विद्यार्थ्यांच्या अभ्यास प्रवासात त्यांच्यासोबत चालणं हेच आमचं ध्येय आहे..
आमच्या परिवारात प्रवेश घेणारा विद्यार्थी अनेकदा नववीपर्यंत क्लास न लावलेला, घरात शैक्षणिक वातावरण नसलेला, अभ्यासात कच्चा, गणित-विज्ञानापासून कोसो दूर गेलेला असतो. काही जण तर परिस्थितीच्या ओझ्याने खचलेले असतात. पण हाच विद्यार्थी जेव्हा आमच्या मार्गदर्शनाखाली येतो, तेव्हा त्याला अभ्यासाची गोडी, आत्मविश्वासाची जोपासना आणि मेहनतीची सवय लागते..

परीक्षा काळात त्याला दररोज 6 ते 8 तास वैयक्तिक अभ्यास घडवून, आम्ही त्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतो. फक्त गुणच नव्हे, तर विचारांची परिपक्वता आणि समाजिक जबाबदारी देखील त्याच्यात रुजवतो.विविध सामाजिक आणि शैक्षणिक अभिनव प्रयोगातून शिक्षण-क्रमातून स्वतः चं व्यक्तीमत्व विकास आणि सामाजिक विकासात भर घालतो..
हा प्रवास केवळ अध्ययन, अध्यापन आणि मूल्यकांनांचा नाही, तर येथील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचा, त्यांच्या आत्मविश्वासाला आकार देण्याचा आणि दुर्बलांच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याचा दिवा पेटवण्याचा आहे मित्रांनो..
आज अनेक शेकडो विद्यार्थी आमच्या प्रयत्नांमुळे यशस्वी होऊन समाजात आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहेत.
हा प्रवास म्हणजे केवळ शैक्षणिक घडणाच नाही, तर स्वप्नांना वास्तवात आणणारी एक सामूहिक चळवळ, शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा खरा सेतू आहे, मित्रांनो.
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
0 تعليقات