विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाच्या बोर्ड परीक्षा संपल्यानंतर निकाल येईपर्यंत उन्हाळी सुट्यांच आपल्या भावी करिअरच्या दृष्टीने अतिशय विचारपुर्वक योग्य मार्गदर्शकांच्या मदतीने आणि मार्गदर्शनातूच योग्य निर्णय योग्य वेळी घेऊन ह्या सुट्यांचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न नक्कीच करा मित्रांनो आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा.


खालील सूचित केलेल्या काही गोष्टी पालकांनी, शिक्षकांनी तसेंच मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना नक्कीच सुचवा त्यांना करायला आवडेल ही खात्री बाळगतो.


1) संगणक शिक्षण :

संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे..!

२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक मानले गेले आहे..! 

संगणक ही तंत्रज्ञानाचा एक अविष्कार आहे..!

आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा मुक्त वापर होतांना दिसतो..! संगणकाच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सुलभ झाली आहेत..!

आपल्या दैनंदिन व्यवहारात,रेल्वे बस आरक्षण, हॉस्पिटल, शाळा, बँका, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, रुग्णालये, सरकारी-खाजगी कार्यालये सगळीकडे संगणकाचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती व कागदपत्रे संबधित कार्यालयात व्यक्तीशः न जाता इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहज उपलब्ध होतात. परीक्षेचे व नोकरीचे अर्ज भरण्यापासून त्याच्या निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. 

 याकरिता संगणकाचे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे आहे. पूर्वी ज्याला अक्षर कळत नसे त्यालाच निरक्षर म्हटले जाई, आता मात्र ज्याला संगणक वापरता येत नाही त्यालाही निरक्षरच मानले जाते, इतका संगणकाचा प्रभाव वाढला आहे. संगणकाचे शिक्षण घेऊन त्याचा व्यवसाय वा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक कमालीचे यशस्वी झालेले आढळतात. अनेकांनी देश-विदेशात ‘तगड्या’ पगाराच्या नोकऱ्यादेखील मिळविल्या आहेत. म्हणूनच संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे.

आजच्या काळात संगणकीय शिक्षण तेही व्यावसाईक पातळीवर विद्यार्थ्यांनी आत्मसात करून वेळीच तंत्रकौशल्य हस्तगत करून पुढील करीअर साठी खूपच उपयुक्त आहे.

आज संगणकाविना कुणाचेही पान हलत नाही. सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर सुरु झाला आहे . संगणकाबरोबरच नवीन प्रगत तंत्रज्ञानाची माहिती.

राष्ट्रीय पातळीवरील केंद्र सरकारच्या NIELT या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा दर्जेदार प्रमाणपत्र अभ्यासक्रम CCC तयार केला आहे तो ईतर कोर्सेस पेक्षा राष्ट्रीय स्तरांवर एकमेव कोर्स आहे तो 2-3 महिन्यात पूर्ण करता येऊ शकतो.


MKCL चा MS-CIT कोर्स ही राज्यातील सर्वच प्रकाराच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त कोर्स तो अगदी 2 महिन्यात आपल्या गतीप्रमाणे पूर्ण करता येऊ शकतो.


2) इंग्रजी भाषेवर प्रभुत्व प्राप्त करणे :


जागतिक ज्ञान तसेच Internet वर अधिकृत प्रमाण भाषा स्वीकारताना आपल्या व्यावसाईक तसेच सामजिक जीवनात इंग्रजी भाषा हे प्रतिष्ठेचं मानबिंदू मानला जातो, यासाठी या सुट्यांत आपल्या आर्थिक स्थिती नुसार English Spoken क्लासेस Join करणे किंवा घरीच YouTube च्या मदतीने अभ्यास करून आपण आपल्या सुट्यांचा योग्य सदुपयोग करू शकतो.


3) Foundation Batches करणे :


दहावीच्या विद्यार्थ्यांनी या सुट्यात वैद्यकीय क्षेत्रातील करिअर साठी NEET Foundation ची पूर्वतयारी करून घेणारे क्लासेस Join करणे.

ज्या विद्यार्थ्यांना Engineering क्षेत्रात करिअर करायचंय असेल तर त्यांनी हमखास IIT-JEE Foundation क्लासेस Join करताना Mathematics, Physics व Chemistry कडे विशेष लक्ष देणे.


✔ बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे करिअर जर स्पर्धा परीक्षा निश्चित असेल तर त्यांनी Internet च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती घेऊन अभ्यासक्रमाच्या Print out काढावी व उपयुक्त संदर्भ ग्रंथाचे आणि काही पायाभूत संकल्पनांची योग्य तयारी करून पुढील कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी सुसज्ज होणे.

शक्य झाल्यास क्लासेसही Join करू शकता.


4) जास्तीत जास्त पुस्तके वाचणे:


शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा संपल्यानंतर आपल्या सुट्यांचा सदुपयोग करणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टीत जास्तीत जास्त पुस्तक वाचणे यांस अग्रक्रम देणें.

" पुस्तकासारखा दुसरा अन्य कोणताच श्रेष्ठ मित्र नाही...✔ "

पुस्तक वाचनातून आपलं मस्तक सुधारतं आणि तेंच मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही मित्रांनो,म्हणून जास्तीत प्रेरणा दाई पुस्तके वाचा आणि आपल्या मन व मस्तिष्कला योग्य दिशा द्या आणि आयुष्यात उज्ज्वल यश संपादन करा.

मार्गदर्शक , पालक , शिक्षक, काही यशस्वी विद्यार्थ्यांनी,समाजातील काही थोर माणसांनी विद्यार्थ्यांना काही पुस्तके सुचवली आहे ती अगदी सर्वत्र विनामूल्य ई-बुक pdf स्वरूपात ईथे आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहे,कृपया याचा आपण सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.5) नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे:


आजच्या काळात आपल्या अवती भवती घडणाऱ्या सर्वच प्रकारच्या घटनांचा आपणास वेध घेता येणं आवश्यक आहे मित्रांनो,म्हणून आपल्या घरी येणाऱ्या काही दर्जेदार वर्तमानपत्रात दैनिक लोकसत्ता, The Hindu,सकाळ, पुढारी, दैनिक लोकमत, पुण्यनगरी , The Times of India ई. आदी वर्तमानपत्रातील संपादकीय लेख अवश्य वाचा. शक्य असल्यास काही मासिकेही वाचा.


6) पर्यटन स्थळाला भेट देणें:


निसर्गाच्या सहवासात आनंदाचे क्षण घालविण्याची आणि नवनवीन कला, संस्कृतीविषयी जाणून घेण्याची माणसाची मुलभूत प्रवृत्ती पर्यटनाचा मूळ आधार आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला तेवढेच महत्व आहे. आज वेगवान दळणवळणाच्या साधनाने जग जवळ आले असताना देशाबरोबरच बाहेरचे जग जाणून घेण्याच्या माणसाच्या ओढीने हे आपण प्रेक्षणीय स्थळे अवश्य पाहावीत.


सुट्यात विशेष बाब म्हणजे हवा पालटासाठी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी, ऐतिहासिक स्थळांना ग्रुप करून भेट देणे आणि आयुष्याच्या जीवनप्रवासाचा आनंद घेण्यासाठी सक्षम बनणे.


6) व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करणे:


कौटुंबिक -सामाजिक मूल्य , समाज -संस्कृती यांचं देहभान ठेऊनच विद्यार्थ्यांची देहबोली , आचरण , विचरणं , वेशभूषा , Attitude ई. महत्त्वपूर्ण घटक विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात भर टाकतात , आपण सर्वांनी याचा विचार अवश्य करावा.


7) छंद जोपासणे..


8) आवडता खेळ सवडीने खेळणे..


9) अत्यावश्यक जीवन कौशल्ये आणि सॉफ्ट स्किल्स आत्मसात करणे. 


10) प्रगत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी काही तंत्रस्नेही टुल्स कौशल्य पूर्वक हाताळता येण्यासाठी शॉर्ट टर्म प्रशिक्षण YouTube च्या माध्यमातून शिकणे. 


11) दरदिवशी नवं  तंत्र कौशल्य शिकणे. 


12) मोबाईल फोनचा शैक्षणिक पूरक अध्ययनांसाठी 'स्मार्ट' वापर करण्याचं कौशल्ये विकसित करणं. 


13) दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या काही बाबी शास्त्रशुद्ध पणे शिकणं..


14) दहावी आणि बारावी परीक्षेनंतर असणाऱ्या सर्वं स्पर्धा परीक्षाचीं  माहिती मिळवणे.


15) लोकं संवाद क्षमता विकसित करण्यासाठी अवती भवती होणाऱ्या सामाजिक कार्यात सहभाग नोंदवुन नवीन मित्र जोडणे.


16) स्वतःचा आचार , आहार , विचार आणि वर्तन काल सुसंगतपणे ठेवण्यासाठी दररोज नव्या गोष्टीचा शोध घेणे आणि त्या अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे. 


आणि ...


17) शैक्षणीक आणि प्रेरणादायी  Web Series , YouTube Documentary , काही शॉर्ट फिल्म्स  पाहणे..

 

18) ई. आदी योग्य आणि सकारात्मक बाबी.


आजच्या या स्मार्ट काळात प्रत्येक जण सुज्ञ आहे ,आपल्या निर्णय क्षमतेच्या कुंवती प्रमाणे काळानुसार योग्य पाऊले उचलण्यास सक्षम आहे, आपणास वर दिलेल्या बाबी ह्या सर्वांना अपेक्षित लागू होतीलच याची शास्वती कोणी देऊ शकणार नाही मित्रानो परन्तु याहीपेक्षा अजून बऱ्याच चांगल्या गोष्टी आपण करू शकता याचा मला पूर्ण विश्वास आहे, तरी आपल्या या सुट्यांचा आपण आपल्या भावी करिअरच्या दृष्टीने निश्चितच सदुपयोग कराल अशा शुभेच्छसह अनेक आशिर्वाद आपणांस.


आपल्या भावी उज्ज्वल करिअर साठी हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..


आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक :

विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ,परभणी.

🔰 Mentor | Educator | Motivator | Guide

"Stay Hungry and Stay Foolish."

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन

"Nurturing Potential Through Education"

A Foundation For Education , Knowledge and Development

https://www.vidhyarthimitra.com