प्रिय विद्यार्थी मित्रांनो..

एखाद्या राष्ट्राला कमजोर करायचं असेल, तर शत्रू त्याच्या सीमांवर हल्ला करत नाही... तो थेट प्रहार करतो शिक्षणावर आणि शिक्षकांवर...

कारण खरी राष्ट्रनिर्मिती ही शाळेच्या वर्गात, कॉलेजच्या दालनात आणि शिक्षकांच्या हाताखालीच घडते.

शिक्षक म्हणजे फक्त धडा शिकवणारे व्यक्ती नसतात... ते म्हणजे समाजाचा आरसा घडवणारे कारागीर..

तेच मूल्ये रुजवतात, विचार पेरतात आणि समाज उद्या कोणत्या वाटेने चालेल, याचा मार्ग तयार करतात.

म्हणूनच, शिक्षण म्हणजे खरी शक्ती...


🎓शिक्षणाची ताकद..

आज तुम्ही जे शिकता, जी शिस्त पाळता, जी मूल्ये स्वीकारता.. त्यावरच उद्याचा समाज उभा राहणार आहे.आज तुम्ही वाचलेले प्रत्येक पान, केलेला प्रत्येक प्रयोग, लिहिलेली प्रत्येक उत्तर पत्रिका.. हे फक्त तुमचं परिश्रम नाही, तर उद्याच्या राष्ट्राची वीट आहे.

मग स्वतःला विचारा…

👉 तुम्हाला कसे शिक्षक हवेत?

शिक्षक फक्त धडे शिकवणारे नसावेत, तर जीवन शिकवणारे असावेत.ते पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता, विचारांना दिशा देणारे असावेत..ते फक्त परीक्षेसाठी नव्हे, तर आयुष्य घडवणारे असावेत...त्यांची शिकवण अशी असावी की वर्ग संपल्यानंतरही त्यांच्या शब्दांचा प्रकाश मनात सतत झळकत राहावा...ते प्रेरणादायी, निडर, प्रामाणिक, मूल्यनिष्ठ आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देणारे, त्यांच्या प्रतिभेला वाव देणारे असावेत..

कारण खरा शिक्षक तोच, जो तुमच्यातला सुप्त नेता, कर्ता, विचारवंत आणि विवेकी माणूस जागा करतो..

👉 तुम्हाला कसे विद्यार्थी व्हायचे आहे?

फक्त गुणांसाठी धावणारे नाही, तर ज्ञानासाठी तहानलेले विद्यार्थी व्हा...!

फक्त प्रश्न सोडवणारे नाही, तर प्रश्न विचारणारे व्हा..!

फक्त उत्तरे पाठ करणारे नाही, तर नव्या उत्तरांचा शोध घेणारे व्हा..

फक्त स्पर्धेत जिंकणारे नाही, तर स्वतःशी स्पर्धा करणारे व्हा..

शिस्त, संयम, जिज्ञासा आणि परिश्रम यांचा संगम घडवा..

कारण खरा विद्यार्थी तोच, जो शिक्षकांच्या शिकवणुकीला प्रत्यक्ष आचरणात उतरवतो आणि समाजात सकारात्मक बदल घडवतो..


हे दोन प्रश्न फक्त प्रश्न नाहीत, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला घडवणारे आरसे आहेत मित्रांनो..

जसे शिक्षक, तसे विद्यार्थी… आणि जसे विद्यार्थी, तसे उद्याचे समाज आणि राष्ट्र असते..

आपल्याला असे शिक्षक हवेत, जे धैर्य शिकवतील,प्रामाणिकपणा पेरतील, उत्सुकतेची ज्योत लावतील...पण त्याच वेळी समाजाला असे विद्यार्थीही हवेत, जे प्रश्न विचारतील, शोध घेतील, मेहनत करतील आणि मोठी स्वप्ने पाहतील..


🎓करिअर घडवायचं असतं..

लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो..

करिअर हे “सापडत नाही”; ते घडवलं जातं..

तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत, तुमचे ध्येय...ह्यानेच तुमचं आयुष्य आकार घेतं.

फक्त गुणांसाठी अभ्यास करू नका...


👉 अभ्यास करा स्वतःला घडवण्यासाठी.

👉 अभ्यास करा समाजाला दिशा देण्यासाठी.

👉 अभ्यास करा राष्ट्राला सक्षम करण्यासाठी.

👉 अभ्यास करा अंधारात प्रकाश नेण्यासाठी.

👉 अभ्यास करा सत्य,विवेक, न्याय आणि प्रामाणिकतेसाठी उभं राहण्यासाठी.

👉 अभ्यास करा शेतकऱ्याच्या घामाचा सन्मान राखण्यासाठी.

👉 अभ्यास करा विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा दीप पेटवण्यासाठी.

👉 अभ्यास करा आपल्या संस्कृतीचं रक्षण आणि मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी.

👉 अभ्यास करा जेणेकरून तुमचं आयुष्य फक्त तुमचंच नसेल, तर इतरांच्याही आयुष्याला आधार देईल..


हे वाक्य फक्त अभ्यासाबद्दल नाही, तर जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.

शिकणं म्हणजे केवळ करिअर घडवणं नाही, तर माणूस घडवणं आहे.


⚖️ समाजाची खरी गरज..

समाजाला हुशार लोक नकोत, तर सुजाण नागरिक हवेत. समाजाला फक्त पदवीधर नकोत, तर मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वं हवी आहेत.


खरा प्रश्न हा नाही की “तू काय होणार?”

खरा प्रश्न आहे – “तू काय घडवणार?”


👉 शिक्षक होऊन पिढ्या घडवशील का?

👉 शेतकरी होऊन जगाला अन्न देशील का?

👉 सैनिक होऊन देशाचं रक्षण करशील का?

👉 लेखक होऊन विचारांना दिशा देशील का?

👉 कलाकार होऊन समाजाला संस्कार देशील का?

👉 उद्योजक होऊन रोजगार निर्मिती करशील का?

👉 समाजसेवक होऊन वंचितांचा आधार देशील का?

👉 खेळाडू होऊन राष्ट्राचं नाव जगात उजळवशील का?

👉 पत्रकार होऊन सत्य समाजासमोर मांडशील का?

👉 न्यायाधीश होऊन न्यायालयात न्याय प्रस्थापित करशील का?

👉 पोलीस होऊन गुन्हेगारांना धडा शिकवशील का?

👉 पर्यावरणवादी होऊन निसर्गाचं रक्षण करशील का?

👉 शोधकर्ता होऊन जगाला नवीन दिशा देशील का?

👉 दानशूर होऊन गरीबांच्या डोळ्यात आनंद भरेल का?

👉 नेतेमंडळींना जागं करून खऱ्या अर्थाने सेवा करशील का?

👉 उद्योजक होऊन देशाच्या प्रगतीत हातभार लावशील का?

👉 तंत्रज्ञ होऊन जगाला नवीन तंत्रज्ञान देशील का?

👉 क्रांतिकारक होऊन समाजात बदल घडवशील का?

👉 सामाजिक कार्यकर्ते होऊन अन्यायाविरुद्ध लढशील का?

👉 इतिहासकार होऊन विस्मृतीत गेलेल्या कथा उजागर करशील का?

👉 तत्वज्ञानी होऊन समाजाला विचारांची नवी वाट दाखवशील का?

👉 उद्योजक होऊन ‘मेक इन इंडिया’ ला बळ देशील का?

👉 स्वयंसेवक होऊन आपत्तीच्या काळात जीव वाचवशील का?

👉 डिजिटल नवोन्मेषक होऊन तंत्रज्ञानाद्वारे लोकांचे जीवन सुलभ करशील का?

👉 कवी-गायक होऊन मनाला उभारी देशील का?

👉 अंतराळवीर होऊन आकाश जिंकल्यावर मातृभूमीचा झेंडा रोवशील का?

👉 अर्थतज्ज्ञ होऊन देशाला समृद्धीची नवी दिशा देशील का?

👉 राजनैतिक दूत होऊन भारताचा आवाज जगभर पोहोचवशील का?

👉 योगगुरू होऊन आरोग्य आणि संतुलनाची वाट दाखवशील का?


निर्णय तुझ्या हातात आहे..! तु उद्या समाजाला.. माणुसकीला विधायक स्वरूपात काय देशील..


🌟 आपली प्रतिज्ञा..

मग चला, आजपासून आपण एक वचन द्यायचं…

👉 मी मनापासून शिकेन, कधीही आळस करणार नाही.

👉 मी शिक्षकांचा आदर करीन, त्यांच्या मार्गदर्शनाला कधीच कमी लेखणार नाही.

👉 मी ज्ञानाचं खरं मूल्य ओळखीन, त्याचा दुरुपयोग करणार नाही.

👉 मी असं भविष्य घडवेन, ज्याचा अभिमान मला आणि माझ्या राष्ट्राला वाटेल.

👉 मी प्रामाणिकपणे मेहनत करीन, अपयश आल्यास खचणार नाही.

👉 मी वेळेचं महत्त्व जाणून शिस्तीने चालीन.

👉 मी पालकांचा सन्मान करीन, त्यांचे त्याग कधीच विसरणार नाही.

👉 मी मित्रत्व, सहकार्य आणि एकतेची भावना जपीन.

👉 मी सत्य, संयम आणि धैर्य यांना जीवनाचं कवच बनवीन.

👉 मी चांगल्या सवयी अंगीकारीन आणि वाईट सवयींना दूर सारिन.

👉 मी समाजाच्या भल्यासाठी माझं ज्ञान अर्पण करीन.

👉 मी पर्यावरणाचं रक्षण करीन आणि निसर्गाशी मैत्री करीन.

👉 मी जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्राच्या प्रगतीत माझा हातभार लावीन.


विद्यार्थ्यांनो, तुमच्यात आहे भारताचा उद्याचा प्रकाश..

तुमच्या खांद्यावर फक्त तुमच्या कुटुंबाचं नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राचं भविष्य आहे.

स्वतःला घडवा – ज्ञानी, दूरदर्शी, शिस्तप्रिय, धैर्यवान आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व बनवा. कारण उद्या जेव्हा तुम्ही उभे राहाल, तेव्हा भारत माता अभिमानाने म्हणेल..

“हा माझा विद्यार्थी आहे… हाच माझ्या भविष्याचा दीपस्तंभ आहे!” 


-एक शिक्षणप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..

#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख 

The Spirit of Zindagi Foundation 

🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.


#शिक्षणाचीशक्ती #विद्यार्थीप्रेरणा #TeacherOfNation #KnowledgeIsPower #शिक्षकविद्यार्थीसंबंध #EducationForChange #करिअरघडवा #StudyWithPurpose #विद्यार्थीशपथ #BeTheChange #RashtraNirmitee #शिक्षणप्रेरणा #FutureOfIndia #विद्यार्थीतेराष्ट्र #InspirationForLife