🎓हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा... 🌹
नेतल दिलीप शर्मा..
( वर्ग :10 वी सेमी-इंग्रजी माध्यम)
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक परिवाराचीं 2023-24 ह्या शैक्षणिक वर्षांत 9 वी वर्गात शिकणारी गुणी आणि आदर्श विद्यार्थीनी... काल 1 मे 2024 रोजी 9 वी वर्गाच्या एकूण निकालात श्री. छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालयात शाळेत सर्वंप्रथम येतं 96 % गुण संपादीत केले आहे, त्याबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन.. 🌹
वर्षभर नियमित अभ्यास, वेळेचं सुंदर नियोजन, अभ्यासक्रमाच्या क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे पूरक अभ्यास साहित्याचा योग्य वापर, अध्ययन प्रक्रियेत पालकांचं सहकार्य व अभ्यास प्रेरणा .. शिक्षकांचं प्रामाणिक अध्यापन.. नियमित परीक्षा सराव.. मोबाईल फोनचा अभ्यासात पूरक वापर आणि विद्यार्थ्यांचं आपल्या अभ्यास ध्येयाविषयी असलेली प्रामाणिक कटीबद्धता.. निरंतर अभ्यास कार्य-प्रेरणा... कोणत्याही सर्वं सामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक विद्यार्थी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीं मित्रांनो..
माध्यमिक शालेय शिक्षणात शैक्षणिक वर्षांतील क्रमिक अभ्यासासोबतच पुढील भावी भविष्याचीं दिशाहीं अनेक विद्यार्थ्यांना वेळोवेळी अभ्यास प्रेरणा देऊन जाते.. आपल्या क्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ताहीं आपल्या ध्येय निश्चितीसाठी आवश्यक असते.
'नेतल दिलीप शर्मा' ह्या विद्यार्थ्यांनीनीं आठवीत असताना UPSC चं करिअर निश्चित केलंय..तिला IAS अधिकारी व्हायचं आहे..तिचा निरंतर अभ्यास तिच्या ध्येयासाठी सदैव कार्यप्रेरणा आहे..
आमच्या परिवाराचं सद्भाग्यचं..! आमचा सर्वं शिक्षक वृंद नेहमीचं तिला प्रोत्साहन देत आलाय..!
काल तिला क्लासेस तर्फे आदरणीय मनोहर भोळे सर लिखित UPSC च्या पूर्व तयारीसाठी ' अभ्यास ते प्रशासकीय अधिकारी' हे पुस्तक आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलं..
तिच्या ह्या यशाबद्दल सहृदय अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नेतल ताई..
आम्हास आपला सार्थ अभिमान.. 🌹
आपलाच स्नेही मार्गदर्शक..🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख, परभणी..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
0 Comments