पटलं तर बघा एकदा..!
👍🏻 जो काही अपेक्षित /अनपेक्षित निकाल असेल तो अवश्य स्वीकारा..
👍🏻अवास्तव अपेक्षा न ठेवता त्याचा स्वीकार करा..!
👍🏻आपल्या मुलांना समजून घ्या..!
👍🏻अनपेक्षित निकाल आल्यास आपल्या पाल्याची समजूत घाला..!
👍🏻आपली मुले खूप संवेदनशील आहेत,जर नापास झाले तर त्यांच मनोबल वाढवा..
😡इतरांची तुलना आपल्या मुलांसोबत करू नका.
😨चक्क नापास झाले तर रागावू नका..
👍🏻आजच्या पिढीला अपयश कसं पचवावे हे ही शिकवा आणि यशश्री खेचून आणण्यासाठी त्याला सक्षम करा..
👍 शिक्षण हा प्रवास आहे ती स्पर्धा नव्हे हे ही पटवून द्या.
😇नापास झाले तर आपल्या मुलाची काळजी घ्या, आणि त्यांना धीर द्या..
😎मार्क म्हणजे खरी गुणवत्ता नसते हो..
😊 आपली दहावी आणि बारावी परीक्षा तसेच डिग्री पास किंवा नापासची गुण पत्रिका आपल्या मुलांना अवश्य दाखवा..
🤓मुलं एकटे नापास होत नाही त्यांत आपलाही वाटा असतोच की हो..!😢.
🤓 यंदाही मुलींचीच बाजी असणार हे नक्की..!
🎓यंदा पासच प्रमाण वाढणार पण खरी गुणवत्ता..?
🤓 गल्लीतील Toppers ची तुलना नको...,सर्वच मुले Einstein किंवा Newton च्या Attitude ची नसतात हो..!
👍🏻 आपल्या पाल्याना आजच विश्वासात घ्या आणि समजुन सांगा..
😍 हुशार विद्यार्थी कॉलेजचा आणि 'ढ' कोणाचा..? मग् पालकांचा असेल तर सांभाळून घ्या हो.!
😱 दहावीत पडलेल्या गुणांची टक्केवारी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणांची टक्केवारी ह्याची तुलना करू नका..
🤓 दहावी आणि बारावी परीक्षा पद्धती आणि गुणांच्या टक्केवारीत फरक असतोच. (काही अपवाद )
🤓 नापास मुलांपेक्षा कमी टक्केवारी आलेल्या मुलांना जास्त मानसिक त्रास असतो, ह्यावेळी पालकांचे सकारात्मक मार्गदर्शन त्यांना साथ देते.
😡 दहावी आणि बारावी परीक्षेच्या यश अपयशा पलीकडे खरे जीवन बाकी आहे हे ही त्याला समजून सांगा..
😡 समाजाच्या दृष्टीने पास नापास हा प्रश्न मुख्यतः 10 वि 12 परीक्षांपुरताच मर्यादित आहे का..?
😡 उगाच नापासचा शिक्का देऊन मानसिक खच्चीकरण करू नका हो..! इतिहास साक्षी आहे...!
नापास झाले त्यांनीच इतिहास रचला आहे.
😡 कोणाचीही चेष्टा करू नका, सुखासोबत दुःखात सहभागी होणे माणुसकी आहे.
🤔विद्यार्थी नापास म्हणजे त्या व्यवस्थेचं पण अपयश असतं हे विसरू नका..!
👍🏻 उत्तम निकाल देण्याऱ्याचं कौतुकचं..! पण नापास होणाऱ्यांनी घाबरू नका..
आपला विद्यार्थी मित्र सदैव सोबत आहे..
विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा निकाल आहे आज..यश पदरात पडेल त्याच्या ,पण झालाच अपयशी तर खांद्यावर भक्कम हात ठेवून म्हणा....
' खचू नको, लढत रहा, आयुष्याचा संघर्ष सदा जिंकत रहा..!'
जिद्ध,चिकाटी आणि जीवनाकडे Positive पणे बघण्याची जिज्ञासा ,तसेच नवीन नवीन गोष्टी शिकण्याची कला असेल तर यश हे आल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या मुलांना समजून सांगा..
👍🏻 आपली हाक आणि आमची साथ देईल आपणास एक आत्मविश्वास...!
आपणा सर्वांना पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..🌹
आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
©-विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख.
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी संपर्क:
0 Comments