पुस्तक दान संकल्प : एक शैक्षणिक-सामाजिक उपक्रम..


" एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ "   - जगतगुरु संत तुकाराम महाराज

               

डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन शैक्षणिक परिवारातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा बोर्ड संपल्यानंतर , आपली पुस्तकं समाजातील गोर-गरीब आणि गरजु विद्यार्थ्यांना दान करण्याचा एक क्रांतिकारक संकल्प केला आहे..


दहावी वर्गाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या पूर्व-संमतीनें आपल्या शाळेतील आणि जवळपास असलेल्या काही गोर-गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यासाठी जो पुढाकार घेतला त्या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून कौतुक आणि हार्दिक आभार..


शालेय शिक्षणापासुनचं विद्यार्थ्यांनी सामाजिक भान ठेवत, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न या पुस्तकं दान संकल्पनेतून नक्कीच सार्थ होईल अशी आशा बाळगूया मित्रांनो..


 डॉ. ए.पी.जे.अब्दुल्ल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक-सामाजिक कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत आपल्या विविध नवं-शैक्षणिक उपक्रमाच्या प्रयोगातून संविधानात्मक मूल्य जोपसण्यासाठी नेहमीच कार्यक्रम आयोजित केले जातात..


आम्हीं ज्या परिसरात हा विद्यार्थी मित्र परिवार चालवतो तेथील जागरूक पालक, स्नेही-मित्र,समाजसेवक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक मित्र, आजी-माजी विद्यार्थी, शाळेतील काही उपक्रमशील शिक्षक आणि नागरीक ह्या सर्वांचं नेहमीच सहकार्य लाभतं..


शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रातल्या ह्या नव्या संकल्प-प्रयोगाचं नक्कीच आपण स्वागत कराल आणि सहकार्य ही कराल ही अपेक्षा बाळगतो..

आपण हीं अशी पुस्तकांची मदत करू शकता..👇🏻

संपर्क : wa.me/+919822624178

धन्यवाद:🙏🏻

🙏🏻आपलाच विनम्र आभारी

#विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख..

🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.