“शालेय शिक्षण विचार शिकवतं, अवांतर वाचन विचारांना पंख देतं.”
- मा. नितीन सावंत सर
आज 15 ऑक्टोबर..✍️
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रित्यर्थ 'वाचन प्रेरणा दिनाच्या ' निमित्ताने..
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन या शैक्षणिक परिवाराच्या वतीने आज ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक उपक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या विचारविश्वात नवचैतन्य फुंकणारा प्रेरणादायी कार्यक्रम ठरला..
कार्यक्रमाचे मार्गदर्शक अतिथी म्हणून मा. नितीन सावंत सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत डॉ. कलाम यांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग उलगडले. सरांनी सांगितले की, “पुस्तक हे केवळ वाचनाचे साधन नाही, तर ते माणसाच्या विचारांचे, स्वप्नांचे आणि कर्तृत्वाचे आरसे असते.”
त्यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लावण्याचे आवाहन करत सांगितले की आजच्या डिजिटल युगात विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वैचारिक पुस्तकांचे वाचन हेच विद्यार्थ्यांना विचारांनी समृद्ध आणि कृतीशील बनवू शकते.
“आपल्या ज्ञान-जिज्ञासेला शमविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वाचन,” असे सांगत सावंत सरांनी अनेक शास्त्रज्ञांच्या जीवनातून प्रेरणादायी उदाहरणे देत ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीचा जिवंत अर्थ विद्यार्थ्यांसमोर मांडला...
प्रा. रामप्रसाद अंभोरे सरांनी विज्ञानयुगातील मुलांनी स्व-जिज्ञासेचा शोध घ्यावा, प्रश्न विचारावे आणि उत्तरांच्या दिशेने धाडसाने पावलं टाकावीत, असा संदेश दिला.
तर अझहर शेख हयांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, "वाचन हे व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे जो मजबूत असेल, तोच जीवनात उंच उभा राहू शकतो."
दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा तेज, वाचनाची नव्याने लागलेली ओढ आणि विचारांची तळमळ हाच या कार्यक्रमाची खरी यशोगाथा ठरली.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या वतीने आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये ‘वाचनातून विचार आणि विचारातून परिवर्तन’ या प्रवासाला प्रेरणादायी दिशा देणारा ठरला.
आपणा सर्वाचे मन:पूर्वक हार्दिक धन्यवाद आणि आभार मित्रांनो.. 🙏
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in
0 Comments