प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
यशाचा दीपस्तंभ ‘ करा स्मार्ट अभ्यास आणि मिळवा यश हमखास ’ या दहावीच्या विद्यार्थ्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शिकेत आपले मन:पूर्वक हार्दिक स्वागत.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांपासून अविरत विद्यार्थ्याच्या सेवेत दिवसागणिक वेगवेगळे शैक्षणिक अभिनव
प्रयोग करून विद्यार्थांना शिक्षणाची गोडी लावत, यंदा हि पुस्तिका हमखासपणे आपल्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देईल याची आम्हांला नक्कीच खात्री आहे.!
पुढील महिन्यात होणा-या बोर्ड परीक्षेला आता अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत. इ. 10 वीच्या परीक्षेची पूर्वतयारी करताना अनेक विद्यार्थी आणि पालक गोंधळलेले असतात, परीक्षेपूर्वी आपण स्मार्ट वे पद्धतीने अभ्यास केला तर आपल्या गुणांत नक्कीच 10-25 % वाढ होईल.
इ. 10 वी बोर्डाची परीक्षा , आयुष्यातील महत्वपूर्ण परीक्षा असल्यामुळे याचे योग्य नियोजन , अभ्यास - पुर्वतयारी आहार - विहार , परीक्षा पद्धती , उत्तरलेखन प्रेझेन्टेशन तंत्र , पेपरमधील सुट्टीचे योग्य नियोजन , मानसिक ताण , परीक्षेचे स्वरूप , काठीण्य पातळी वेळेचे गणित इ. सर्व बाबीवर अभ्यासपूर्ण काही गोष्टी मांडण्यात आल्या आहेत.
या सर्वांचा आपल्या क्षमता आणि कौशल्या प्रमाणे योग्य उपयोग करून इ. 10 वीत घवघवीत यश संपादन करा हीच शुभेच्छा आणि सदिच्छा...!
परीक्षेपूर्वी अत्यंत महत्वाचे …
विद्यार्थी जीवनातील महत्वपूर्ण दहावी बोर्ड परीक्षा देतांना सर्वच प्रकारच्या चाळणी परीक्षा म्हणजे आयुष्यातील एक उत्तम संधी स्वत: च्या आत डोकावण्याची क्षमता विकसित करून पुढील आव्हानाला सामोरे जाण्याची व आव्हाने पेलण्याची शक्ती निर्माण करणारी निर्णायक कसोटी असल्याने सर्वप्रथम तुम्हाला स्वत:ची ओळख असण्याची गरज आहे, तुम्ही स्वत:चे आत्मपरीक्षण करा, सातत्याने आभ्यास करण्याची तुमची ईच्छाशक्ती तुमची कुवत याचा अंदाज बांधा आणि अभ्यासाची तयारी करा.
- इ. १० वी बोर्डाची परीक्षा आयुष्यातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे अभ्यास आणि परीक्षा यांचे सुनियोजन अवश्य करा.
- आपल्या अभ्यासाचा स्टडी चार्ट बनवा.
- परीक्षेच्या अभ्यासाची पुर्वतयारी करताना शिक्षक, पालक, मोठे भाऊ – बहीण तसेच हुशार विद्यार्थाचे अवश्य मार्गदर्शन घ्या.
- अभ्यासाची मदत मागताना कमीपणा मुळीच वाटू देऊ नका.
- सर्व विषयाच्या एकूण घटक महत्व व प्रश्नपत्रिका आराखडा -स्वरूप यांचा सूक्ष्म अभ्यास करून आपल्या अभ्यासाची दिशा ठरवा.
- स्वयं-अध्ययन आणि लेखन खूप महत्वाचा भाग आहे.
- आपल्या अभ्यासाचे सुनियोजित वेळापत्रक तयार करा व ते कटाक्षाने पाळा.
- आपला अभ्यास एकूण २-३ सत्र वेळात किमान २-३ तास सलग या पद्धतीने आखा व अभ्यास आत्मविश्वसाने करा.
- प्रत्येक विषयाची मागील दोन वर्षात्तील बोर्ड परीक्षेचे आणि मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवा.
- विज्ञान , सामाजिक शास्त्र विषयातील सर्व स्वाध्याय प्रश्न सोडवा. लिहून काढा.
- भाषा विषयासाठी उपयोजित लेखन, निबंध व्याकरण आणि लेखन कौशल्य यांची काळजीपूर्वक तयारी करा.
- विज्ञान विषयातील आकृत्या , गणितीय उदाहरणे तसेच रासायनिक अभिक्रिया यांचा सराव अवश्य करा.
- विज्ञान विषयातील उपयोजनात्मक प्रश्नाचा अभ्यास करा.
- गणित विषयातील Hots स्तरावरील प्रश्नाचा सराव करताना शिक्षकांची मदत अवश्य घ्या.
- भूमिती विषयांतील प्रमेय पाठ न करता त्याची मांडणी समजून घ्यावी व प्रमेय लक्ष्यात ठेवावे.
- अंतर्गत मूल्यमापनाच्या सर्वच प्रात्यक्षिक परीक्षांत शिक्षकांना उत्साहाने सहकार्य करा.
- आदर्श नमुना उत्तरपत्रिका एकदा अवश्य अभ्यासा.
- परीक्षेपूर्वी व परीक्षेच्या काळात संतुलित आहार घ्या.
- मनाच्या संपूर्ण एकाग्रतेसाठी पुरेशी झोप आवश्यक असते हे लक्षात ठेवावे. अवेळी जागरण शक्यतो टाळावे.
- झोपेच्या वेळेत अभ्यास आणि अभ्यासाच्या वेळेत झोप टाळावे.
- परीक्षाकाळात मन अगदी उत्साही आणि सकारात्मक ठेवा.
- परीक्षा काळातील ईतर वेळेचे योग्य नियोजन करा.
- परीक्षाकाळात , TV, सिनेमा , इंटरनेट , मोबाईल. बाहेर फिरणे , मोठ्याचा अनादर करणे , भांडण तंटा करणे आज्ञा न पाळणे . इ. गोष्टी अजिबात करू नका.
- विषयानुसार अभ्यासाचे नियोजन करताना विषय निट समजून घ्यावा व त्यानुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पडताळून आपल्या अभ्यासाचा महत्वपूर्ण भागावर लक्ष केंद्रित करावा.
- अभ्यासात कंटाळा आला तर थोडा विश्रांती घेऊन विषय बदलावा .
- परीक्षेपूर्वी बोर्डाची किमान एक तरी प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवावी व शिक्षकांकडून प्रत्यक्ष तपासून घ्यावी.
- अभ्यासाचा स्टडीचार्ट बनविताना सकाळ , दुपार , संध्याकाळ या तीन संत्रात विषय वेगळे ठेवावेत .
- सुट्टीच्या दिवशी पालक, घरातील भाऊ बहिण , मित्र , नाते वाईक , शिक्षक, इ. शी मनसोक्त संवाद साधा. त्यांच्या कडून हि काही सकारात्मक बाबी ग्रहण करा.
- कोणत्याही परीक्षेची तयारी करताना परीक्षार्थी न राहता आपल्यात अभ्यासू वृत्ती जोपासूनच अभ्यास करा.
- अध्ययन आणि सराव यांचे कौशल्य अंगी बाळगा,उत्तम गुणपत्रिका तुमच्या हाती पडेल.
शेवटी विद्यार्थी मित्रानो परीक्षेत चांगले गुण मिळविण्याचे ध्येय समोर ठेवा.
ध्येय पूर्तीसाठी अविरत प्रयत्न करा.प्रामाणिक प्रयत्न यशाच्या शिखरावर नेतोचा पण आत्मिक समाधान देतो म्हणूनच प्रयत्नाची कास धरा. नियोजनाचा झेंडा हाती घ्या. यशाचे शिखर दूर नाही. !
परीक्षेला जाता जाता घ्यावयाची काळजी ..!
विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यात इ. १० वी बोर्ड परीक्षा संधीचे रुपांतर प्रामाणिक प्रयंत्न करून यशामध्ये करणे हे प्रत्यक्ष तुमच्याच हातात आहे.
परीक्षा कालावधीत शाळेत विहित वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा सभागृहात हजर राहा.
परीक्षेला निघण्यापूर्वी,ओळखपत्र,आवश्यक पेन , कंपास , पाण्याची बॉटल , घडी ,हातरुमाल , इ गोष्टी सोबत आहे का हे काळजीपूर्वक तपासा.
नियोजित आसन व्यवस्थेवरच आपले स्थान ग्रहण करावे.
परीक्षा सभागृहातील पर्यवेक्षक किंवा शिक्षक जे काही सूचना देतील त्या सर्व पाळा.
उत्तरपत्रिका हातात दिल्यानंतर त्यावर योग्य तो बैठक क्रमांक, स्वाक्षरी , विषयाची माहिती इ. सर्व नमूद करावे.
उत्तरपत्रिकेत योग्य ती माहिती भरून समास आखा.
प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर शांतपणे किमान ५ मिनिट ती वाचून काढावी.
प्रश्नाचा योग्य क्रम विचारांत घेऊन संपूर्ण प्रश्न वेळेत सोडवावेत.
पहिल्या पानांपासून ते शेवटच्या पानांपर्यंत आपले अक्षर सुस्पष्ठ , स्वच्छ तसेच ठळक असावे खाडाखोड करू नये.
भाषा विषयात शुद्ध लेखनाच्या चुका टाळाव्यात .
प्रत्येक प्रश्नाची उत्तरे उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सोडवावीत .
एखाद्या प्रश्न जमत नसेल तर ताटकळत न बसता पुढील प्रश्न सोडण्यास अग्रक्रम द्यावा.
पेपर सोडविताना कुठेही गोंधळू नये.
शेवटच्या अर्ध्या तासात पेपर सोडविणे थांबून सर्व प्रश्न सोडविल्याची खात्री करावी.
परीक्षा सभागृह सोडविण्यापूर्वी आपले प्रवेश पत्र ओळखपत्र , शैक्षणिक साधने इ. अवश्य तपासावे.
घरी आल्या बरोबर शांतपणे काही प्रश्नाची उत्तरे तपासावेत.
पुढील पेपरच्या अभ्यासाचे नियोजन करूनच अभ्यास करावा.
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
0 Comments