भारत हा केवळ भूभाग नाही… तर असंख्य शौर्यकथा, बलिदान, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे जिवंत स्मारक आहे.
सैनिक हा फक्त वर्दीतील मनुष्य नसतो..तो राष्ट्राच्या स्वाभिमानाचा पहारेकरी, सुरक्षिततेचा विश्वास आणि स्वातंत्र्याची जिवंत प्रतिज्ञा असतो.
आजच्या युगात करिअरचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण देशासाठी जगण्याची आणि मरणाची शपथ घेणारा मार्ग निवडकांना लाभतो..
याच ध्येयाने महाराष्ट्र शासनाने सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था म्हणजेच SPI (Service Preparatory Institute) स्थापन केली आहे.
🎓 SPI म्हणजे फक्त प्रशिक्षण नव्हे — व्यक्तिमत्त्वाचा पुनर्जन्म
SPI ही फक्त UPSC, NDA किंवा INA परीक्षेसाठी कोचिंग देणारी संस्था नाही तर ही संस्था शिस्त, धैर्य, प्रबुद्धता, नेतृत्व, तर्कशक्ती आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम आहे.
इथे विद्यार्थी केवळ अभ्यास करत नाहीत तर ते स्वतःला एक जबाबदार नागरिक, सजग नेता आणि भावी अधिकारी म्हणून घडवतात.
🌟 संधीची ताकद: सामान्यतेतून असामान्यता..
या संस्थेमध्ये श्रीमंत किंवा गरीब यांना फरक नाही..इथे गुणांना मान आहे, मेहनतीला सन्मान आहे आणि देशप्रेमाला सर्वोच्च स्थान आहे.
गेल्या काही वर्षांत येथील शेकडो विद्यार्थी NDA, Indian Naval Academy, Indian Army, Airforce मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत आणि आज ते राष्ट्राच्या सीमांचे रक्षण करत अभिमानाने सेवा बजावत आहेत.
विशेष म्हणजे, आज मुलींसाठी स्वतंत्र SPI नाशिक येथे सुरू आहे.
ही फक्त संस्था नाही… तर स्त्री-समतेची, आत्मविश्वासाची आणि सैनिकी सक्षमीकरणाची एक नवी क्रांती आहे.
🏆 कोण अर्ज करू शकतो..?
2026 मध्ये 10 विचा प्रत्येक विद्यार्थी ज्याच्या मनात..
🔥 स्वप्न आहे,
🔥 जिद्द आहे,
🔥 आणि देशासाठी काही करण्याची तळमळ आहे,
तो/ती या परीक्षेसाठी पात्र आहे.
📌 प्रवेश प्रक्रिया व अटी:
1) पात्रता:
विद्यार्थी Maharashtra domicile रहिवाशी असावा.
जन्मतारीख:
Boys: 02 January 2008 ते 01 January 2010
Girls: 01 January 2008 ते 01 January 2010
2) शारीरिक पात्रता (NDA मानदंडानुसार):
Boys: Height — 157 cm, Chest — 77 to 82 cm
Girls: Height — 152 cm
BMI, Weight आणि Vision UPSC नियमांनुसार.
🎓 प्रवेश परीक्षा: 05 April 2026
प्रश्न प्रकार: MCQ Based (600 Marks)
विभाग:
Mathematics: 75 Questions
General Ability Test (GAT): 75 Questions
Marking System:
✔ Correct Answer: +1
❌ Wrong Answer: -1
निकालानंतर Interview आणि SSC Marks यांच्या आधारे Final Selection होईल.
💻 अर्ज प्रक्रिया:
📍 अर्ज Online भरायचा..
Application Fee: ₹500/-
📅 महत्त्वाच्या तारखा:
अर्जाची अंतिम तारीख : 28 February 2026
Hall Ticket उपलब्ध : 23 March 2026
प्रवेश परीक्षा : 05 April 2026
कधी कधी जीवन बदलण्यासाठी मोठी संधी लागत नाही,एक योग्य निर्णय… आणि एक योग्य दिशा पुरेशी ठरते.
जर तुमच्या मनात प्रश्न असेल—“मी काय बनू?”
तर SPI तुमच्यासाठी उत्तर निर्माण करते
“देशाचा रक्षक, सीमांचा प्रहरी आणि भारताचा अभिमान!”
ही वर्दी केवळ पोशाख नाही… ती जबाबदाऱ्यांची पवित्र शपथ आहे...जर ती अंगावर धारण करण्याचं स्वप्न असेल तर त्या दिशेने पहिलं पाऊल म्हणजे SPI प्रवेश परीक्षा.
अधिक माहितीसाठी ह्या संकेतस्थळला भेट द्या :
www.spiaurangabad.com
.jpg)

0 Comments