तुझ्या उत्तुंग भरारी पुढे... गगन ही ठेंगणे भासावे…
तुझ्या विशाल पंखाखाली... विश्व ते सारे वसावे…
🎓 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने..! 🌹
आज जागतिक महिला दिन म्हणजेच स्त्रीत्वाचा उत्सव!
प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक क्षणाला समाजात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन विद्यार्थी मित्र परिवाराच्या वतीने, आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रा. प्रगती सोनकांबळे ताई आणि शहेनाज शेख मॅडम यांच्या उपस्थितीत, वर्ग दहावीतील प्रत्येक विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी, क्लासेसमधील प्रत्येक विद्यार्थिनीला ‘A Diary of Young Girl – Anne Frank’ हे प्रेरणादायी पुस्तक भेट देण्यात आले.
या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून, यशस्वी स्त्रीच्या कर्तृत्वाची उजळणी करत, आजच्या पिढीने महान स्त्रियांकडून प्रेरणा कशी घ्यावी आणि स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल कसे घडवावेत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्त्रीशक्तीला सलाम..!🙏
💐 जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
आपलाच... ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
0 تعليقات