"तरुणाई म्हणजे राष्ट्राचं स्वप्नवत भविष्य...!" 

🎓 आज 15 जुलै...जागतिक युवा कौशल्य दिन...

तरुणाई ही कोणत्याही देशाची खरी ताकद असते.पण फक्त जोश असून उपयोग नाही,...तो जोश जर योग्य दिशा आणि कौशल्यांच्या साथीनं वापरला,...तरच त्यातून यशाची खरी वाट तयार होते.

जागतिक युवा कौशल्य दिन हा दिवस आपल्याला हेच आठवण करून देतो –की शिक्षणाबरोबरच कौशल्यही तितकंच महत्त्वाचं आहे.काम शिकणं, अनुभव घेणं, आणि स्वतःमध्ये नवनवीन गोष्टी निर्माण करणं –हेच तरुणपणाचं खरं सौंदर्य आहे.

आजच्या तरुणांनी केवळ नोकरी शोधणारे न राहता स्वतःच्या मेहनतीनं संधी निर्माण करणारे व्हावं, हीच या दिवसामागची खरी प्रेरणा आहे.

🌟 जागतिक युवा कौशल्य दिन: आजचा तरुण..उद्याचा शिल्पकार..

प्रत्येक वर्षी 15 जुलै हा दिवस संपूर्ण जगभर "जागतिक युवा कौशल्य दिन" म्हणून साजरा केला जातो.
याची स्थापना 2014 साली संयुक्त राष्ट्रसंघाने केली आणि 2015 पासून तो औपचारिकपणे पाळला जातो.

या दिवसाचा उद्देश स्पष्ट आहे.

 “ तरुण पिढीमध्ये रोजगारक्षम आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास घडवणे, जेणेकरून ते आत्मनिर्भर, सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धेस पात्र ठरतील. ”

🔍 आजची स्थिती – एक तळमळ, एक संधी..

आज जगातल्या सुमारे 1.3 अब्ज तरुणांपैकी 60 % पेक्षा अधिक तरुण बेरोजगार, अल्प रोजगार किंवा कौशल्यविना कार्यरत आहेत.भारताची तरुणसंख्या जगात सर्वाधिक असली, तरी कौशल्याच्या बाबतीत भारत अजूनही मागे आहे.

🎓 तरुणांसमोरील आजची प्रमुख आव्हाने...

1. शिक्षण आणि कौशल्य यातील दरी...

शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात पुस्तकी ज्ञान अधिक, पण प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक कौशल्ये अपुरी.

2. Digital Divide..

ग्रामीण व शहरी भागातील डिजिटल तफावत; अनेकांना डिजिटल कौशल्यं शिकण्याच्या संधीच नाहीत.

3. उद्योगांना लागणारी कामगार गुणवत्ता...

कंपन्यांना "Ready-to-Work" तरुण हवे असतात; मात्र बहुतेक तरुण तयार नसतात.

4. कौशल्य शिक्षणाकडे समाजाचा न्यूनगंड..

ITI, Polytechnic किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाला अजूनही दुय्यम दर्जा दिला जातो.

🎯 कौशल्य विकासाचं महत्त्व...

कौशल्य म्हणजे केवळ हातचं काम नव्हे,तर ते आहे विचारांची धार, संधीचं रूपांतर आणि आत्मसन्मानाचा मूलाधार.

1. रोजगार निर्माण – कौशल्य असेल तर रोजगार मागावा लागत नाही, तो स्वतः तयार करता येतो.

2. उद्योजकता वाढवते – अनेक तरुण कौशल्यामुळे स्वतःचं स्टार्टअप सुरू करू शकतात.

3. आर्थिक स्वावलंबन – शिक्षणानंतरची रिकामी पोकळी कौशल्य प्रशिक्षण भरून काढते.

4. समाजप्रगती – कौशल्यवाढ म्हणजे समाजाचं उत्पादन वाढवणं...


भारत सरकारचे प्रयत्न आणि योजना

1. Skill India Mission (2015) – 40 कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं ध्येय.

2. PMKVY – प्रधानमंत्री कौशल विकास योजना

3. NSDC – National Skill Development Corporation

4. ITI, Polytechnic, Apprenticeship schemes

5. Startup India, Digital India योजनेची जोड


📈 भविष्याचं दिशा-निर्देश...✍️

✅ Skill-Based Education प्रणालीचा आग्रह.

✅ शालेय स्तरावरच व्यावसायिक शिक्षणाची ओळख.

✅ Digital Skills, AI, Data Science, Green Technology, Robotics अशा क्षेत्रांतील कौशल्याला प्राधान्य.

✅ Social-Emotional Skills – म्हणजे leadership, teamwork, empathy यावर भर.

✅ ‘Job Seekers’ पेक्षा ‘Job Creators’ घडवण्याचं धोरण.

✊ नव्या पिढीकडून अपेक्षा..

"तुमच्या हातात फक्त स्मार्टफोन नको, तर स्मार्ट कौशल्यं हवीत.
तुम्ही फक्त follower न राहता creator व्हा. वस्तूंची निर्मिती करा, कल्पनांचं मूल्य ओळखा आणि कष्टाला प्रतिष्ठा द्या."

जागतिक युवा कौशल्य दिन हा केवळ एका दिवसाचं औचित्य नसून  तो तर आहे आपल्या तरुणांचं उदात्त सामर्थ्य ओळखण्याचा, त्यांना योग्य दिशा देण्याचा आणि "डिग्री नव्हे, तर कौशल्य हीच खरी करिअरची गुरुकिल्ली आहे" हे सांगणारा एक ठोस संकल्प.

 "कौशल्य हीच आजची संपत्ती आहे,आणि तरुणाई हेच तिचं भांडवल!"

धन्यवाद मित्रांनो..🙏

-माहिती संकलन आणि संपादन..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख 
DR.KALAM GROUP OF EDUCATION AND RESEARCH FOUNDATION PARBHANI.


#WorldYouthSkillsDay, #YouthSkills, #SkillIndia, #EmpowerYouth, #YouthPower, #SkillUp, #FutureReady, #DigitalSkills, #VocationalTraining, #SkilledYouth, #YouthForChange, #YouthDevelopment, #MakeInIndia, #SelfReliantIndia, #NewIndia, #JobsAndSkills, #SkillIsPower, #LearnToEarn, #StartupIndia, #SkillingTheNation, #YouthEmpowerment, #IndiaSkills, #Skill4Life, #AtmanirbharBharat, #SkillsForTomorrow