🎯 " विद्यार्थी आणि पालकांशी एक मुक्त संवाद... शिक्षणाच्या नव्या अर्थासाठी!"

पालकांनी आणि शिक्षकांनी एकदा तरी विद्यार्थ्यांचं मन ऐकावं, कारण त्यांच्या शांततेतही ओरड दडलेली असते..! 

आज भारत “तरुणांचा देश” म्हणून ओळखला जातो; पण हीच तरुण पिढी आज मानसिक दबाव, ताण आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकली आहे. हे वास्तव जितकं वेदनादायी आहे, तितकंच विचार करायला लावणारं आहे.

दरवर्षी भारतात सुमारे 6 कोटी (60 Million) विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी संघर्ष करतात..NEET, JEE, MPSC, UPSC अशा परीक्षा म्हणजे जणू आयुष्य-मृत्यूचा आखाडा बनला आहे...

लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही अपयशाच्या छायेत हरवतात...

आकडे सांगतात...( एका वेब पोर्टलच्या आधारे सन 2024 च्या माहिती वरून..)

NEET मधील 24 लाख (2.4 million) परीक्षार्थ्यांतून फक्त 1.08 लाख (108,000) विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालं..

JEE मधील 12 लाख (1.2 million) विद्यार्थ्यांतून फक्त 16 हजार (16,000) जागावर प्रवेश झालेत..

आणि UPSC मधील 10 लाख (1 million) उमेदवारांतून फक्त सुमारे 1 हजार (1,000) निवडले गेले आहेत..

म्हणजेच 99% विद्यार्थी “अपयशी” ठरतात, पण प्रत्यक्षात ते अपयशी नसतात तर अपयशी असतो तो शिक्षणाच्या प्रणालीगत दृष्टिकोन,..

जो यशाचं एकच मापदंड ठरवतो.. “नंबर” आणि “नोकरी”!

🧠 मानसिक आरोग्याचा विसरलेला धडा..

स्पर्धा परीक्षांतील अपयश हे केवळ करिअरचं नव्हे तर मानसिक आरोग्याचं संकट निर्माण करतं..

जागतिक आरोग्य संघटनेनुसार...मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीला स्वतःच्या क्षमता ओळखता याव्यात, तणावाशी लढता यावा, आणि समाजासाठी उपयोगी ठरता यावं.

परंतु आपल्या विद्यार्थ्यांचं वास्तव काही वेगळंच सांगतं..

आज शिक्षणाचं क्षेत्र कितीही आधुनिक झालं असलं, तरी विद्यार्थ्यांच्या मनाचं आरोग्य दिवसेंदिवस खालावत चाललं आहे.

हे फक्त आकडे नाहीत.. तर एका पिढीचं मूक आरडं-ओरडं आहे,हे आपल्या लक्षात यायलं हवं.. आणि त्यानुसार त्यांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे, असं मला वाटतं मित्रांनो..

65% विद्यार्थ्यांना झोपेच्या समस्या आहेत..

म्हणजेच प्रत्येक तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी रात्री सहज झोपू शकत नाहीत. अभ्यासाचा ताण, निकालाची भीती आणि पालकांची अपेक्षा.. या त्रिसूत्रीने त्यांच्या मेंदूवर इतका ताण आणला आहे की मन शांत होणं अशक्य झालं आहे. 

झोपेचा अभाव म्हणजे मानसिक आरोग्याचं पहिला इशारा.. पण समाज त्याकडे दुर्लक्ष करतो.

92% विद्यार्थी चिंतेत आहेत... 

चिंता आज शिक्षणव्यवस्थेचा “नवा साथीदार” बनली आहे. Marks, Rank, Attempt, Failure..या शब्दांनी त्यांचं आयुष्य व्यापलं आहे. ही चिंता फक्त परीक्षेपुरती मर्यादित नाही; तर ती त्यांच्या आत्मविश्वासावर, संवाद कौशल्यांवर आणि निर्णयक्षमतेवर गडद सावली टाकते.

45% विद्यार्थी नैराश्यग्रस्त आहेत..

हा आकडा सांगतो की जवळजवळ अर्धी तरुण पिढी भावनिक थकव्यातून जात आहे. सततची तुलना, सोशल मीडियावरील दडपण, आणि “यश म्हणजेच अस्तित्व” ही विकृत मानसिकता..

या सर्वांनी त्यांच्या अंतर्मनातील प्रकाश हरवला आहे. काही विद्यार्थ्यांना तर वाटतं, “मी कितीही प्रयत्न केला तरी मी अपुरा आहे.” हे वाक्यचं नैराश्याचं मूळ आहे.

20% विद्यार्थ्यांना आत्महत्येचे विचार येतात.. 

हा आकडा भयावह आहे.. म्हणजेच प्रत्येक पाचपैकी एक विद्यार्थी “जगावं का?” या प्रश्नाशी रोज झगडतो. ही परिस्थिती केवळ व्यक्तिगत नाही, तर ती आपल्या शिक्षणसंस्कृतीच्या अपयशाची साक्ष आहे.. 

जर विद्यार्थी आत्महत्येचा विचार करत असेल, तर त्याचा अर्थ असा की समाजाने त्याला ऐकणं बंद केलं आहे, आणि त्याचं मूल्य फक्त निकालांमध्ये मोजायला सुरुवात केली आहे.

2013 ते 2022 दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये तब्बल 64% वाढ झाली आहे, आणि 2024 मध्ये विद्यार्थी आत्महत्यांचा आकडा शेतकऱ्यांपेक्षा अधिक झाला.. हा आकडा नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनाशून्यतेचा आरसा आहे.

आपल्याला बदलण्याची गरज आहे मित्रांनो..

शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठीच असावं का? की माणूस घडवण्यासाठी?

आज स्पर्धा परीक्षा “संघर्ष परीक्षा” बनल्या आहेत, जिथे विद्यार्थीपेक्षा पालक अधिक तणावात असतात. पालकांचं स्वप्न, समाजाची अपेक्षा आणि इतरांच्या यशाची तुलना.. या सर्वांनी तरुणांचं मानसिक संतुलन उद्ध्वस्त केलं आहे.

आपण विसरलो आहोत की.. अपयश हा शेवट नाही,तर तो शिकण्याचा आरंभ आहे..

आपण शिकलं पाहिजे की.. मानसिक स्वास्थ्य हीच खरी यशाची पायरी आहे..

🌱 नवी दिशा, नवा विचार..

आता वेळ आली आहे,..शिक्षणव्यवस्थेनं केवळ परीक्षेवर नव्हे तर व्यक्तिमत्त्वावर भर द्यावा..पालकांनी “रँक” पेक्षा मन:शांतीला प्राधान्य द्यावं आणि समाजानं “अपयशी” ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे संवेदनशीलतेनं पाहावं.

विद्यार्थ्यांना मानसिक दृढता, आत्मविश्वास आणि समज यांची गरज आहे.. केवळ अभ्यासाची नाही..!

शिक्षक, पालक आणि समाज जर त्यांचं मन ऐकू लागले, तर ही तरुणाई केवळ स्पर्धा जिंकणार नाही, तर जीवन जिंकण्याचंही शहाणपण शिकेल..

 “ यश म्हणजे फक्त मिळालेली पदवी नाही, तर टिकवलेलं मानसिक स्वास्थ्य आहे...स्पर्धा परीक्षा संपतील, पण आयुष्य अजून बाकी आहे...म्हणूनच ‘जगा’, फक्त ‘जिंकु’ नका..!”

आयुष्यातील खरी परीक्षा म्हणजे..स्वतःशी शांत राहण्याची क्षमता...गुण, रँक आणि रेस ह्या सगळ्या क्षणिक आहेत,.

पण मनाचं स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि जिद्द.. ह्यांनीच खऱ्या अर्थाने आयुष्य जिंकता येतं...

म्हणूनच... फक्त स्पर्धा नका करू, स्वतःला समजून घ्या..!

-विचार संकलन आणि संपादन.. ✍️

-एक शिक्षणप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख 
The Spirit of Zindagi Foundation 
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

#WorldMentalHealthDay #MentalHealthAwareness #StudentMentalHealth #EducationSystem #ExamPressure #StudentStress #YouthCrisis #MindMatters #MentalWellbeing #ListenToStudents #विद्यार्थी #पालक #शिक्षक #शिक्षणव्यवस्था #विद्यार्थीआणिपालक #मुक्तसंवाद #तरुणाई #विद्यार्थीमित्र #मनाचंआरोग्य #संवेदनशीलशिक्षण #प्रेरणादायविचार #शिक्षणाचानवाअर्थ #तणावमुक्तजीवन #मनाचेशांती #आत्मविश्वास #नैराश्य #चिंता #संघर्ष #प्रेरणा #स्वतःलासमजा #आयुष्यजिंका #स्पर्धेनकोस्वतःला #यशाचाअर्थ #मनस्वास्थ्य #StudentLife #EducationReform #ParentingMatters #YouthMentalHealth #ExamWarriors #MotivationalPost #InspiringThoughts #MentalHealthInEducation #EmotionalWellbeing #SpiritOfZindagi #DrAPJAbdulKalamFoundation #Parbhani #विचारसंकलन #प्रारफीकशेख #TheSpiritOfZindagi #प्रेरणादायलेख #जीवनविचार #ThoughtOfTheDay #PositiveMindset #InspirationForStudents #PeaceOfMind #EmotionalHealth #Motivation #LifeLessons #EducationAwareness #MentalHealthIndia #IndianYouth #StudentsFirst #HopeAndHealing