प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो,
आज दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मनात अनेक प्रकारच्या भावना सैरावैरा धावत आहेत...उत्सुकता, आनंद, भीती, आणि थोडीशी चिंता देखील.
हा क्षण केवळ निकाल पाहण्याचा नसून, आपल्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा आहे.
या टप्प्यावर आपण सगळ्यांनी....विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी..एकमेकांशी मनमोकळा संवाद साधणं फार गरजेचं आहे.
चला तर मग, अशाच विचारांच्या धाग्यातून एक मुक्त संवाद घडवूया…
विद्यार्थी आणि पालकांशी मन:पूर्वक, सुसंवादी, आणि सकारात्मक संवाद...
पटलं तर नक्की वाचा..!
✅ जो काही अपेक्षित किंवा अनपेक्षित निकाल असेल, तो निर्भयपणे स्वीकारा.
✅ अवास्तव अपेक्षा नकोत – त्या केवळ निराशेचं बीज पेरतात. वास्तवात पाय रोवून, पुढचा मार्ग शोधा.
✅ आपल्या मुलांना समजून घ्या – त्यांच्या प्रत्येक भावना, त्यांच्या अश्रूंना शब्द द्या.
✅ अपयश आलं, तर शहाणपणाची आणि प्रेमाची सावली द्या – कारण हीच वेळ आहे त्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवायची.
🎓 तुलना नको.. कोणाचीही.. कोणासोबतही नकोच..!
⚠️ चिडू नका – शिक्षण म्हणजे एक स्पर्धा नव्हे, ती एक आत्मविकासाची वाट आहे.
⚠️ जर अपयश आलं तर, त्यांना मनोधैर्य द्या – कारण आजची फटके बसलेली स्पर्धा, उद्याचा शिलेदार घडवते.
❌ इतर मुलांशी तुलना करणे टाळा. प्रत्येक मुलं ही वेगळी कहाणी आहे.
❌ मुलं जर नापास झाली तर रागावू नका — समजून घ्या.
✅ शिक्षण हा स्पर्धा नव्हे, प्रवास आहे — ही जाणीव निर्माण करा.
✅ त्यांना अपयश झेलायचं बळ द्या. कारण हेच कौशल्य आयुष्यभर उपयोगी पडतं.
✅ 'गुण' म्हणजे गुणवत्ता नव्हे – खरी गुणवत्ता दिसते ती त्यांच्या आचार-विचारांत, जिद्दीत आणि चिकाटीत.
✅ आपली गुणपत्रिका त्यांना दाखवा – आपली वाट कशी गडद होती, हे त्यांना समजेल.
✅ लक्षात ठेवा – नापास झाला म्हणून केवळ तोच जबाबदार नाही, ही संपूर्ण यंत्रणेचीही जबाबदारी आहे.
✅ यंदाही कदाचित मुलींचीच सरशी असेल – पण तुलना करत बसू नका.
✅ गल्लीतील Toppers म्हणजे यशाचं प्रमाणपत्र नाही – Newton आणि Einstein ही 'शाळकरी यशात' यशस्वी नव्हते..!
✅ 'नापास' हा शब्द आता इतिहासजमा होतोय – आता आहे 'कौशल्य विकासास पात्र'!
✅ 3 किंवा अधिक विषयांत नापास असले तरी, पर्याय आहेत – आयुष्याचं दार अजून उघडंच आहे.
⛔️ शालेय शिक्षणातील मार्क आणि दहावीचे गुण हे एकमेकांशी तुलना करण्याजोगे नसतात – परीक्षांचं स्वरूपच वेगवेगळं असतं.
⛔️ कमी टक्केवारी म्हणजे अपयश नव्हे – त्यांचं मनोबल खचू नये यासाठी पालकांनीच खंबीर साथ द्यायला हवी.
⛔️ समाज फक्त निकालाच्या दिवशी आठवतो – पण तुमचं बाळ तुमच्याकडे रोज बघतं. त्याच्या डोळ्यांत तुमचाच विश्वास असतो.
✅ उत्तम निकाल मिळालेल्यांचं अभिनंदन..!
...पण ज्या विद्यार्थ्यांचं यंदा चुकलं, त्यांनाही सांगायचंय – "हे अपयश शेवट नव्हे, सुरुवात आहे!"
मनात ठसवून द्या –
" खचू नकोस, लढत राहा, आयुष्याचा संघर्ष सतत जिंकत राहा...! "
जिद्द, चिकाटी, आणि Positive Thinking हेच तीन शस्त्र हाती घ्या. यश हे आल्याशिवाय राहणार नाही ...हीच शिकवण आपल्या घरात रुजवा.
आपण सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत ....तुमच्या यशात नाही, तर संघर्षातही साथ देणारे...!
आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
– एक विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक:
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी संपर्क:
0 Comments