प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकहो,.
बारावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मनापासून थोडा संवाद साधण्याची इच्छा आहे. काही विचार, काही सूचना आणि थोडंसं मार्गदर्शन....वाचा आणि पटलं तर नक्की आत्मसात करा..✍️
🎓निकालाबद्दल स्वीकार आणि समजूतदारपणा...
✅ अपेक्षित असो वा अनपेक्षित — निकालाचा स्वीकार करा. तो तुमच्या प्रवासाचा एक टप्पा आहे, अखेर नाही.
✅ अवास्तव अपेक्षा बाळगू नका. आयुष्य हे गुणपत्रिकेपेक्षा खूप मोठं आहे.
✅ आपल्या मुलांना समजून घ्या. त्यांची घालमेल, त्यांची अस्वस्थता समजून त्यांना आधार द्या.
✅ अनपेक्षित निकाल आल्यास त्यांचं मनोबल उंचावण्याचं काम आधी पालकांनी करावं.
✅ जर नापास झाले तरीही त्यांच्या मनातील निराशा दूर करा. त्यांच्यावर विश्वास दाखवा.
🎓तुलना, तणाव आणि स्पर्धा यांपासून दूर...
❌ इतर मुलांशी तुलना करणे टाळा. प्रत्येक मुलं ही वेगळी कहाणी आहे.
❌ मुलं जर नापास झाली तर रागावू नका — समजून घ्या.
✅ अपयश स्वीकारणं शिकवणं हेही यशाच्या दिशेचं पाऊल आहे.
✅ शिक्षण हा स्पर्धा नव्हे, प्रवास आहे — ही जाणीव निर्माण करा.
🎓मनाची तयारी आणि पालकत्वाची जबाबदारी.. ✍️
✅ नापास झालेल्या मुलांची अधिक काळजी घ्या — त्यांना तुटू देऊ नका.
✅ 'मार्क्स म्हणजे गुणवत्ता' — या गैरसमजापासून दूर रहा.
✅ तुमच्या स्वतःच्या गुणपत्रिका दाखवा — की यश अपयशाचा हा खेळ सर्वांनीच खेळलेला असतो.
✅ नुसती मुलं नापास होत नाहीत — त्यात पालकत्वाचाही सहभाग असतो हे कबूल करा.
आणि हो... 😱
✅ यंदाही कदाचित मुलीच बाजी मारतील... पण गुणांपेक्षा गुणीपण महत्त्वाचं..!
❌ गल्लीतील टॉपर्सशी तुलना करणे थांबवा. सगळे Newton किंवा Einstein नसतात.
✅ आजच आपल्या पाल्यांशी संवाद साधा — उशीर होऊ देऊ नका.
✅ 'हुशार' असणं ही फक्त गुणांची गोष्ट नाही — हे लक्षात ठेवा.
🎓परीक्षेपलीकडचं जीवन... ✍️
❌ दहावी-बारावीच्या टक्केवारींची तुलना करणे मूर्खपणाचं आहे — अभ्यासपद्धती, विषय, आणि परीक्षेची शैली वेगळी असते.
✅ कमी टक्केवारी आलेल्या मुलांना जास्त मानसिक धक्का बसतो — त्यांना पालकांची गरज असते.
✅ समाजाच्या दृष्टीने हे निकाल महत्त्वाचे असले तरी, आयुष्य त्याही पुढे आहे.
❌ "नापास" हा शिक्का लावू नका — अनेक यशस्वी लोकांनी सुरुवात इथूनच केलेली असते.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं मित्रांनो... ✍️
निकाल कुठलाही असो — तुमचं स्वप्न अजून जिवंत आहे!
यश आल्यास अभिमान ठेवा, आणि अपयश आलं तर त्यातून शिकून पुढे चालत राहा.
" खचू नको, लढत रहा, आयुष्याच्या लढाईत यश तुझंच होणार आहे..! "
जिद्द, चिकाटी, आणि सकारात्मक दृष्टीकोन — हीच खरी तयारी.
मुलांच्या हातात हात देऊन त्यांना आत्मविश्वास द्या.
आपली साथ, त्यांचं स्वप्न, आणि एक उज्वल भविष्य ...हे साध्य होणारच..!
आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
– एक विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक:
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी संपर्क:
0 Comments