शिका मनापासून, मागे वळू नका।
प्रयत्न जिद्दीने करत राहा,
यश नक्कीच मिळेल, थांबू नका!
🎓पूर्व-तयारी : दहावी बोर्ड परीक्षेची..✍️
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परिवाराच्या वतीने दररोज 8-10 तास स्टडी सर्कल, विषय-निहाय सुंदर तयारी, तज्ज्ञ शिक्षकांचं दररोज मार्गदर्शन, प्रत्येक विषयाचे सर्वोत्तम अभ्यास साहित्य, पूर्ण पेपरचं मार्गदर्शन, वेळेचं अचूक नियोजन, पालकांचं स्नेह-पूर्वक सहकार्य, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचं मोलाचं पाठबळ, सामाजिक बांधिलकी, नित्य-नवे शैक्षणिक प्रयोग, आमच्या शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह या सर्व पूरक बाबींमुळे दहावीच्या परीक्षेची उत्तम तयारी म्हणजे येणाऱ्या काळात परीक्षेत मिळणारं घवघवीत यश असतं, मित्रांनो!
विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी फाउंडेशन विशेष उपक्रम राबवत आहे. स्वाध्यायाचे नियोजन, सराव परीक्षा, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, प्रश्नांचा सखोल अभ्यास आणि ताण-तणाव मुक्त अभ्यास यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वृद्धी होण्यासाठी नियमित प्रेरणादायी सत्रे, मोटिवेशनल स्पीच आणि मनोबल वाढवणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
आपणा सर्वांचं पाठबळ आणि स्नेह-पूर्वक सहकार्य हे नेहमीच आमच्या कार्यात प्रेरणादायी बळ निर्माण करणारं आहे, मित्रांनो!
आजपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा! आत्मविश्वास ठेवा, मनःपूर्वक अभ्यास करा आणि उज्ज्वल यश मिळवा!
शुभेच्छांसह मित्रांनो.. ✍️🌹
🙏आपलाच विनम्र स्नेहाकिंत आणि मार्गदर्शक:🙏
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
0 Comments