#ERROR404 : Impact of Online Education System..

येत्या काळात तंत्रज्ञान हे शिक्षकांना पर्याय होईल अशी मांडणी काही विचारवंत करत आहेत..!

👉पण शिक्षण म्हणजे आत्मसात करणे, समजून घेणे,कृती करून बघने पडताळून बघणे,चिकित्सेअंती निर्णय घ्यायला शिकणं, आस्वाद घेणे, भावनिक-मानसिक समायोजन करणे, शेअरिंग करणं.... (ही यादी आणखी वाढवता येईल ) 👉तंत्रस्नेही शिक्षणाच्या आपल्याकडे उचललेल्या ढोबळ अर्थानुसार मुलांना स्क्रीन समोर बसवणे होतं वर्गात किमान 30 चा पट धरला तरी Interaction ला वाव कुठे मिळतो? 👉वर्गात तंत्रज्ञान वापरण्याचे स्वागत आहे आम्ही वापरतो. आवश्यकतेनुसार तंत्रज्ञानाची साधने वर्गात..... पण केवळ त्यावर अवलंबून राहणे म्हणजे? पुष्कळ मोठा अल्गोरिदम सेट केलेले रोबो बाहेर काढायचे आहेत का शाळांतून आणि क्लासेस मधून आपल्याला? 👉 शिक्षक तंत्रस्नेही असले तर चांगलंच आहे पण अजिबात नसले तरी आकाश कोसळत नाही उपलब्ध साधने आणि परिस्थितीतून मुलं शिक्षित होतील अशी स्थिती निर्माण कशी करायची हे उत्तम शिक्षकाला बरोबर समजतं. काळाची मागणी मोठी आणि व्यापक आहे हे आपण जाणतोच, पण जग कितीही बदललं तरी शिक्षणाला Human टच असंण हे फार महत्त्वाचा आहे त्याखेरीज विद्यार्थी समाजाभिमुख होणं शक्य नाही असं मला वाटतं.
👉 जिथं विश्वासाला विश्वासाने शेअरिंग करता येत, अनेकदा लहान मुलांचं पालकांपेक्षा शिक्षकांची जास्त शेअरिंग असततात. हा माझा अनुभव आहे शिक्षणही शिक्षक आणि मुलं या दोघांसाठी अतिशय अटीतटीची घटना आहे जिथे संवाद, ,रागलोभ, कौतुक, उत्साह, हसणं, रडणं मित्र-मैत्रिणी आणि शिक्षक मुलांतील भावसंबंध अशा अनेक चैतन्यमय गोष्टी असतात ज्या एकूण शिक्षण प्रक्रियेला साजिवंत करत असतात.

ह्या गोष्टी शिकवण्यात शिकण्याच्या प्रक्रियेचा तितक्याच पूरक देखील असतात. काही व्यक्तींना वाटतं स्मार्ट क्लास किंवा व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे शिक्षण शक्य आहे त्यात हा सगळ्यात जिवंतपना असणार आहे का?

👉प्रत्येक मुलांची शिकण्याची गती आणि पद्धत वेगळी असते ती समजून घेताना तंत्रज्ञान पुरे पडणार आहे का? हा प्रश्न उरतोच.

👉 शिक्षकांचा वैयक्तिक संवाद, कौतुक, समजून घेणे, इतर मुलांकडून प्रेरणा मिळणे, अशा अनेक गोष्टींचा उपयोग झालेला असतो. शाळेतआणि क्लासेस मदे सगळच गुडीगुडी घडत असही नाही कधी कधी चुकून उपेक्षा वाट्याला येते मुलांची भांडण, रुसवेफुगवे होतात या ही गोष्टी असतात, ज्या सामाजिक वातावरणाची चुणूक मुलांना दाखवतात. त्यायोगे भावनिक समायोजन करण्याची मुलांची तयारी होत असते. 👉इतके वैविध्यपूर्ण Interaction #Common Problems Faced By Students In eLearning व्हर्च्युअल वातावरणात किंवा तथाकथित संपूर्ण तंत्रस्नेही पद्धतीने शक्य होईल का? तुम्हाला काय वाटतं? असो जे मला वाटतं ते मी व्यक्त केलं आपलाच: विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख, डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी. #Impactofonlineeducation: A study on online learning platforms #The Impact of Online Education in Academics #problems of online training and how to solve them #problems e-learning students experience, and how to overcome them
#Common Problems Faced By Students In e Learning