्थ्यांना आणून त्यांच्या उज्ज्वल करीअरसाठी लावलेला मार्गदर्शनाचा 'ज्ञानदीप' डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन विद्यार्थी मित्र परिवार स्वरूपात आजही कायम आहे.. आणि पुढंही कायम असेल ह्यांत शंकाच नाही..

ह्याच बॅच मध्ये अनेक यशस्वी विद्यार्थी घडवता आले ह्याचा मला सार्थ अभिमान , कारण मी घेतलेला निर्णय अगदी योग्यचं होता..

रहमान शेख ( Forest officer,Assam) , अदनान धरार (विदेशात-IT Industry) , मुंजाजी (राज) बल्लाळ ( Branch Manager- Axis Bank , Hyderabad) , तारीख शेख ( IT Company,Pune), सुधाकर भोसले ( Software Engineer,Pune), आशा लांडगे ( महाराष्ट्र पोलीस) , गौतम भदरगे ( C.A, University Topper,Gold medalist), सय्यद जाफर आणि अंकुश लांडगे ( Aadrsh Coaching Academy) सह अनेक यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनीच्या...ह्या नं संपणाऱ्या यादीत प्रा. डॉ. मुंजाजी भोसले..(प्राध्यापक आणि संशोधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ) हा विद्यार्थी मला सर्वात जास्त प्रिय आणि सदैव सार्थ अभिमान असलेला..!

शांत, संयमी, प्रचंड अभ्यासू,कष्टाळू,विनयशीलता आणि विनम्रता असलेला..आपल्या स्वभावानं नेहमीच आमचं मनं जिंकणारा,मागे लग्न-पत्रिका देण्यासाठी आला तेंव्हा एक वेगळ्याचं उर्जेनं भेटला.. मी ही आपल्या सारखाचं शैक्षणिक-सामाजिक सेवा क्षेत्रात कार्य करणार आणि माझ्या सारख्या अनेक मुलांना शिक्षणात मदत करणार..

अगदी सुरुवात लग्नाच्या दिवशीचं..!

आपल्या लग्न सोहळ्यात ₹16,000 नांदेड येथील 'यशवंतराव चव्हाण'वस्तीगृहाला मदत केली..

आम्ही लावलेल्या शैक्षणिक-सामाजिक परिवाराच्या वट-वृक्षाचं एक स्वयं-सिद्ध कर्तृत्वान फुल जेव्हा असं बहरतं तेव्हा नक्कीच त्या माळीला सार्थ अभिमान नक्कीच असणारं..

विद्यार्थी मित्रा तुझा सार्थ अभिमान..💐

तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनंत हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा...

-तुझाच मार्गदर्शक:

🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com/?m=1