आजच्या स्पर्धेच्या युगात प्रशासनात जाऊन समाजासाठी काम करण्याचे स्वप्न अनेक तरुणांच्या मनात असते. मात्र आर्थिक अडचणी, दर्जेदार मार्गदर्शनाचा अभाव आणि योग्य संसाधने न मिळाल्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडतात.
अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांनी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.
सन 2026 मध्ये होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना पूर्णवेळ, विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी "सामायिक प्रवेश परीक्षा (CET) 2026-27 आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेशासाठी घेतली जाणार आहे.
SIAC म्हणजे काय?
SIAC (State Institute for Administrative Careers) ही महाराष्ट्र शासनाची संस्था असून नागरी सेवा, राज्यसेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देते. अनेक यशस्वी IAS, IPS, IRS आणि इतर अधिकारी घडविण्यात या संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
🎓 प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक:
ऑनलाइन अर्ज सुरू: 1 जून 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जून 2026
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 19 जून 2026
सामाजिक प्रवेश परीक्षा: 19 जुलै 2026 (ऑफलाइन पद्धतीने)
🎓प्रशिक्षण केंद्रे :
या प्रवेश प्रक्रियेद्वारे खालील केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे:
मुंबई (SIAC), नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती
नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, सावित्रीबाई फुले अकादमी, पिंपरी-चिंचवड
🎓निवड प्रक्रिया कशी असेल?
विद्यार्थ्यांची निवड दोन टप्प्यांत होणार आहे : 1. लेखी परीक्षा 2. मुलाखत
या दोन्हींच्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यामुळे केवळ अभ्यासच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकास आणि संवाद कौशल्यांवरही भर देणे आवश्यक आहे.
🎓 विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना..
-अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरा.
-UPSC च्या अभ्यासक्रमाची प्राथमिक ओळख करून घ्या.
-चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि विज्ञान यांचा नियमित अभ्यास सुरू करा.
-मुलाखतीसाठी आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता आणि सामाजिक जाणीव विकसित करा.
-अधिकृत संकेतस्थळावरील सूचना नियमित तपासत रहा.
🎓ही संधी का महत्त्वाची आहे?
UPSC ची तयारी ही केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नसते; ती व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया असते. प्रशासनात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी SIAC चे मोफत प्रशिक्षण म्हणजे संधीचे सोनं करण्याची सुवर्णसंधी आहे. योग्य मार्गदर्शन, अभ्यासाचे वातावरण आणि तज्ज्ञांचे सहकार्य मिळाल्यास सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवू शकतो.
स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठा असतो. पण योग्य दिशेने टाकलेलं एक पाऊल आयुष्य बदलू शकतं. SIAC ची ही प्रवेश परीक्षा अनेक तरुणांच्या प्रशासकीय सेवांच्या प्रवासाची पहिली पायरी ठरू शकते. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी ही संधी दवडू नये. कारण यश हे केवळ बुद्धिमत्तेने मिळत नाही, तर योग्य संधी ओळखून तिचा लाभ घेण्याच्या धाडसाने मिळते.
"आजचा अर्ज उद्याचा अधिकारी घडवू शकतो."
अधिकृत वेबसाईट : www.siac.org.in
टीप :
अधिक माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या आणि सर्व पात्रता, अटी, नियम व सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करा, मित्रांनो.
सदर पोस्ट केवळ माहिती व जनप्रबोधनाच्या उद्देशाने प्रसारित करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया, पात्रता, अर्ज पद्धती किंवा इतर कोणत्याही बाबींसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीच अंतिम व ग्राह्य मानावी. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवरून सविस्तर माहिती घेण्याची विनंती.
धन्यवाद.! 🙏
-माहिती संकलन आणि संपादन.. ✍️
-एक शैक्षणिक मार्गदर्शक आणि समुपदेशक..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
https://tinyurl.com/3v8keea2
0 Comments