प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
प्रथम सत्र परीक्षेनंतर आता खरी लढाई सुरू झाली आहे, स्वप्नांशी, ध्येयांशी आणि स्वतःच्या मर्यादांशी..!
आता हा काळ आहे आपल्या क्षमतांना ओळखण्याचा, घडविण्याचा आणि उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्याचा.
दिवाळीच्या सुट्ट्या या केवळ आनंदासाठी नसून, स्वतःच्या यशाचा आराखडा तयार करण्याची सुवर्णसंधी आहे मित्रांनो..
ह्याच काळात जो विद्यार्थी वेळेचा योग्य वापर करेल, प्रश्न-पत्रिकांचा नियमित सराव करेल...
तोच आगामी बोर्ड परीक्षेत आत्मविश्वासाने यश संपादन करेल..
"घाम गाळणाऱ्यालाच यशाचे फुल उमलते!"
म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःशी एक वचन घ्यावे..
📚 दररोज एक तरी प्रश्न-पत्रिका सोडवायची, चुका ओळखायच्या आणि सुधारणा करायच्या...
प्रत्येक विषयाच्या किमान 5-5 प्रश्न-पत्रिका सोडवण्याचे उद्दिष्ट सर्वांनी ठेवा मित्रांनो..
ज्यांनी अधिकाधिक (किमान 100) प्रश्न-पत्रिका सोडवल्या.. ते फक्त बक्षीसाचे नव्हे, तर स्वतःच्या कर्तृत्वाचे आणि गुणवत्तेचे ही पात्र ठरतील..
बाजारात विविध प्रकाशनांचे उत्तम प्रश्न-पत्रिका संच उपलब्ध आहेत...
तसेच आपल्या क्लासेसच्या वेबसाईटवरूनही 10-15 प्रश्न-पत्रिका संच डाउनलोड करून त्याचा सराव सुरू करू शकता मित्रांनो..
लक्षात ठेवा... "जितका जास्त सराव, तितका जास्त आत्मविश्वास!"
प्रत्येक प्रश्न म्हणजे एक नवा अनुभव, आणि प्रत्येक सराव म्हणजे यशाकडे एक पाऊल...
आपले ध्येय फक्त परीक्षा उत्तीर्ण होणे नसावे, तर स्वतःला सिद्ध करणे असावे..!
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन शैक्षणिक परिवाराचा संकलित सराव प्रश्न-पत्रिका अभ्यास उपक्रम
स्वयं - अध्ययन : प्रश्न पत्रिका सराव मोहीम
संकलित विषय निहाय सराव प्रश्न-पत्रिका कृती संच....
इय्यत्ता दहावी मराठी ( नॉन- सेमी ) माध्यम विषयनिहाय संकलित प्रश्नपत्रिका संच ....
इय्यत्ता दहावी नॉन- सेमी माध्यम विषयनिहाय संकलित प्रश्नपत्रिका संच ....
2) वर्ग 10 वि गणित भाग-2 ( नॉन- सेमी माध्यम ) संकलित सराव प्रश्नपत्रिका संचासाठी लिंक वर क्लिक करा :
इय्यत्ता दहावी सेमी-इंग्रजी माध्यम विषयनिहाय संकलित प्रश्नपत्रिका संच ....
4) वर्ग 10 वि सेमी-इंग्रजी माध्यम : Science-2 संकलित सराव प्रश्नपत्रिका संचासाठी लिंक वर क्लिक करा..
ईतर नोट्स संकलन :
0 Comments