डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन मित्र परिवारातील शैक्षणिक वर्ष 2017-18 चा दहावी वर्गाचा सेवा उद्योग स्नेहीं माजी विद्यार्थी साईनाथ वाघमारे ह्यांने पदवी शिक्षणानंतर Signature Hair Studio ह्या आपल्या नव्या केश कर्तनालय दालनाची यशस्वी सुरुवात केली..
काल रात्रीं शुभारंभ प्रसंगी त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले त्याच्या वर्गमित्रासह आम्ही सर्वांनी त्याचं कौतुक आणि अभिनंदन केलंय..
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याची प्रमाणिक धडपड, परंपरांगत व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी पुण्याला जाऊन स्वतःच्या हिंमतीवर शास्त्रशुद्ध परीश्रम घेण्याचीं जिद्द, नव्या व्यवसायाला लागणारं भांडवलं, आई-वडिलांचीं साथ आणि विश्वास, साईनाथ वर स्नेह असलेलं मित्र-प्रेम आणि त्याचं उत्तम सहकार्य, थोरा मोठ्याचं आशिर्वाद, आपल्या कामावर असलेलं निस्सीम प्रेम आणि सच्ची श्रद्धा, व्यवसायिक कौशल्य.. ई.. आदी बाबी...खूप कमी वयात स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीला आणि जिद्दीला आमच्या विद्यार्थी मित्र परिवारातर्फे सलाम आणि पुढील कार्यास सदिच्छा विद्यार्थी मित्रा..
आम्हांस आपला सार्थ अभिमान..🌹
आपलाच स्नेहीं मार्गदर्शक आणि शुभेच्छूक
🎓 विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन,परभणी.
0 تعليقات