ना कुणाशी स्पर्धा , ना कुणाचा द्वेष , 
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, 
ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी ,
फक्त विद्यार्थी घडवण्याची जिद्द... ! 

शैक्षणिक आणि सामाजिक विकासापासून वंचित असलेल्या गोर गरीब आणि कष्टकऱ्यांची मुलं, विषम परिस्थितीला छेद देत..नववी पर्यंत कोणतंही क्लासेस जॉईन नं करता थेट दहावीला 'शिक्षणाचं' भान आल्यावरचं शिकावं..! ह्या मानसिकतेनेचं शालेय शिक्षणात विद्यार्थी आणि पालक जागरूक नसल्याने, आर्थिक परिस्थितीनुसार आपल्या पाल्यांचं शिक्षण दहावीनंतरचं पाहू...ह्या विचारांनें आठवी आणि नववी वर्गात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे फारसा रस नसलेला पालक वर्ग.. हा आमच्या शैक्षणिक परिवारात थेट दहावीला आपल्या पाल्यांना प्रवेशीत करतो.

दहावीच्या वर्गात आलेला हा विध्यार्थी पायाभुत अभ्यासक्रमातचं कच्चा आणि अभ्यासात निरूतसाही असतो.. त्याला अक्षर सुधार ते विज्ञान आणि गणितीय संकल्पना, त्याचं अभ्यासवरचं लक्ष, त्याच्या व्यक्तीमत्व विकासाची जडणं-घडण ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची प्रामाणिक धडपड, स्वतःला सिद्ध करण्यासाठी लागणारें सर्वं कष्टदायक प्रयत्न, आपल्या विषम परिस्थितीवर मात करून भावी भविष्यासाठी सध्याच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याचीं तळमळ.. ई..आदीसाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक परिवाराचीं त्याला लाभलेली मार्गदर्शन रुपी साथ आणि बोर्ड परीक्षा संपेपर्यंत त्याचीं घेतलेली काळजी.. हा वर्षभर असलेला संपूर्ण प्रवास आनंददायी आणि उत्साहवर्धक असतो..

पण हीं स्पर्धा त्याची स्वतःशीचं असते..! नां की इतरांशी..! 





विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नांना यशाचा खरा सुगंध देणारा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन हा शैक्षणिक परिवार सदैव समाजाच्या वंचित आणि उपेक्षितांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी संघर्षरत आणि कार्यरत आहे.


हा खरा निकाल विद्यार्थ्यांचाचं आहे..! आम्ही निमित्तमात्र आहोत.. ज्यांनी आम्हास त्यांच्या सेवेची हीं संधी दिली त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक दिल सें आभार मित्रांनो..


विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं पुनः एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि विद्यार्थ्याना पुढील वाटचालीस लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा मित्रांनो.


🙏🏻 आपलाच विनम्र स्नेहाकिंत आणि शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
www.vidhyarthimitra.com