🌱 परीक्षा ही केवळ प्रश्नपत्रिकेची कसोटी नसते, तर ती असते आपल्या धैर्याची, चिकाटीची आणि शिस्तीची खरी परिक्षा.
जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या प्रथम सत्र परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक परिवाराने आजपासून घेतलेला उपक्रम हा केवळ शिक्षणापुरता मर्यादित नाही, तर तो विद्यार्थ्यांच्या भविष्याचे दरवाजे उघडणारा दीपस्तंभ आहे.
दररोज तीन सत्रांमध्ये होणाऱ्या विषयनिहाय तयारी आणि अभ्यास मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आत्मविश्वास, योग्य दिशा आणि वेळेचे व्यवस्थापन शिकतील.
📌 परीक्षा म्हणजे भय नसून एक संधी आहे.. स्वतःला अधिक उंचीवर नेण्याची, स्वतःवर विश्वास वाढवण्याची आणि ह्या प्रवासात पालकांचा सहभाग हा मुलांसाठी आधारस्तंभ ठरतो.
🔰 पालकांसाठी प्रबोधनात्मक काही सूचना.. ✍️
1) आपल्या पाल्याचं अभ्यास वेळापत्रक तपासणं म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी रस्ता आखणं होय..
2) घरात शैक्षणिक वातावरण निर्मिती करणं म्हणजे मुलांना "तू करू शकतोस!" असा संदेश देणं.
3) मुलांच्या क्षमता व कमकुवत बाजू ओळखून मार्गदर्शन करणं म्हणजे त्यांच्या मनातली सुप्त शक्ती उजागर करणं.
4) बाहेरील मित्र संगतीवर लक्ष ठेवलं तर मुलांचं पाऊल चुकीच्या वाटेकडे वळणार नाही.
5)शिक्षकांसोबत सकारात्मक संवाद ठेवा; कारण शिक्षक हेच मुलांच्या यशाचे शिल्पकार आहेत.
6) आहार आणि आरोग्याची काळजी घ्या; कारण निरोगी शरीरातच तेजस्वी विचार वसतात.
7) सर्व प्रकारची शैक्षणिक मदत म्हणजे मुलांना त्यांच्या स्वप्नांकडे नेणारं इंधन.
8) अभ्यासासोबत योग्य झोप आणि विश्रांतीची काळजी घ्या; कारण थकलेल्या मनाला यशाचे शिखर गाठता येत नाही.
9) मुलांना प्रश्न विचारण्याची मोकळीक द्या; कारण प्रश्नच शोधाचा आणि प्रगतीचा पाया असतात.
10) मुलांच्या लहानशा यशालाही कौतुकाची थाप द्या; कारण ती थापच मोठ्या ध्येयाची प्रेरणा ठरते.
11) मुलांच्या चुका समजून घ्या, पण त्यांना त्यातून शिकायला प्रवृत्त करा; कारण चुका ह्याच सर्वोत्तम गुरु असतात.
12) स्पर्धा ही इतरांशी नाही, स्वतःशी आहे हे सतत समजावून सांगा; यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
13) मुलांना मोबाईल, टी.व्ही., सोशल मीडिया पासून योग्य अंतर ठेवण्याची सवय लावा; कारण वेळ वाया गेला तर जीवनच वाया जातं.
14) शिस्तबद्ध अभ्यास हा यशाचा गाभा आहे हे वारंवार पटवून द्या.
15) मुलांना ध्यान आणि प्रार्थनेची सवय लावा; कारण शांत मनच एकाग्र अभ्यास करू शकतं.
16) कृतज्ञता शिकवा—शिक्षकांप्रती, पालकांप्रती, पुस्तकांप्रती; कारण कृतज्ञता म्हणजे आत्म्याचा खरा अलंकार आहे.
17) मुलांना वेळेचे व्यवस्थापन शिकवा; कारण वेळ हाच जीवनाचा सर्वात मोठा भांडार आहे.
18) ध्येय ठरवून अभ्यास करणं म्हणजे अंधारात वाट हरवण्याऐवजी प्रकाशाकडे वाटचाल करणं.
19) मुलांमध्ये सकारात्मक विचारसरणी रुजवा; कारण मन जसं विचार करतं तसं आयुष्य घडतं.
20) मुलांना परीक्षेला भीतीची नव्हे तर संधीची दृष्टीने बघायला शिकवा; कारण परीक्षा म्हणजे त्यांच्या स्वप्नांचं दार उघडणारी किल्ली आहे.
🔥 मित्रांनो, पालकांचा आधार, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास...ही तिन्ही त्रिसूत्री जर एकत्र आली, तर कुठलीही परीक्षा मोठी राहत नाही, तर तीच पुढील विजयाची पहिली पायरी ठरते.
✨ विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ही एक थांबा नाही; ती म्हणजे पुढे जाण्याची सुरुवात आहे..
आज केलेली मेहनत, आज दिलेला वेळ आणि आज घडवलेली शिस्तच उद्या यशाचं सोनं ठरणार आहे..
म्हणूनच, चला..परीक्षेला घाबरू नका, तिला सामोरे जा धैर्याने, विश्वासाने आणि साधनेने.
आम्ही सदैव आपल्या सोबत आहोतच..!
धन्यवाद मित्रांनो 🙏
आपलाच स्नेही मार्गदर्शक..🙏🏻
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.drapjabdulkalamstudentfoundation.org.in
0 تعليقات